रविवार, ३० मार्च, २०२५

" वैवाहिक जीवनात पदार्पण करतांना एक सप्तपदी असते तशीच ती व्यवसायातही."

" वैवाहिक जीवनात पदार्पण करतांना एक सप्तपदी असते तशीच ती व्यवसायातही."

                           000o000

                "  मिळालेला लौकिक म्हणजे अश्वमेधाचा घोडा दाराशी आल्याप्रमाणे. त्याचा लगाम हातात धरला की मग कायम युद्ध. हे युद्धाचं आव्हान व्यवसाय स्वीकारणारा पेलू शकेल का? वैवाहिक जीवनात पदार्पण करतांना एक सप्तपदी असते तशीच ती व्यवसायातही.

पहिलच पाऊल - शब्द

दुसर - वेळ

तिसरं - तत्परता 

चौथ - नजर 

पाचव - कौशल्य 

सहावं -  ज्ञान 

सातव - सातत्य 

          सातव पाऊल हे फार अवघड पाऊल. सातव पाऊल सतराव्या, सातशेव्या, सात हजार.. .. थोडक्यात शून्य वाढवत जायचं. पत्करलेल्या व्यवसायात सातत्य टिकलं तर पहिल्या सहा पावलांना, बळीच्या तीन पावलांची शक्ती प्राप्त होते. पहिल्या सहा पावलांसाठी गुरु भेटू शकतो. सातव पाऊल रक्तात हवं."  

वपुर्झा /147/Surendra /31032025

गुरुवार, २७ मार्च, २०२५

"साथीदारधीच स्पर्धा केलीत, तर कदाचित आपल्याला पॅव्हेलियनमध्ये बसावं लागेल"

" साथीदारधीच स्पर्धा केलीत, तर कदाचित आपल्याला पॅव्हेलियनमध्ये बसावं लागेल"

                           000o000

                "  पारितोषिकं, प्रशस्तिपत्रकं, कप, पेले, सुवर्णपदक, म्हणजे यश नव्हे. ती कीर्ती, यशाचं नातं वर्तमानकाळातल्या प्रत्येक क्षणाशी, श्वासाइतकं असत. प्रत्येक क्षणी श्वास घ्यावाच लागतो. यश तसंच. आणि संसार क्रिकेट सारखा असतो. विकेटसमोर उभं राह्यलं की प्रत्येक बॉलंच काहीतरी करावं लागतं. ' भूत, वर्तमान, भविष्य म्हणजे तीन स्टॅम्पस ' असं एक क्रिकेटिअर म्हणतो. बेल्स म्हणजे काळ. टाकलेला प्रत्येक चेंडू काळावर सोपवायचा नाही. तो तुम्हाला अडवावा लागतो. सोडून देणं, थांबवणं, टोलवण यांपैकी काहीतरी एक करावच लागतं. तुम्ही जर बॉलर्स ऍण्डला असाल तर साथीदाराबरोबर पळापळ करावी लागते. टेनिस, बॅडमिंटन किंवा आपल्या हुतुतूच्या खेळा प्रमाणे इथं पुनर्जन्म नाही. साथीदार आऊट होऊ नये म्हणून जपायच असतं. साथीदारधीच स्पर्धा केलीत, तर कदाचित आपल्याला पॅव्हेलियनमध्ये बसावं लागेल, आणि आपला जोडीदार मग दुसऱ्याच खेळाडूंबरोबर खेळतांना पहावं लागेल."

वपुर्झा /146/Surendra /28032025

मंगळवार, २५ मार्च, २०२५

" मी माझ्या आईचं सबंध जीवन जवळून पाहिलं आहे. तिच्या स्वभावाच बारीक निरीक्षण केलं आहे."

"  मी माझ्या आईचं सबंध जीवन जवळून पाहिलं आहे. तिच्या स्वभावाच बारीक निरीक्षण केलं आहे."

                           000o000

                "  नोकरी करता तेव्हा तुम्ही काय करता ! जातीने - गोतीने  एक नसलेल्या वरिष्ठाला मनातून शिव्या देत, प्रत्यक्षात तुम्ही माना वाकवताच ना ! त्याची प्रसंगी मुर्खासारखी बोलणी सहन करताच ना! अपराध नसतांना शिक्षा सहन करताच ना! मग तशीच थोडी पॉलिसी घरी का वापरू नये? दुसऱ्यासाठी नाही, स्वतःसाठीच! द्या थोडा मोठेपणा घरातल्यांना! एवढ काय नुकसान होणार आहे त्याने? घरातल्या माणसांशी असं दुटप्पी वागण्याची वेळ येऊ नये हे मान्य, पण दुर्दैवाने माणसं तशी भेटली तर काय इलाज? त्या मोठ्या माणसांचे स्वभाव तसे का बनत गेले त्यालाही काही कारणं आहेत, इतिहास आहे. त्यांच्या पूर्वायुष्यात त्यांनीही झगडा दिला आहे, पराभव पचवले आहेत. हे सगळं कुणी पहायचं? याचा विचार कुणी करायचा? मी एकट्याने! कारण मला बायकोही हवी आणि आईही हवी, हा माझा दोष! मी माझ्या आईचं सबंध जीवन जवळून पाहिलं आहे. तिच्या स्वभावाच बारीक निरीक्षण केलं आहे. तिच्या स्वभावातल्या गुणांपेक्षाही तिच्यात ह्या वयात निर्माण झालेले दोष मला जास्त माहीत आहेत. त्या दोषांसकट तिला कुणीतरी सांभाळायला हवं आहे. सगळ्यांच व्यवस्थित होणार आहे. आईच्या मार्गाने आई जाणार आहे. पत्नी चाललीच आहे. लोंबकळतो काय तो मीच ! "


वपुर्झा /145/Surendra /26032025

रविवार, २३ मार्च, २०२५

" आयुष्याच्या प्रवासात एकाची तत्व दुसऱ्याला थिअरी वाटते "

"  आयुष्याच्या प्रवासात एकाची तत्व दुसऱ्याला थिअरी वाटते "

                           000o000

                "  ' मना सज्जना भक्तीपंथेचि जावे ' ह्या वचनापासून कोणत्याही गोष्टीकडे, नाक उडवून ' ही फक्त थिअरी  आहे,' अस म्हणून तिला तिला निकालात काढता येतं. पण चार पावलं जर त्या दिशेने टाकून पाहिली तर, आपल्यापुरती ती ' थिअरी ' राहत नाही. प्रथम थिअरी नाकारायची नाही. ती जगायची. त्यातून जो अनुभव येतो त्या अनुभवाची थिअरीला जोड द्यायची. मग तिला प्रत्ययाचं बळ येतं. ती  थिअरी इतरांना सांगत बसायचं नाही. कारण प्रचीती आली की ती तुमची तत्व होतात आणि तुमची तत्व इतरांची थिअरी होतात. अस का? कारण अनुभव घेणारा प्रत्येकजण वेगळा असतो. प्रवासाला निघतांना, केवळ कागदावर छापलेला रोड मॅप मिळतो. विश्रामधाम, गाव, पेट्रोलपंप, त्यांच्या जागा आणि मैल, इतकंच त्याच्यावर छापतात. रस्त्यावरचे खड्डे, ड्रायव्हर कसा आहे, ट्रॅव्हल कंपनीचा प्रामाणिकपणा आणि हल्ली विश्रामधामात चालणारे प्रकार, दुर्दैवाने वाटेत दरोडा पडला तर, अशा गोष्टी नकाशात छापत नाहीत. नकाशा म्हणजे थिअरी   समजा, प्रवासाचा अनुभव घेणारा प्रत्येक प्रवासी वेगळा. म्हणूनच आयुष्याच्या प्रवासात एकाची तत्व दुसऱ्याला थिअरी वाटते." 

वपुर्झा /144/Surendra /23032025

रविवार, १६ मार्च, २०२५

" वारंवार प्रकट होऊनही जे शांत होत नाही त्यालाच ' शल्य ' म्हणतात."

  " वारंवार प्रकट होऊनही जे शांत होत नाही त्यालाच

 ' शल्य ' म्हणतात."

                           000o000

                "   वारंवार प्रकट झाल्याशिवाय जे शांत होत नाही किंवा वारंवार प्रकट होऊनही जे शांत होत नाही त्यालाच ' शल्य ' म्हणतात. गतकाळातील दुःखाची उजळणी करण हाच त्या दुःखावर सूड घेण्याचा मार्ग असतो. काहीकाही घटनांची उजळणी करतांना कधी कधी त्या घटनांना साक्ष असलेला श्रोता जवळचा वाटतो, तर काही काही वेळेला ' कोरा ' रॅपरही न फोडलेला, श्रोता, बोलणाऱ्यांना हवा असतो. पहिल्या श्रोत्याच्या बाबतीत सगळं सगळं सांगाव लागत नाही. तर दुसऱ्या श्रोत्यांच्या बाबतीत त्याच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य, कुतूहल, उत्सुकता, मधून मधून बसणारे धक्के, त्यात व्यक्त केलेली अनुकंपा अशा वळणावळणांनी आपण क्रमशः सांगतो, ह्याचा आनंद मिळतो. भूतकाळातले काही क्रम नव्याने उलगडतात. श्रोता बदलला की वक्ताही बदलतो."

वपुर्झा /143/Surendra / 17032025

" निर्णय घेता न येण ह्यासारखा दुसरा घातक दोष नाही."

" निर्णय घेता न येण ह्यासारखा दुसरा घातक दोष नाही."    

                           000o000

                "   निर्णय घेता न येण ह्यासारखा दुसरा घातक दोष नाही. निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणं अधिक बरं. चुकीचा निर्णय घेणाऱ्या माणसांनी जीवनात यश मिळवलेल आहे. परंतु जो निर्णय घेऊ शकत नाही त्याचं मन नेहमी हे करू की ते करू या गोंधळात गुनलेल असतं. मात्र हा मनुष्य कधीही यशस्वी झाल्याचं ऐकिवात नाही. ज्याला निर्णय घेता येत नाही, त्याला कृती करता येत नाही आणि ज्याला कृती करता येत नाही, त्याला कोणत्याही क्षेत्रातयश मिळवता येत नाही."

वपुर्झा /138/Surendra / 17/032025

शनिवार, १५ मार्च, २०२५

" प्रत्येक पती/पत्नीने संसाराच्या यशासाठी समजणे आवश्यक"

"  प्रत्येक पती/पत्नीने संसाराच्या यशासाठी समजणे आवश्यक"

                           000o000

                "   अक्षता ह्या शब्दातल प्रत्येक अक्षर महत्वाचं आहे. अ = अर्पणभाव, क्ष = क्षमाशीलता, ता = तारतम्य . हे गुण दोघांजवळ हवेत. एकमेकांसाठी आपण कोणत्या गोष्टींना, किती प्रमाणात मुरड घालू शकणार आहोत, त्याचा शोध घ्यावा. संघर्षाच्या जागा हेरून ठेवाव्यात. मुरड घालणं हा सहजधर्म व्हायला हवा. कात टाकली की साप तिकडे वळूनही बघत नाही. इतक्या सहजतेने आपण एकमेकांसाठी काय टाकू शकतो त्याचं संशोधनाचं करायला हवं. एकमेकांना टाकण्यापेक्षा, एकमेकांसाठी काही ना काही टाकणं ह्यालाच अर्पणभाव म्हणतात.  स्वतःतल्या उणिवांची खरी जाणीव झाली आहे. दोष समजले आहेत. कमकुवतपणाच्या जागा समजल्या आहेत. पण प्रामाणिक प्रयत्न करूनही आपल्या जोडीदाराचे वृतिदोष जात नाहीत समजल्यावर तिकडे दुर्लक्ष करायची शक्ती म्हणजे क्षमाशीलता. तरतमभाव न बाळगता घ्यायचं कसं  आणि लडिवाळ हट्ट करून वसूल कधी करायचं, वाकायचं कधी आणि कधी वाजवायला लावायचं , स्थळ, काळ, स्थिती ह्याच भान म्हणजे तारतम्य."


वपुर्झा /126/Surendra /15032025

शुक्रवार, १४ मार्च, २०२५

" स्त्रीची गृहिणी होण, हीसुद्धा कलाकृतीच आहे."

" स्त्रीची गृहिणी होण, हीसुद्धा कलाकृतीच आहे."

                     000o000

              "  प्रत्येक जुन्या अनुभवाला नव्याने सामोरं जाण्याची एक कला असते. आयुष्य म्हणजे पुनरुक्ती. ब्रेकफास्ट, आंघोळ, दुपारचं जेवण, त्यासाठी स्वयंपाक, आलटूनपालटून त्याच भाज्या, आमटी, तीच कणीक, त्याच पोळ्या. मग एखादी डुलकी. पुन्हा दुपारचा चहा. परत रात्रीच जेवण. मग झोप. हा झाला एक दिवस. प्रति क्षणी नवा जन्म घेण्याची शक्ती फक्त मनाजवळ असते. पण त्याला ते शिकवावं लागतं. मनाची ताकद मनालाच कुणीतरी दाखवायची असते. त्याने ती ताकद उचलली की मग सगळं सोपं असत. मग ते मनच तुम्हांला एक आयुष्य पुरणार नाही इतक्या युक्त्या शिकवत. ते मन मग लेखकाला कथानकं पुरवत, कवीला शब्द सुचवत, संगीतकाराला चाल, नर्तकाला पदन्यास, शास्त्रज्ञाला शोध. साध्यासुध्या, सर्वसामान्य बाईचं आदर्श गृहिणीत रूपांतर कसं करायचं, हेही मनच शिकवत. स्त्रीची गृहिणी होण, हीसुद्धा कलाकृतीच आहे."

वपुर्झा /126/Surendra /15032025

गुरुवार, १३ मार्च, २०२५

" कालांतराने मिळणाऱ्या वस्तूंचीही किंमत राहत नाही आणि त्या वस्तू देणाऱ्यांचीही."

"  कालांतराने मिळणाऱ्या वस्तूंचीही किंमत राहत नाही आणि त्या वस्तू देणाऱ्यांचीही."

                           000o000

                "   डिपेंडंट  माणसं फार प्रेमळ आहेत असं आपल्याला वाटतं. प्रेम दाखवणे ही त्यांची व्यावहारिक गरज असते. मुलं जोपर्यंत लहान असतात तोपर्यंत त्यांचा तो आंतरिक उमाळा असतो. त्यांच्या वैयक्तिक गरजा कमी असतात. आपण आपल्या प्रेमाचा वर्षाव वस्तूंच्या रूपाने व्यक्त करतो. देणग्यांचा वर्षाव करतो. तिथं चुकतं." " आपल्या मुलाचं वस्तूंवरच प्रेम आपणच वाढवीत नेतो. त्यांच्या गरजांची वाढ करतो. मग चालत्याबोलत्या माणसांपेक्षा, वस्तूंना प्रायोरिटी मिळते. मुलं मोठी व्हायला लागली की त्यांची स्वतःची मतं तयार व्हायला लागतात. ती तुमचं मूल्यमापन करायला लागतात. देणग्यांचा वर्षाव करून करून तुम्ही त्यांना इनडायरेक्टली आत्मकेंद्रित बनवत जाता. कालांतराने मिळणाऱ्या वस्तूंचीही किंमत राहत नाही आणि त्या वस्तू देणाऱ्यांचीही.

वपुर्झा /125/Surendra /14032025

" पॅटर्न म्हणून स्वीकार करायचा. सगळ्याचाच. "

" पॅटर्न म्हणून स्वीकार करायचा. सगळ्याचाच. "

                     000o000

              "  पॅटर्न म्हणून स्वीकार करायचा. सगळ्याचाच. सत्ता गाजवण्यासाठी जे गळचेपी करतात, खून करतात, पोलिसयंत्रणा राबवतात. पद्मश्री, पद्मभूषणाच्या खिरापती वाटून विचारवंतांना गप्प बसवतात. फार कशाला, कोण्या एखाद्या महात्म्याने हा जन्म संपवून, पुनर्जन्मातल निम्मं आयुष्य संपवल्यावर त्याची गणना ' रत्नात ' करतात. हे सगळं ' पॅटर्न ' म्हणून मान्य करायचं. नुसतं मान्य करून थांबायचं असेल तर फार नफ्फड व्हावं लागतं. गेंड्याची कातडी..... ओह नो ! गेंडाही जिव्हाग्री बाण लागला तर मरतो. रंग कोणताही असो. मूळ रंग स्वार्थाचा. तो झाकायला. तोही पॅटर्न. पण ज्याला तो पॅटर्न शरीराला, मन आणि बुद्धी पणाला लाऊन सांभाळावा लागतो तो त्या पॅटर्नच किती काळ कौतुक करील? विषारी सापाचा दंश झाल्यावर, त्या सापाच्या हिरव्यागार रंगाचं आणि चावल्याचं कौतुक राहील काय?

वपुर्झा /122/Surendra /13032025

मंगळवार, ११ मार्च, २०२५

" हे अशा, लोळून दिवस काढणाऱ्या महाभागांचं जीवितकार्य."

"  हे अशा, लोळून दिवस काढणाऱ्या महाभागांचं जीवितकार्य."

                     000o000

              "  समाजात गेंड्याची कातडी पांघरून वावरणारी माणसं कमी आहेत का? आहार, निद्रा, मैथुन एवढ्याच त्यांच्या गरजा. ह्या गरजांना धक्का लागू नये म्हणूनही माणसं पात्रता नसताना फक्त स्पर्धा करतात. कुणाशी? तर स्वतःच्या हिमतीवर मार्ग शोधणाऱ्या स्वयंप्रकाशी प्रतिभावंतांशी, कष्टांवर भक्ती करणाऱ्या माणसांशी. लोकप्रियतेचं वरदान लाभलेल्या सेवाभावी जोडीदाराशी. काही संसारातून गृहिणी अशा असतात तर काही संसारातून स्वतःला कुटुंबप्रमूख म्हणवून मिरवणारे पुरुष तसे असतात. जोडीदाराचे पाय खेचणं,  स्वतःच्या स्वास्थ्यासाठी, कार्यरत असलेल्या पार्टनरचाच अंत बघणं हे अशा, लोळून दिवस काढणाऱ्या महाभागांचं जीवितकार्य."

वपुर्झा /121/Surendra /12032025

सोमवार, १० मार्च, २०२५

" मरणही जिथे शांतपणे मिळत नाही तिथे मृतात्म्या शांत कसा राहील ?

" मरणही जिथे शांतपणे मिळत नाही तिथे मृतात्म्या शांत कसा राहील ? "

                     000o000

              "  अपघाती मरण म्हणजे त्या मृतात्म्याचे धिंडवडे. शरीराची विटंबना आणि नातेवाईक, आप्तेष्टांची ससेहोलपट. कॉरोनरकडे ताटकळण, पोस्टमार्टम विनाविलंब व्हावं म्हणून तिथंही हात ओला करण, फार कशाला, प्रेतावर टाकण्यासाठी पांढरा कपडा हवा असेल, तर तिथंही दक्षिणा मोजणं, बससाठी डोळ्यांत प्राण आणून बॉडी ताब्यात मिळेतो पळापळ करणं, नाहीतर नोटामागून नोटा खर्च करायची तयारी ठेवून टॅक्सीने प्रवास करण.         ' मृतात्म्यास शांती मिळो ' अस फक्त म्हणायचं, पण त्यात काय अर्थ आहे? चार घटका माथा टेकायला जमीन हवी असेल तर लाखो रुपये ओतावे लागतात. जिवंतपणी सामान्य माणसांची जी परवड व्हायची ती होतेच. पण मरणही जिथे शांतपणे मिळत नाही तिथे मृतात्म्या शांत कसा राहील ?

वपुर्झा /121/Surendra /11032025

शनिवार, ८ मार्च, २०२५

" स्वतःच्या माणसांजवळ पराभव मान्य करण त्याच्यापेक्षा कठीण."

"  स्वतःच्या माणसांजवळ पराभव मान्य करण त्याच्यापेक्षा कठीण."

                           000o000

                "  प्रत्येक माणूस प्रेमळ असतो, आपली फक्त रीत बदलणं आवश्यक आहे. कशी?. चार भिंतीच्या आत फक्त प्रेमच असावं. चार भिंतींच्या बाहेर तर्काने प्रश्न सोडवावेत. आपण उलट करतो. ज्यांच्याबरोबर आयुष्य घालायचं त्यांच्याशी मोकळेपणाने न बोलता नुसते तर्क करीत बसतो. अनेक माणसांचे भयानक अनुभव घेऊन घेऊन कोणत्या माणसाला विश्वासात घ्यावं असा प्रश्न पडतो हे एक आणि दुसरं म्हणजे, उद्ध्वस्त माणूस जास्त स्वाभिमानी आणि कडवा होतो. पराभव मान्य करायची त्याची शक्ती संपलेली असते. दुसऱ्या माणसाशी युद्ध करायला फार बळ लागत नाही. स्वतःशीच सामना करण भयानक कठीण आणि स्वतःच्या माणसांजवळ पराभव मान्य करण त्याच्यापेक्षा कठीण."

वपुर्झा /118/Surendra /09032025

शुक्रवार, ७ मार्च, २०२५

" स्वतःचा रुबाब स्वतःच्या पायावर उभा नाही, हे कितीजण जाणतात ?

" स्वतःचा रुबाब स्वतःच्या पायावर उभा नाही, हे कितीजण जाणतात ?

                     000o000

              "  स्वतःचा रुबाब स्वतःच्या पायावर उभा नाही, हे कितीजण जाणतात ? खुर्चीच्या चार पायांची ताकद फार वर्ष पुरत नाही. काही माणसांची तर रिव्हॉल्विंग खुर्ची असते. नावडत्या माणसांकडे त्यांना झटकन पाठ फिरवता येते. राज्यकर्त्यांची खुर्ची, विरोधी पक्षाच्या नेत्यांची खुर्ची तर अनेकांच्या खांद्यावर असते. तो खांदा खुर्चीऐवजी, खुर्चीवरच्या माणसाला देण्याची वेळ फार अंतरावर नसते. खुर्चीपेक्षा माणसांना जिंकावं, ते जास्त सोप. त्यासाठी काय लागतं? हसतमुख चेहरा आणि इतरांपेक्षा स्वतःशी प्रामाणिक राहणं."

वपुर्झा /117/Surendra /08032025

गुरुवार, ६ मार्च, २०२५

" समस्या या वयाच्या कोणत्याही वळणावर पडतात."

" समस्या या वयाच्या कोणत्याही वळणावर पडतात."

                     000o000

              "  प्रत्यक्ष पराभवापेक्षा, तो कबूल करावा लागणं हा पराभव मोठा असतो. पहिल्या पराभवात कधीकधी कर्तृत्व कमी पडत तर कधीकधी कर्तबगारी असून, भूमीच रथाच चाक पकडून ठेवते. पण दुसऱ्या पराभवासाठी, चाकं न  गिळणारी मनोभूमीच विशाल लागते. प्रत्येकाच असण हे जस त्याचं स्वतःचं असण असतं त्याप्रमाणे प्रत्येकाच्या समस्या पण ownership च्या असतात. समस्या आणि जखमा पण. समोरचा माणूस फक्त फुंकर घालण्याचं काम करतो. ठणका आतून पण फुंकर बाहेरून आत. समस्या या वयाच्या कोणत्याही वळणावर पडतात. त्या सोडवण्याची आपली उमेद मात्र ओसरत जाते. जशी उमेद ओसरत असते, त्याचप्रमाणे फुंकर घालणारे सहप्रवासी पण कमी होत जातात. नवे प्रवासी जोडण्याची ताकद राहत नाही, कारण पूर्वीच्या प्रवाशांसाठी आपण खूप राबलेले असतो. "

वपुर्झा /112/Surendra /06032025

मंगळवार, ४ मार्च, २०२५

" माणसाच्या हालचाली, माणसाचे विचार ह्यावर कित्येक गोष्टीचा पगडा असतोच असतो "

"  माणसाच्या हालचाली, माणसाचे विचार ह्यावर कित्येक गोष्टीचा पगडा असतोच असतो "

                           000o000

                "  एखाद्याला एकदम ' बोगस ' ठरवू नका!  जग तुम्हाला वाटत त्यापेक्षा फार निराळं आहे. समोर दिसणारा माणूस हा दिसतो त्यापेक्षा फार निराळा असतो. तर्काला सोडून किंवा स्वतःच्या वृत्तीला सोडून तो एकदम वेगळीच कृती करून दाखवतो. तुम्ही चमकता. हे कस घडलं, अस निष्कारण, वारंवार दुसऱ्यांना विचारत बसतो ! आपल्याला माणसं कशी आहेत, हे अजून समजत नाही, अस म्हणत स्वतःला अज्ञानी मानून गप्प बसता. अस का होत माहित आहे का? आपण पटकन एखाद्याला ' बोगस ' म्हणून निकालात काढतो व मोकळे होतो. मला तुम्ही सांगा, एवढ्या घाईघाईने निर्णय घेऊन तुम्हा  आम्हाला कुठे जायचं असतं? ही घाई नडते आपल्याला ! आपण थोड शांतपणे घेतलं तर त्या माणसाच्या सगळ्या हालचाली आपल्याला समजतील. माणसाच्या हालचाली, माणसाचे विचार ह्यावर कित्येक गोष्टीचा पगडा असतोच असतो. पण निर्जीव वस्तूही माणसावर आपली हुकमत गाजवतात." 

वपुर्झा /111/Surendra /05032025

सोमवार, ३ मार्च, २०२५

" सवय वैरीण "

"  सवय वैरीण "

                           000o000

                "  गादी - उशीशिवाय झोपणं तर सोडाच, पण नेहमीची उशी जरी वाटणीला आली नाही तरी आपली मिसाज जाते . दिवसातून दहा वेळा जप करतो. डोळ्याला डोळा नाही हो रात्रभर. रात्र वैरीण नसते. उशी तर नसतेच नसते. सवय वैरीण. आणि तिला जन्म देणारे आपणच.

वपुर्झा /111/Surendra /03032025

रविवार, २ मार्च, २०२५

" ठिणगी ठिणगीच असते."

" ठिणगी ठिणगीच असते."

                     000o000

              "  ठिणगी ठिणगीच असते. ती कुठे पडते ह्यावर तिचं अस्तित्व टिकत. पाण्याच्या पृष्ठभागावर पडते की ज्वालाग्राही साठवणीच्या गुदामात? माणसाचं मनही जलाशयाप्रमाणे शीतल आहे की स्पोटक वस्तूंचं गोडाऊन आहे ते ठिणगीशिवाय समजत नाही. संशय, स्पर्था, द्वेष, मत्सर, क्रोध अशी नाना रूप ठिणगीला धारण करता येतात. मन इंधनाने तुडुंब भरलेले असेल तर ठिणगी उग्र रूपाने जगते."

वपुर्झा /111/Surendra /03032025

शनिवार, १ मार्च, २०२५

" मैत्रीचा प्रत्येक टप्पा हा व्यक्तिमत्वाचा नवा उत्कृषबिंदू ठरावा,"

" मैत्रीचा प्रत्येक टप्पा हा व्यक्तिमत्वाचा नवा उत्कृषबिंदू ठरावा,"

                     000o000

                "  निखळ मैत्रीतली एक विलक्षण ताकद जर कोणती असेत तर त्यातली सहजता. त्या सहजते मधून सुरक्षितपणाची साय आपोआप धरते. साय दूधातूनच तयार होते आणि दुधावर छत धरते. साय म्हणजे गुलामी नव्हें. सावीखालच्या दुधाला साईचे दडपण वाटत नाही. मैत्री तशी असावी. दुधापेक्षा स्निग्ध. सायीची नंतरची सगळी स्थित्यंतर : म्हणजे दही, ताक, लोणी, तूप - ही जास्त जास्त पौष्टिकच असतात. तसं मैत्रीच घडाव. मैत्रीचा प्रत्येक टप्पा हा व्यक्तिमत्वाचा नवा उत्कृषबिंदू ठरावा. ज्यांच्या मैत्रीमुळे प्रगती खुंटते ती मैत्री संपण्याच्याच लायकीची असते. ह्याच दृष्टिकोनातून ज्या ज्या संसारात पतिपत्नीचं नातं मैत्रीसारखं राहील ते ते संसार टिकले. संसारात रुसवे _ फुगवे हवेत. चेष्टा - मस्करी हवी. जोडीदाराच्या व्यसंगात साथ हवी त्याप्रमाणे हक्काने ' आता तुमच्या एकूण एक गोष्टी माझ्यासाठी दूर ठेवा ' अस अतिक्रमण पण हवं. केवळ स्वतःच स्वास्थ आणि ऐषोराम जोपासण्यासाठी जोडीदाराला गुलाम करायचं नसतं.

वपुर्झा /110/Surendra /02032025