" आयुष्याच्या प्रवासात एकाची तत्व दुसऱ्याला थिअरी वाटते "
000o000
" ' मना सज्जना भक्तीपंथेचि जावे ' ह्या वचनापासून कोणत्याही गोष्टीकडे, नाक उडवून ' ही फक्त थिअरी आहे,' अस म्हणून तिला तिला निकालात काढता येतं. पण चार पावलं जर त्या दिशेने टाकून पाहिली तर, आपल्यापुरती ती ' थिअरी ' राहत नाही. प्रथम थिअरी नाकारायची नाही. ती जगायची. त्यातून जो अनुभव येतो त्या अनुभवाची थिअरीला जोड द्यायची. मग तिला प्रत्ययाचं बळ येतं. ती थिअरी इतरांना सांगत बसायचं नाही. कारण प्रचीती आली की ती तुमची तत्व होतात आणि तुमची तत्व इतरांची थिअरी होतात. अस का? कारण अनुभव घेणारा प्रत्येकजण वेगळा असतो. प्रवासाला निघतांना, केवळ कागदावर छापलेला रोड मॅप मिळतो. विश्रामधाम, गाव, पेट्रोलपंप, त्यांच्या जागा आणि मैल, इतकंच त्याच्यावर छापतात. रस्त्यावरचे खड्डे, ड्रायव्हर कसा आहे, ट्रॅव्हल कंपनीचा प्रामाणिकपणा आणि हल्ली विश्रामधामात चालणारे प्रकार, दुर्दैवाने वाटेत दरोडा पडला तर, अशा गोष्टी नकाशात छापत नाहीत. नकाशा म्हणजे थिअरी समजा, प्रवासाचा अनुभव घेणारा प्रत्येक प्रवासी वेगळा. म्हणूनच आयुष्याच्या प्रवासात एकाची तत्व दुसऱ्याला थिअरी वाटते."
वपुर्झा /144/Surendra /23032025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा