" आम्ही इतके कुणाला विकले गेलो? का गेलो? "
000o000
" काही मोजकी घर वगळली तर विवाह सोहळ्या निमित्त दरवाजावर लावलेलं तोरण जीर्ण व्हायच्या आतच सगळ्या वास्तूला विसंवादाची वाळ्वी लागल्याचं चित्र सर्वत्र दिसतंच. इतक्या झपट्याने अनेक ठिकाणी हेच चित्र का दिसावं? एकीकडे वेगवेगळ्या आकारांच्या, रंगांच्या, माध्यमांच्या कलापूर्ण मंगलपत्रिका छापल्या जाताहेत. प्रत्येक मंगल पत्रिकेगणिक गणपती बाप्पा नावीन्यपूर्ण फॉर्ममध्ये अवतार घेत आहेत. बुद्धीच्या ह्या देवतेला कलावंतांनी वेगवेगळे आकार दिले आणि त्या दैवतानेही चित्रकाराच्या कुंचल्यापेक्षा आपण जास्त लवचिक आहोत, हे सिद्ध केलं. प्रत्यक्ष विवाह सोहळ्यात तर पोरोहित्य करणाऱ्या गुरुजींपेक्षा जास्त महत्व व्हिडिओ कॅमेरामनला प्राप्त झालं आहे. मंत्रसंस्कारांच्या पावित्र्याकडून किती झपाट्याने बुद्धीवान समजला जाणारा आपला समाज, यांत्रिक झगमगाटाकडे वळतोय, त्याचं हे विदारक उदाहरण. खरं तर सगळ्या मंगलकार्यावर ' थिएटर्स ' चे फलक लावावेत. ' श्रुती मंगल थिएटर ', ' आनंद थिएटर ' असं म्हणावं. स्टुडिओतले कॅमेरे फक्त बटनच दाबायची अक्कल असलेल्या माणसांच्या हातात आले आणि संसारात रंग भरायचं कौशल्य, अर्पणभाव ह्या गुणांशी फारकत घेऊन आम्ही फक्त सोहळे सुशोभित करायला लागतो. आम्ही इतके कुणाला विकले गेलो? का गेलो?
वपुर्झा /153/Surendra /15042025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा