शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१
आनंदा शिवाय जीवन जगणे
प्रत्येकाला मन असत. थोडक्यात इच्छा असतात. त्याच आनंदी किंवा दुःखी असन हे दुसरे आपल्याशी कशे व्यवहार करतात यावर अवलंबून असत असे मानले जाते. समोरची व्यक्ती आपल्या मनासारखं वागली की ती व्यक्ती आपल्याला समजून घेते असे वाटते. याउलट समोरची व्यक्ती आपल्या मनाविरुद्ध वागली की ती व्यक्ती आपल्याला समजून घेते नाही असे वाटणे स्वाभाविक आहे. पण समोरच्या व्यक्तीने आपल्या मनासारखे का वागावे ? आपल्याला समजूनच का घ्यावे ? असा पण विचार करायला हरकत नाही. जसे आपल्याला कोणी समजून घेत नाही ही भावना तयार होऊ शकते तशी ती भावना दुसऱ्याच्या मनात पण तयार होऊ शकते. आपल्याला कोणी समजून घेणे व आपण दुसऱ्याला समजून घेणे हे दोन्ही व्यक्तींकडून समानतेने आचरणात आणले गेले पाहिजे तरच आपल्याला कोणी समजाऊन घेत नाही अशी भावना कोणाचाही मनात येणार नाही. दुसऱ्याने आपल्या मनासारखं वागण्याची अपेक्षा ठेवणे बरोबर आपण पण दुसऱ्याच्या मनासारखे वागतो का ? याची खात्री करून घेतली पाहिजे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा