शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१
साहित्य प्रसूती
साहित्य निर्मिती क्षेत्रात विशेषतः कवी वा लेखक यांच्या संदर्भात येथे विचार करणार आहोत. बाळ जन्माला येणे आधी स्त्री ला जीवघेण्या कळा, प्रसूती वेदना सहन कराव्या लागतातच. त्याच प्रमाणे कवी किंवा लेखकांकदून साहित्य प्रसूतीच्या वेदना होत असतात. साहित्य निर्मितीची ठरावीक वेळ, मुहूर्त असा नसतो, जसा बाळ जन्माला ही नसतो. जशी स्त्री ची एकप्रकारे तडफड अशा प्रसंगात होत असते तशीच परिस्थिती कवी/लेखक वर्गाची होत असते. केव्हा एकदा सुखरूप बाळंत होऊ असे त्या स्त्रीला सारखे वाटत असते, त्याच प्रमाणे लेखक/कवींना केव्हा एकदा साहित्य प्रसूती होऊन मोकळे होऊ असे वाटत असते. अशा वेळी रात्री 2 वाजता उठून सुचलेले विचार कागदावर लिहून काढावयासे वाटत. कधीकधी जेवण अर्धवट टाकून टेबलावर जाऊन लिहावेसे वाटते. आता कागदावर लिहिणे हा प्रकार राहिला नाही कारण क था/कविता आता कॉम्पुटर, लॅबटॉप वर वर्ड फाईल ओपन करून लिहिता येते. साहित्य प्रसूती ही मूड वर फार अवलंबून असते. क था लिहीत असताना कोणी परिचित घरी आला व विचारले की " काय काका नवीन कथा लिहिणे चालू आहे वाटत" झालं लगेच मूड जातो. लिखाण थांबते. परत मूड यायला, विचार सुचायला कधी कधी दोन दिवस निघून जातात. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे, आई ला समोर थांबउन बाळ शी करायला बसते. आई सारखं दोन दोन मिनिटांनी विचारत असते बाळा शी झाली का? आटोप लवकर. तसतसे बाळ नुसता बसून राहतो, कारण त्याला शी होतच नसते. असाच काहीसा प्रकार साहित्य प्रसूती वेळी होत असतो. अनेकांचा असाच अनुभव असणार ही खात्री आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा