नंतर हळू हळू मध्यस्थी कडून लग्न जुळविण्याची पद्धत बंद झाली. मग सुरू झाली नवी पद्धत. रजिस्टर विवाह नोंदणी संस्थे कडून लग्न जुळवणे. वधू वराने अशा संस्थे मधे फॉर्म भरताना जी माहिती दिलेली असते त्याची खातरजमा न करताच कॉम्प्युटर मधे फीड केली जाते. अनेकवेळा ती माहिती चुकीची असते. जसे मुलगा/मुलगी यांचे शिक्षण चुकीचे असणे. जन्म तारीख चुकीची असणे. एखादे उघडपणे समजून न येणारे व्यंग लपवणे.लग्न तर होऊन जातात पण कालांतराने जेव्हा अशा गोष्टी उघड होतात तेव्हा त्याचा शेवट घटस्फोट पर्यंत जातो. संसार काचेसारखा असतो एकदा तडा गेला की परत जुळत नाही. नाहीतर मन मारून आंधळेपणाने संसारगाडा जीवनाची अखेर केव्हा होणार याची वाट बघत बसण्यापेक्षा दुसरा पर्याय नसतो. सहनशक्ती पणाला लागते. वरून सुखी दिसणारे संसार आतून पोखरलेले असतात.
हे झाले अरेंज लग्ना बद्दल. पण सगळ्यात उत्तम प्रेम विवाह. या प्रकारात वर वधू एकमेकांना ओळखत असतात. गुण दोषांची माहिती असते. स्वभाव माहिती असतात. वीक पॉइंट माहिती असतात. एकमेकांच्या घरच्यांशी जुळून घेतले की संसार सुखाचा होतो. फक्त प्रेमामध्ये संसार सुख सोडून दू स रे गुप्त उद्दिष्ट नसावे ( जसे पैसा, प्रॉपर्टी, दुष्मनी ई.)
महत्वाचे म्हणजे, वधू, वराची जन्म पत्रिका कुंडली, जुळतेका नाही यापेक्षा आवड निवड, स्वभाव जुळणे महत्वाचे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे दोघांचे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट एक्सचेंज करावे. उद्देश एव्हढाच की काही आजार लग्नानंतर कळले की मानसिक धक्का बसतो. पण आधी कळल्यास त्यावर मात करण्याचे मार्ग मोकळे होतात. लग्नाचा उद्देश सुखी संसारच असतो नाही का ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा