" माणसाच्या हालचाली, माणसाचे विचार ह्यावर कित्येक गोष्टीचा पगडा असतोच असतो "
000o000
" एखाद्याला एकदम ' बोगस ' ठरवू नका! जग तुम्हाला वाटत त्यापेक्षा फार निराळं आहे. समोर दिसणारा माणूस हा दिसतो त्यापेक्षा फार निराळा असतो. तर्काला सोडून किंवा स्वतःच्या वृत्तीला सोडून तो एकदम वेगळीच कृती करून दाखवतो. तुम्ही चमकता. हे कस घडलं, अस निष्कारण, वारंवार दुसऱ्यांना विचारत बसतो ! आपल्याला माणसं कशी आहेत, हे अजून समजत नाही, अस म्हणत स्वतःला अज्ञानी मानून गप्प बसता. अस का होत माहित आहे का? आपण पटकन एखाद्याला ' बोगस ' म्हणून निकालात काढतो व मोकळे होतो. मला तुम्ही सांगा, एवढ्या घाईघाईने निर्णय घेऊन तुम्हा आम्हाला कुठे जायचं असतं? ही घाई नडते आपल्याला ! आपण थोड शांतपणे घेतलं तर त्या माणसाच्या सगळ्या हालचाली आपल्याला समजतील. माणसाच्या हालचाली, माणसाचे विचार ह्यावर कित्येक गोष्टीचा पगडा असतोच असतो. पण निर्जीव वस्तूही माणसावर आपली हुकमत गाजवतात."
वपुर्झा /111/Surendra /05032025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा