" कधी कधी, प्रतिभाशाली माणसं मीडीऑकर लोकांच्या घोळक्यात रमतांना दिसतात."
000o000
" प्रगल्भ बुद्धीच्या माणसाला तेव्हड्याच ताकदीची दुसरी व्यक्ती हवी असते. एकाच फ्रिकवेन्सिवरची.नाहीतर एकदम साधी, अनभिज्ञ, चटकन थक्क होणारी व्यक्ती. अशा व्यक्तीला एखाद्या पुस्तकाबद्दल सांगतांना उजळणीचा आनंद मिळतो. आपण किती लक्षात ठेवलंय, ह्याचा अंदाज येतो आणि जिथे जिथे थक्क झालो, विचारात पडलो, अस्वस्थ झालो ती ती सगळी स्पंदन समोरच्या व्यक्ती बरोबर पुन्हा जगता येतात. ' ही किती अफाट व्यक्ती आहे' असा भाव दुसऱ्याच्या डोळ्यात तरंगताना दिसल्याशिवाय, केलेल्या व्यासंगला कोंडणं मिळत नाही. बुद्धीवान माणसाची तीही एक गरज असते. म्हणूनच कीं काय, कधी कधी, प्रतिभाशाली माणसं मीडीऑकर लोकांच्या घोळक्यात रमतांना दिसतात.
वपुर्झा /153/Surendra /29042025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा