बुधवार, १५ डिसेंबर, २०२१

बुढापा

बुढ़ापे में आराम से रहने हेतु सुझाव.....

01. कम बोलें।

02. खाने पीने में संतोषी रहें।

03. प्रभु का स्मरण अवश्य करें। 04. प्राकृतिक जीवन शैली अपनाऐं।

07. अपनी ईच्छा पूर्ण कराने कि कोशिश न करें।

05. बहू बेटी के कार्य में दखल ना दें। 06. मनचाही वस्तु न मिलने पर क्रोध ना करें। 08. अपनी धन-सम्पति का बार-बार बखान ना करें 09. अपने परिवार की समस्याऐं दूसरों के सामने ना रखें। 11. अपने स्वास्थ्य के अनुसार घर के कामों में सहयोग करें।

10. घर पर आये व्यक्ति से अपने घर की कोई बुराई ना करें।

12. बुढ़ापे में कष्ट को कर्म फल समझकर खुशी-खुशी सहन करें।

13. यह आशा ना करें कि हर काम हमसे पूछ कर ही किया जाऐ।

14. ध्यान रहे कि प्रभु की कृपा से ही सब कुछ प्राप्त हुआ है,

खाली हाथ आऐ थे, और खाली हाथ ही जाना है।

रविवार, १२ डिसेंबर, २०२१

वेळ

वेळेला वेळ देणारी माणसं वेळेवर
भेटली की-समृद्धी
वेळ यायला वेळ 
लागत नाही.

शुक्रवार, १० डिसेंबर, २०२१

आपल्याला माहीत आहे का?

DID YOU KNOW THESE THINGS HAD NAMES? 1. The space between your eyebrows is called a glabella.

2. The way it smells after the rain is called petrichor.

3. The plastic or metallic coating at the end of your shoelaces is called an aglet.

4. The rumbling of stomach is actually called a wamble.

5. The cry of a new born baby is called a vagitus.

6. The prongs on a fork are called tines. 7. The sheen or light that you see when you close your eyes

and press your hands on them is called phosphenes. 8. The tiny plastic table placed in the middle of a pizza box

is called a box tent. 9. The day after tomorrow is called

overmorrow. 10. Your tiny toe or finger is called minimus.

11. The wired cage that holds the cork in a bottle of champagne is called an agraffe.

12. The 'na na na' and 'la la la', which don't really have any meaning in the lyrics of any song, are called vocables.

13. When you combine an exclamation mark with a question mark (like this?!), it is referred to as an interrobang.

14. The space between your nostrils is called columella nasi. 15. The armhole in clothes, where the sleeves are sewn, is called armscye.

16. The condition of finding it difficult to get out of the bed

in the morning is called dysania.

17. Illegible hand-writing is called griffonage.

18. The dot over an "i" or a "j" is called tittle. 19. That utterly sick feeling you get after eating or drinking

too much is called crapulence.

20. The metallic device used to measure your feet at the shoe store is called Bannock device.

HOW MANY OF THE ABOVE DID YOU ALREADY KNOW?

सोमवार, ६ डिसेंबर, २०२१

55 वर्षा नंतर या गोष्टीचा पश्चाताप होईल.

55 वर्षा नंतर या गोष्टींचा पश्चाताप होईल
1. तरुण असताना बिझनेस का चालू केला नाही ?
2. आरोग्यासाठी वेळ का दिला नाही ?
3. रिटायरमेंट साठी पैशांची बचत का केली नाही? 4. गुंतवणुकीची सुरुवात का केली नाही.
5. आपल्या परिवाराला वेळ दिला नाही.
6. स्वतःला फिरण्यासाठी वेळ दिला नाही. 7 त्यामुळे जे काही करायचे आहे त्याची आजच

9.सुरुवात करा..!

शनिवार, २७ नोव्हेंबर, २०२१

शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१

अहंकार

              निष्क्रिय माणसं आणि अतिअहंकारी माणसं शेवटी एकटी पडतात. आपल्या ह्याच स्वभावापायी आपण एकटे पडलो आहोत, हेही ते मान्य करीत नाहीत आणि तरीही त्यांपैकी काहींचं नशीबच इतकं चांगलं असतं की, अशा माणसांना सांभाळणारी माणसं त्यांना शेवटपर्यंत लाभतात. त्यामुळे आपलं आजवर काहीच चुकलेलं नाही, अशा समजुतीत ती आपला आळस आणि अहंकार दोन्हींचं जतन करतात. cp

लग्नाबद्दल तुम्हाला काय वाटते?

      अस म्हणतात लग्न हे मोतीचुर लाडवासारखे आहे जे खात नाहीत ते तर पस्तवतातच पण जे खातात तेही पस्तवतात.  पूर्वी एकत्र कुटुबव्यवस्था होती. आज विभक्त कुटुंब पद्धती आहे. याचा लग्न प्रथेवर खूप प्रभाव होता. वधू वर दोन्ही कुटुंबामध्ये विश्वासू मधस्थी असायचा. वधू वराची सविस्तर बारीकसारीक माहिती गुणदोष दोन्ही कुटुंबांना कळायचे त्यामुळे निर्णय घेणे सोपे पडायचे. दोन्ही कुटुंबांना वर/वधूचे व्यंग अथवा कुठलेही दोष लपाऊन ठेवणे सोपे नव्हते. पण मध्यस्थी मुळे लग्नबंधन तुटण्या इतके विकोपाला जात नसत.
              नंतर हळू हळू मध्यस्थी कडून लग्न जुळविण्याची पद्धत बंद झाली.  मग सुरू झाली नवी पद्धत. रजिस्टर विवाह नोंदणी संस्थे कडून लग्न जुळवणे. वधू वराने अशा संस्थे मधे फॉर्म भरताना जी माहिती दिलेली असते त्याची खातरजमा न करताच कॉम्प्युटर मधे फीड केली जाते. अनेकवेळा ती माहिती चुकीची असते. जसे मुलगा/मुलगी यांचे शिक्षण चुकीचे असणे. जन्म तारीख चुकीची असणे. एखादे उघडपणे समजून न येणारे व्यंग लपवणे.लग्न तर होऊन जातात पण कालांतराने जेव्हा अशा गोष्टी उघड होतात तेव्हा त्याचा शेवट घटस्फोट पर्यंत जातो. संसार काचेसारखा असतो एकदा तडा गेला की परत जुळत नाही. नाहीतर मन मारून आंधळेपणाने संसारगाडा जीवनाची अखेर केव्हा होणार याची वाट बघत बसण्यापेक्षा दुसरा पर्याय नसतो. सहनशक्ती पणाला लागते. वरून सुखी दिसणारे संसार आतून पोखरलेले असतात.
             हे झाले अरेंज लग्ना बद्दल. पण सगळ्यात उत्तम प्रेम विवाह. या प्रकारात वर वधू एकमेकांना ओळखत असतात. गुण दोषांची माहिती असते. स्वभाव माहिती असतात. वीक पॉइंट माहिती असतात. एकमेकांच्या घरच्यांशी जुळून घेतले की संसार सुखाचा होतो. फक्त प्रेमामध्ये संसार सुख सोडून दू स रे  गुप्त उद्दिष्ट नसावे ( जसे पैसा, प्रॉपर्टी, दुष्मनी ई.) 
             महत्वाचे म्हणजे,  वधू, वराची  जन्म पत्रिका कुंडली, जुळतेका नाही यापेक्षा आवड निवड, स्वभाव जुळणे महत्वाचे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे दोघांचे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट एक्सचेंज करावे. उद्देश एव्हढाच की काही आजार लग्नानंतर कळले की मानसिक धक्का बसतो. पण आधी कळल्यास त्यावर मात करण्याचे मार्ग मोकळे होतात. लग्नाचा उद्देश सुखी संसारच असतो नाही का ?

आनंदा शिवाय जीवन जगणे

प्रत्येकाला मन असत. थोडक्यात इच्छा असतात. त्याच आनंदी किंवा दुःखी असन हे दुसरे आपल्याशी कशे व्यवहार करतात यावर अवलंबून असत असे मानले जाते. समोरची व्यक्ती आपल्या मनासारखं वागली की ती व्यक्ती आपल्याला समजून घेते असे वाटते. याउलट समोरची व्यक्ती आपल्या मनाविरुद्ध वागली की ती व्यक्ती आपल्याला समजून घेते नाही असे वाटणे स्वाभाविक आहे. पण समोरच्या व्यक्तीने आपल्या मनासारखे का वागावे ? आपल्याला समजूनच का घ्यावे ? असा पण विचार करायला हरकत नाही. जसे आपल्याला कोणी समजून घेत नाही ही भावना तयार होऊ शकते तशी ती भावना दुसऱ्याच्या मनात पण तयार होऊ शकते. आपल्याला कोणी समजून घेणे व आपण दुसऱ्याला समजून घेणे हे दोन्ही व्यक्तींकडून समानतेने आचरणात आणले गेले पाहिजे तरच आपल्याला कोणी समजाऊन घेत नाही अशी भावना कोणाचाही मनात येणार नाही.  दुसऱ्याने आपल्या मनासारखं वागण्याची अपेक्षा ठेवणे बरोबर आपण पण दुसऱ्याच्या मनासारखे वागतो का ? याची खात्री करून घेतली पाहिजे. 

आऊष्य

सोबत काही येत नाही..ji स्वतः आनंदाने जगा... दुसर्यालाही जगु द्या..!!

चांगलं करता येत नसेल तर, निदान वाईटही करु नका...

आयुष्याच्या कोणत्या वळनावर कोणाचा तळतळाट आडवा जाईल.... सांगता यायचं नाही..!!

पैसा कमी असला तरी चालेल भरपुर माणसे कमवा... आयुष्य माणसांशिवाय जगता येत नाही....

शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

साहित्य प्रसूती

साहित्य निर्मिती क्षेत्रात विशेषतः कवी वा लेखक यांच्या संदर्भात येथे विचार करणार आहोत. बाळ जन्माला येणे आधी स्त्री ला जीवघेण्या कळा, प्रसूती वेदना सहन कराव्या लागतातच. त्याच प्रमाणे कवी किंवा लेखकांकदून साहित्य प्रसूतीच्या वेदना होत असतात. साहित्य निर्मितीची ठरावीक वेळ, मुहूर्त असा नसतो, जसा बाळ जन्माला ही नसतो. जशी स्त्री ची एकप्रकारे तडफड अशा प्रसंगात होत असते तशीच परिस्थिती कवी/लेखक वर्गाची होत असते. केव्हा एकदा सुखरूप बाळंत होऊ असे त्या स्त्रीला सारखे वाटत असते, त्याच प्रमाणे लेखक/कवींना केव्हा एकदा साहित्य प्रसूती होऊन मोकळे होऊ असे वाटत असते.  अशा वेळी रात्री 2 वाजता उठून सुचलेले विचार कागदावर लिहून काढावयासे वाटत. कधीकधी जेवण अर्धवट टाकून टेबलावर जाऊन लिहावेसे वाटते. आता कागदावर लिहिणे हा प्रकार राहिला नाही कारण क था/कविता आता कॉम्पुटर, लॅबटॉप वर वर्ड फाईल ओपन करून लिहिता येते. साहित्य प्रसूती ही मूड वर फार अवलंबून असते. क था लिहीत असताना कोणी परिचित घरी आला व विचारले की " काय काका नवीन कथा लिहिणे चालू आहे वाटत" झालं लगेच मूड जातो. लिखाण थांबते. परत मूड यायला, विचार सुचायला कधी कधी दोन दिवस निघून जातात. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे, आई ला समोर थांबउन बाळ शी करायला बसते. आई सारखं दोन दोन मिनिटांनी विचारत असते बाळा शी झाली का? आटोप लवकर. तसतसे बाळ नुसता बसून राहतो, कारण त्याला शी होतच नसते. असाच काहीसा प्रकार साहित्य प्रसूती वेळी होत असतो. अनेकांचा असाच अनुभव असणार ही खात्री आहे.

मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१

रविवार, ७ नोव्हेंबर, २०२१

" Life : जीवन

" Life " 

 समय चला , पर कैसे चला,
 पता ही नहीं चला , 
 ज़िन्दगी की आपाधापी में ,
 कब निकली उम्र हमारी यारो ,
*पता ही नहीं चला ,*

कंधे पर चढ़ने वाले बच्चे 
कब कंधे तक आ गए ,
*पता ही नहीं चला ,*

किराये के घर से शुरू हुआ था सफर अपना ,
कब अपने घर तक आ गए ,
*पता ही नहीं चला ,*

साइकिल के पैडल मारते हुए                      हांफते थे उस वक़्त, 
कब से हम कारों में घूमने लगे हैं ,
*पता ही नहीं चला ,*

कभी थे जिम्मेदारी हम माँ बाप की ,
कब बच्चों के लिए हुए जिम्मेदार हम ,
*पता ही नहीं चला ,*

एक दौर था जब दिन में भी 
बेखबर सो जाते थे ,
कब रातों की उड़ गई नींद ,
*पता ही नहीं चला ,*

जिन काले घने बालों पर 
इतराते थे कभी हम ,
कब सफेद होना शुरू हो गए
*पता ही नहीं चला ,*

दर दर भटके थे नौकरी की खातिर ,
कब रिटायर हो गए  समय  का ,
*पता ही नहीं चला ,*

बच्चों के लिए कमाने बचाने में   
इतने मशगूल हुए हम ,
 कब बच्चे हमसे हुए दूर ,
*पता ही नहीं चला ,*

भरे पूरे परिवार से सीना चौड़ा रखते थे हम ,
अपने भाई बहनों पर गुमान था ,
उन सब का साथ छूट गया ,
कब परिवार हम दो पर सिमट गया ,
*पता ही नहीं चला ,* 

अब सोच रहे थे  अपने 
लिए भी कुछ करे ,
पर शरीर  ने साथ देना बंद कर दिया ,
*पता ही नहीं चला*
It's truth of life
forwarded

म्हणून ताटात उष्टे टाकू नये...*

*म्हणून ताटात उष्टे टाकू नये...*

ताटातलं पूर्ण अन्न संपवणाऱ्या एका युवकाचे मित्र त्याची थट्टा करायचे.अशातच एकदा एका मित्राने त्याला विचारले की,तू रोज ताटात एक कण सुद्धा का सोडत नाही. त्यावर त्या युवकाने उत्तर दिले,

तो म्हणाला..याची तीन कारणे आहेत. 
१) हा माझ्या वडिलांप्रति आदर आहे.जे हे अन्न मेहनतीने कमावलेल्या रुपयांनी विकत घेतात.
२) हा माझ्या आईविषयीचा आदर आहे.जी सकाळी लवकर उठून मोठ्या चवीने हे अन्न शिजवते.
३) हा माझ्या देशातल्या त्या शेतकऱ्यांविषयीचा आदर आहे जे शेतांत उपाशी राहून खूप मेहनत घेऊन  ते पिकवतात.
म्हणून शक्यतो 
ताटात उष्ट अन्न टाकू नये.
Cp

रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

Nasik city detail information.

https://lm.facebook.com/l.php?u=https%3A%2F%2Fwww.inmarathi.com%2F50557%2Fnashik-city-near-pune-has-some-interesting-facts%2F%3Futm_source%3Dd1&h=AT0thaT51vxfVtDJJkJ1kLf5LMDE8dVW9gSiUY2ymZcrjExyLF4wr9Lb0eHqTCWEByULB6iSzAm4pPc_qwVj9JePYShiH1nI5JtYBKOPQM_qTH0Lnm5CiC3L93hm-P8osG_VGIjIYzGtZ4sycGOc

शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

पंच महाभूतांच्या मंदिरांचे रहस्य...

* पंच महाभूतांच्या मंदिरांचे रहस्य...
अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या कळल्या तर आपण अक्षरशः थक्क होतो. थिजून जातो. आज ज्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटतात, त्या अडीच/तीन हजार वर्षांपूर्वी आपल्या भारतीयांना कशा काय निर्माण करता आल्या असतील हे प्रश्नचिन्ह मोठं होत जातं...
हिंदू तत्वज्ञानामधे पंच महाभूतांचे विशेष महत्त्व आहे. पाश्चात्य जगताने देखील ह्या संकल्पना मान्य केल्या आहेत. डेन_ब्राऊन सारखा लोकप्रिय लेखक सुध्दा या संकल्पनेचा उल्लेख करतो, त्यावर कादंबरी लिहितो.
ही पंच महाभूतं म्हणजे जल, वायू, आकाश, पृथ्वी आणि अग्नी. आपलं सारं जीवनचक्र या पंच महाभूतांच्या आधाराने गुंफलेलं असतं अशी मान्यता आहे.
आपल्या देशामध्ये या पंच महाभूतांची भव्य आणि वैशिष्ठ्यपूर्ण मंदिर आहेत हे आपल्यापैकी किती जणांना माहीत असेल ?
फार थोड्या लोकांना. त्यातून ते जर शंकराचे उपासक असतील तर हे माहीत असण्याची थोडी तरी शक्यता आहे. कारण ह्या पंच महाभूतांची मंदिरं म्हणजे शिव मंदिर,भगवान शंकराची मंदिर आहेत. पण यात काही मोठं वैशिष्ठ्य किंवा रहस्य नाही.
* मग वैशिष्ठ्य कशांत आहे...?
पंच महाभूतांच्या ह्या पाच मंदिरांचं वैशिष्ठ्य किंवा रहस्य यात आहे की यातील तीन मंदिरं, जी एकमेकांपासून काही शे किलोमीटर लांब आहेत, ती एका सरळ रेषेत आहेत..!
होय. अक्षरशः एका सरळ रेषेत आहेत..!!
]]] ती तीन मंदिर आहेत [[[
१. श्री कालहस्ती मंदिर
२. श्री एकंबरेश्वर मंदिर,कांचीपुरम
३. श्री तिलई नटराज मंदिर, त्रिचनापल्ली
आपण पृथ्वीवर एखादी जागा ठरविण्यासाठी कोआर्डिनेटस चा उपयोग करतो, ज्याला आपण अक्षांश आणि रेखांश म्हणतो. यातील अक्षांश (Lattitude) म्हणजे पृथ्वीवर आडव्या मारलेल्या (काल्पनिक) रेघा. जसं विषुववृत्त, कर्कवृत्त वगैरे. आणि रेखांश (Longitude) म्हणजे उभ्या मारलेल्या (काल्पनिक) रेघा.
या तीन मंदिरांचे अक्षांश–रेखांश आहेत
१.श्री कालहस्ती मंदिर 13.76 N 79.41 E वायू
२.श्री एकंबरेश्वर मंदिर 12.50 N 79.41 E पृथ्वी
३.श्री तिलई नटराज मंदिर 11.23 N 79.41 E आकाश
यातील रेखांश हा तिन्ही मंदिरांसाठी 79.41 E आहे. अर्थात तिन्ही मंदिरं एका सरळ रेषेत आहेत. कालहस्ती आणि एकंबरेश्वर मंदिरांमधील अंतर सव्वाशे किलोमीटर आहे तर एकंबरेश्वर आणि तिलई नटराज मंदिरांमधील अंतर हे पावणे दोनशे किलोमीटर आहे. ही तिन्ही मंदिरं नक्की केंव्हा बांधली, ते सांगता यायचं नाही. या भूभागावर राज्य केलेल्या पल्लव, चोल इत्यादी राजांनी ह्या मंदिरांचे नूतनीकरण केल्याचे उल्लेख सापडतात. पण किमान तीन हजार वर्षांपेक्षाही जास्त, ही मंदिरं जुनी असतील हे निश्चितपणे म्हणता येईल.
आता इथे खरं आश्चर्य हे आहे, की साधारण तीन हजार वर्षांपूर्वी, इतक्या लांबच्या लांब अंतरावरील ही मंदिरं एकाच उभ्या सरळ रेषेत कशी बांधली असतील..?
याचा अर्थ, त्या काळात नकाशाशास्त्र इतकं प्रगत होतं की,  अक्षांश–रेखांशांच ज्ञान त्यांना होतं ? पण अक्षांश–रेखांशांचं परिपूर्ण ज्ञान असलं तरी एका सरळ रेषेत मंदिर बांधण्यासाठी नकाशा शास्त्राबरोबरच कंटूर मेपचं ज्ञान त्यांना आवश्यक होतंच!
की, इतर कुठली एखादी पध्दत त्या काळात वापरली गेली, जी आज काळाच्या पडद्याआड गेलेली आहे..?
सारंच अतर्क्य.....!
ही गंमत इथेच संपत नाही, तर इतर दोन मंदिरांबरोबर जेंव्हा ह्या एका सरळ रेषेत असलेल्या मंदिरांना जोडलं जातं, तेंव्हा झालेल्या रचनेतून विशिष्ट कोण निर्माण होतात.
याचा अर्थ, त्या काळातली आपल्या वास्तुविशारदांची झेप लक्षात घ्या. जमिनीच्या, काही हजार चौरस किलोमीटर पसरलेल्या भूभागावर ते पंच महाभूतांच्या पाच शैव मंदिरांचा मोठा पट मांडतात.आणि त्या रचनेतून आपल्याला काही_सुचवू पाहतात. आपलं दुर्भाग्य की आपण त्यांची ती ज्ञानाची कूट भाषा समजू शकत नाही.
या पंच महाभूतांच्या मंदिरांपैकी एक मंदिर आंध्र प्रदेशात आहे, तर उरलेली चार, तामिळनाडू मधे आहेत. 
१. यातील वायू तत्वाचं प्रतिनिधित्व करणारं, श्री कालहस्ती मंदिर.
हे आंध्र प्रदेशातल्या चितूर जिल्ह्यांत, तिरुपतीहून साधारण पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे. स्वर्णमुखी या लहानश्या नदीच्या तीरावर हे मंदिर उभारलेले आहे. हजारों वर्षांपासून ह्याला ‘दक्षिण कैलास’ किंवा ‘दक्षिण काशी’ म्हटले जाते.
हे मंदिर अत्यंत प्राचीन असले तरी मंदिराचा आतला गाभाऱ्याचा भाग पाचव्या शतकात तर बाहेरचा, गोपुरांचा भाग हा अकराव्या शतकात बांधलेला आहे. पल्लव, चोल आणि नंतर विजयनगर च्या राजांनी ह्या मंदिराची डागडुजी आणि बांधकाम केल्याचे उल्लेख सापडतात. आदी शंकराचार्य ह्या मंदिरात येऊन गेल्याचे उल्लेख अनेक साहित्यात मिळतात. खुद्द शं‍कराचार्यांच्या ‘शिवानंद लहरी’ मधे ह्या मंदिराचा आणि येथील ‘भक्त कणप्पा’ चा उल्लेख आहे.
हे मंदिर पंच महाभूतांपैकी वायू तत्वाचे प्रतिनिधित्व करते. याचे काही चित्तवेधक संदर्भ मिळतात/दिसतात.
या मंदिरातील शिवलिंग हे पांढरे असून ते स्वयंभू आहे असे मानले जाते. या शिवलिंगाला (हे वायुतत्व असल्यामुळे) कधीही स्पर्श केला जात नाही. मंदिराचे पुजारी सुध्दा ह्या मुख्य लिंगाला कधीच स्पर्श करीत नाहीत. अभिषेकासाठी आणि पूजेसाठी एक वेगळे उत्सव लिंग बाजूला ठेवले आहे. गंमत म्हणजे ह्या मंदिराच्या गाभार्‍यात एक दिवा सतत जळत असतो आणि तो सतत फडफडत असतो. हे थोडं नीट समजून घेतलं पाहिजे. कारण मंदिराचा गाभारा हा लहान असुन त्याला कोठेही हवा यायला जागा नाही. पुजाऱ्यांनी मुख्य द्वार बंद केलं तरी त्या दिव्याच्या ज्योतीचं फडफडणं चालूच असतं..! कुठलाही वारा नसताना, दिव्याची ज्योत फडफडत राहणं हे कां होतं ?
याचं कोणतंही शास्त्रीय कारण आजतागायत मिळू शकलेलं नाही.
मात्र येथील शिवलिंग हे वायुतत्व असल्याने दिव्याची ज्योत सतत फडफडत असते, असं येथील लोकांचं म्हणणं आहे!!
या मंदिरापासून साधारण सव्वाशे किलोमीटर दक्षिणेला अगदी सरळ रेषेत पंच महाभूतांपैकी दुसरे मंदिर आहे – 
२ श्री एकंबरेश्वराचे मंदिर.
तामिळनाडूच्या प्रसिध्द कांचीपुरम मधे हे पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधित्व करणारे मंदिर आहे.
पृथ्वी तत्व असल्याने हे शिवलिंग मातीचे बनले आहे. असे मानले जाते की शिवशंकराच्या प्राप्तीसाठी एका आंब्याच्या झाडाखाली, पार्वतीने आराधना केली. आणि ती देखील मातीच्या शिवलिंगाच्या स्वरूपाची. म्हणूनच ह्याला एकंबरेश्वर म्हणतात. तामिळ मधे एकंबरेश्वर म्हणजे आंब्याच्या झाडाचा देव. आजही मंदिराच्या आवारात एक प्राचीन आंब्याचे झाड उभे आहे. कार्बन_डेटिंग ने ह्या झाडाचे वय साडेतीन हजार वर्षे निघाले आहे, असे म्हटले जाते. ह्या झाडाला चार वेदांचे प्रतीक समजले जाते. असं म्हणतात, ह्या झाडाला चार वेगवेगळ्या स्वादाचे आंबे लागतात.
हे मंदिर, ‘कांचीपुरम’ ह्या मंदिरांच्या शहरात आहे. कांचीपुरम हे ‘कांजीवरम’ साड्यांसाठी जगप्रसिध्द आहे.ह्या मंदिरात तामिळ, तेलगु, इंग्रजी आणि हिंदीत एक फलक लावलाय की हे मंदिर ३,५०० वर्ष जुनं आहे. नेमकं किती जुनं हे सांगता येणं कठीण आहे. पुढे पाचव्या शतकात पल्लव, नंतर चोल आणि पुढे विजयनगर च्या राजांनी ह्या मंदिराची डागडुजी केल्याचे उल्लेख आढळतात.
ह्या दोन मंदिरांच्याच अगदी सरळ रेषेत, दक्षिण दिशेत, ह्या एकंबरेश्वर मंदिरापासून साधारण पावणे दोनशे किलोमीटर अंतरावर पंच महाभूतांचे तिसरे मंदिर आहे – 
३ तिलई नटराज मंदिर. आकाश तत्वाचे प्रतिनिधित्व करणारे हे मंदिर, तामिळनाडू च्या चिदंबरम या शहरात आहे.
खुद्द पतंजली ऋषींनी स्थापन केलेले हे अत्यंत प्राचीन असे मंदिर आहे. नेमके केंव्हा बांधले हे सांगणं कठीण आहे. मात्र पाचव्या / सहाव्या शतकात, पल्लव आणि चोल राजांनी याची डागडुजी आणि काही नवीन बांधकाम केल्याचे उल्लेख आढळतात. ह्या मंदिरात ‘भरतनाट्यम’ च्या १०८ विभिन्न मुद्रा दगडी खांबांवर कोरलेल्या आहेत. याचाच अर्थ, अत्यंत विकसित असं भरत नाट्यम हे नृत्य शास्त्र काही हजार वर्षांपूर्वी सुध्दा अस्तित्वात होतं, हे सिध्द होतं..!
मात्र
कोठेही खांबांवर, शंकराच्या अनेक मुद्रा कोरल्या असल्या तरी, नटराज ची मूर्ती किंवा मुद्रा कोरलेली नाही. ती मुख्य गर्भगृहात विराजमान आहे.
येथे भगवान शंकर हे नटराजाच्या रुपात असुन सोबत शिवकामी अर्थात पार्वती ची प्रतिमा ही आहे. मात्र नटराजाच्या रूपातील शिवप्रतिमेच्या उजव्या बाजूला थोडी मोकळी जागा आहे, तिला ‘चिदंबरा रहस्यम’ असे म्हटले जाते. या मोकळ्या जागेला सोन्याच्या चकत्यांच्या हारांनी सजवले जाते. येथील मान्यतेनुसार ही मोकळी जागा, मोकळी नसून ते (आकारहीन) आकाशतत्व आहे.
पूजेच्या वेळा सोडून इतर वेळी ही मोकळी जागा लाल पडद्याने आच्छादित असते. पूजेच्या वेळेला हा लाल पडदा बाजूला करून त्या (आकारहीन) शिव तत्वाची अर्थात आकाश तत्वाची पूजा केली जाते.अशी मान्यता आहे की येथे शिव आणि कालीमातेच्या स्वरुपात पार्वती, ह्यांनी नृत्य केले होते.
ह्या चिदंबरम पासून साधारण चाळीस किलोमीटर अंतरावर कावेरी नदी समुद्राला जाऊन मिळते. या भागात आठव्या/नवव्या शतकात चोल राजांनी जहाजांसाठी गोदी बांधली होती. ह्या जागेचं नाव आहे – पुम्पुहार. एके काळी हे फार मोठे आणि पूर्व किनाऱ्यावरचे फार प्रसिध्द बंदर होते. आज मात्र ते एक लहानसे गाव राहिले आहे.
या पुम्पुहार मधे काही वर्षांपूर्वी पुरातत्व विभागाने उत्खनन केलं आणि त्यांना अक्षरशः खजिना गवसला.
सुमारे दोन/अडीच हजार वर्षांपुर्वीचे एक अत्यंत समृध्द आणि विकसित शहर त्यांना सापडले. या नगराचे नियोजन, त्यातील रस्ते, घरं, नाल्या, पाण्याचा निचरा इत्यादी गोष्टी बघून आजही थक्क व्हायला होतं.
एकुणात काय, तर आजपासून किमान दोन/तीन हजार वर्षांपूर्वी ह्या परिसरात एक अत्यंत समृध्द आणि विकसित अशी संस्कृती नांदत होती, ज्या संस्कृतीने पंचमहाभूतांच्या पाच मंदिरांचा एक मोठा पट, ह्या विशाल जागेत मांडला होता..!
ह्या तीन मंदिरांनी तयार केलेल्या सरळ रेषेशी विशिष्ट कोण करून उभं आहे,
 पंच महाभूतांपैकी चौथं मंदिर
४ जंबुकेश्वर मंदिर. त्रिचनापल्ली जवळ, तिरुवनाइकवल गावात हे मंदिर आहे. पंच महाभूतांपैकी जल तत्वाचे प्रतिनिधित्व करणारे, कावेरी नदीच्या उत्तर किनाऱ्यावर असलेल्या ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे शिवलिंगाखाली पाण्याचा लहानसा पण खळाळता झरा आहे. त्यामुळे हे शिवलिंग सतत पाण्यात बुडलेले असते.
ब्रिटीश काळात फर्ग्युसन ह्या पुरातत्ववेत्त्याने या मंदिराबाबत बरेच संशोधन केले, जे अनेकांनी प्रमाण मानले. त्याच्या मते चोल वंशाच्या प्रारंभिक काळात या मंदिराचे निर्माण झाले. मात्र त्याची निरीक्षणं_चुकीची_होती हे आता समोर येतंय. मंदिरात आढळलेल्या एका शिलालेखावरून हे मंदिर इसवी सनापूर्वी काही शे वर्ष अस्तित्वात होते हे सिध्द झालेले आहे.
त्या सरळ रेषेत असलेल्या तीन मंदिरांशी विशिष्ट कोण केलेले, पंच महाभूतांच्या मंदिरांपैकी शेवटचे, मंदिर आहे –
५. अरुणाचलेश्वर मंदिर. तामिळनाडू च्या तिरुअन्नामलई मधे असलेलं हे मंदिर, पंच महाभूतांच्या अग्नी तत्वाचे प्रतिनिधित्व करते. भारतातल्या मोठ्या मंदिरांपैकी हे एक आहे. एका पहाडावर बांधलेले हे मंदिर, विशाल परिसरात पसरलेले आहे. सातशे फुटांपेक्षा जास्त उंच असलेल्या भिंतींच्या आत बांधलेल्या ह्या मंदिराच्या गोपुरांची उंची १४ मजली इमारती च्या बरोबर आहे.
ही पाच शिव मंदिरं आणि त्यांची जमिनीवरची रचना अक्षरशः अद्भुत आहे. यातील तीन मंदिरं एका सरळ रेषेत असणं हा योगायोग असू शकत नाही. अत्यंत विचारपूर्वक, आंध्र आणि तामिळनाडू च्या विस्तीर्ण पटावर बांधलेली ही मंदिरं म्हणजे चमत्कार आहे. त्यांच्या रचनेतून निर्माण होणारी कूट भाषा आपण जर समजू शकलो तर प्राचीन काळातील ज्ञानाची अनेक रहस्यं आपल्यापुढे उलगडू शकतील..!! 🙏🙏
लेखक :अनामिक 
FORWARDED AS RECEIVED

शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

निरपेक्ष स्पंदने

मनाच्या गाभा-यातुन उमटलेली स्पंदने निरपेक्ष असली की कुठल्याही नात्यांच्या धाग्यात विश्वासाचे मणी अलगदपणे ओवले जातात

गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०२१

प्यादी मरण्यासाठीच का ?

प्यादी मरण्यासाठीच का ❓?????
 अनेक  दिवसांपासून डोक्यात असलेला_
       _*' प्रश्न '*_
       _आहे की _
*.* *बुद्धिबळात* दोन्ही बाजूकडून *प्यादीच*
       पुढे का असतात ?
_*.* *उभा-आडवा* मारा करु शकणारे *बलदंड__*हत्ती,*_
_*.* कानाकोपऱ्यातून *तिरप्या* चालीने वेध घेऊ *.* शकणारे *काटक**उंट,*_
*.* उलटसुलट *अडीच घरां* पल्याड जाऊन हल्ला*.* चढवू शकणारी_*घोडी,*_
*.* सर्वशक्तिमान_*वजीर*_
*.* आणि*.* महामहीम_*बादशहा*_
*.* एवढी सारी  *मातब्बर*_ मंडळी *मागच्या रांगेत*
*.आणि तोफेच्या तोंडी**.*कोण तर *.* स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व नसलेली ,* किरकोळ देहयष्टीची
* एक-एक घर पुढे सरकणारी *प्यादी !*
* *हा म्हणजे झाडाने सावलीत बसण्यातला प्रकार झाला !*_
* बरं  इतर सर्व मोहरे प्रकरण अंगाशी आले तर *मागे* फिरु शकतात. प्याद्यांना ती *मुभा* नाही.
एवढंच काय जीवाच्या आकांताने
एखाद्या प्याद्याने शत्रुचा प्रदेश पादाक्रांत करून अंतिम रेषा गाठलीच तरी_  *पुनरुज्जीवन प्रतिष्ठितांचेच* होणार.
* तसा रिवाजच आहे !
 थोडक्यात काय तर  प्यादी जन्माला येतात  ती *बळी* जाण्यासाठीच. *प्याद्यांनी* फक्त *लढायचं,*
* तेही समोरच्या *प्याद्यांविरुद्धच.*
*का ?* ते विचारायचं नाही.
* सरपटत-फरफटत प्यादी लढणार, झगडणार, मरणार..* स्मारकं मात्र *प्रतिष्ठितांचीच* उभारली जाणार.
* इतिहासाची पानही डामडौल्यांचीच नोंद घेणार.* उदोउदोही मानकर्‍यांचाच होणार.
* कारण, तसाच *रिवाज* असतो!
*कार्यकर्त्यांनी समजून घ्या !*
 *आणि जर इच्छा झालीच*
 *राजकारणातून बाजूला होऊन व्यवसायाकडे*__*वळा..........*_
*स्वतः कडे, स्वतःच्या कुटूंबाकडे, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या*
*गुलाम बनून आयुष्याचं मातेर नका करून घेऊ.*
*कुठलाही राजकीय पक्ष , राजकीय नेता तुम्हाला प्यादी म्हणूनच वापरत असतो.*
*अशी प्यादी आजकाल सोशल मीडिया वर जास्तच कार्यरत असतात.*
*म्हणून स्वतः प्यादी बनायचं की नाही हे ठरविता आलं तरच शिक्षणाचा उपयोग आहे.*

*कृपया प्यादी बनू नका...बुद्धिवादी व्हा....*
Cp

मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

निशब्द

निशब्द...
पिकलेल्या आंब्यांना गळती लागायचे दिवस होते, दुर्दैवाने माणसांनाच गळती लागायला लागली... 'रस' प्यायच्या दिवसांत 'लस' घ्यायचे दिवस आले.... जितक्या सहजतेने लोक 'सॉरी', 'थँक्स' म्हणायचे, तितक्याच सहजतेने 'भावपूर्ण श्रद्धांजली' म्हणायला लागले आहेत्... आयुष्यभर मर-मर करून कमावलेली धन-दौलत,गाडी-बंगला, अधिकार, पद, मान-सन्मान, खुर्ची इ. सगळं सगळं सोडून जावं लागतं. लोक फार फार तर 'इमोशनल' लिहीतील... चार-दोन दिवस स्टेटस, डी पी ठेवतील.... पुन्हा पुढचा जाईल तसा डी पी बदलत राहील... "फोटो आभास' देतो, 'स्पर्श' नाही."  
म्हणून,
" जे आहेत तोवर परस्परांशी  सौहार्दपणे वागणं, सहकार्य करणं, भेटण-बोलणं झालं पाहिजे. "
Cp

शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

नाती

'नाती' नात्यात सगळ्यात महत्त्वाची असते.. 
जाणीव 
असेल तर परकी माणसंही आपली होतात, आणि 
जाणीव
नसेल तर आपल्या माणसांना परकं व्हायला वेळ लागत नाही..!

जीवन सार

|| ठेव कुणासाठी ॥

या जगात आपले स्वतःचे असे काहीही नाही. जे काही आपले आपल्या जवळ आहे ती आपली तात्पुरती ठेव आहे.

पुत्र ही सुनेची ठेव आहे. कन्या ही जावयाची ठेव आहे. जिवन हे मुत्युची ठेव आहे. आणि शरीर हे स्मशानाची ठेव आहे. एक दिवस प्रत्येकाला दिसेल की तुमचा मुलगा सुनेचा होईल. मुलीला जावाई घेऊन जाईल. जिवन मुत्युला शरण जाईल. आणि शरीर स्मशानातल्या राखेत मिसळेल. जिवनाचा सर्वात मोठा गुरू काळ असतो. कारण काळ जे शिकवतो ते कोणीच शिकवत नाही. तेव्हा ठेव ही ठेव म्हणूनच सांभाळा. तिच्यावर मालकी हक्क गाजवू नका. आपण कितीही हुशार असलात तरी आपण माणसाने माणसासाठी कसे वागावे हे जर माहीत नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही. समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ती अंतःकरनाची

संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो. दुसऱ्याच हिसकावून खाणाऱ्याच पोट कधी भरत नाही. आणि वाटुन खाणारा कधी उपाशी मरत नाही..!!!