*म्हणून ताटात उष्टे टाकू नये...*
ताटातलं पूर्ण अन्न संपवणाऱ्या एका युवकाचे मित्र त्याची थट्टा करायचे.अशातच एकदा एका मित्राने त्याला विचारले की,तू रोज ताटात एक कण सुद्धा का सोडत नाही. त्यावर त्या युवकाने उत्तर दिले,
तो म्हणाला..याची तीन कारणे आहेत.
१) हा माझ्या वडिलांप्रति आदर आहे.जे हे अन्न मेहनतीने कमावलेल्या रुपयांनी विकत घेतात.
२) हा माझ्या आईविषयीचा आदर आहे.जी सकाळी लवकर उठून मोठ्या चवीने हे अन्न शिजवते.
३) हा माझ्या देशातल्या त्या शेतकऱ्यांविषयीचा आदर आहे जे शेतांत उपाशी राहून खूप मेहनत घेऊन ते पिकवतात.
म्हणून शक्यतो
ताटात उष्ट अन्न टाकू नये.
Cp
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा