प्यादी मरण्यासाठीच का ❓?????
अनेक दिवसांपासून डोक्यात असलेला_
_*' प्रश्न '*_
_आहे की _
*.* *बुद्धिबळात* दोन्ही बाजूकडून *प्यादीच*
पुढे का असतात ?
_*.* *उभा-आडवा* मारा करु शकणारे *बलदंड__*हत्ती,*_
_*.* कानाकोपऱ्यातून *तिरप्या* चालीने वेध घेऊ *.* शकणारे *काटक**उंट,*_
*.* उलटसुलट *अडीच घरां* पल्याड जाऊन हल्ला*.* चढवू शकणारी_*घोडी,*_
*.* सर्वशक्तिमान_*वजीर*_
*.* आणि*.* महामहीम_*बादशहा*_
*.* एवढी सारी *मातब्बर*_ मंडळी *मागच्या रांगेत*
*.आणि तोफेच्या तोंडी**.*कोण तर *.* स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व नसलेली ,* किरकोळ देहयष्टीची
* एक-एक घर पुढे सरकणारी *प्यादी !*
* *हा म्हणजे झाडाने सावलीत बसण्यातला प्रकार झाला !*_
* बरं इतर सर्व मोहरे प्रकरण अंगाशी आले तर *मागे* फिरु शकतात. प्याद्यांना ती *मुभा* नाही.
एवढंच काय जीवाच्या आकांताने
एखाद्या प्याद्याने शत्रुचा प्रदेश पादाक्रांत करून अंतिम रेषा गाठलीच तरी_ *पुनरुज्जीवन प्रतिष्ठितांचेच* होणार.
* तसा रिवाजच आहे !
थोडक्यात काय तर प्यादी जन्माला येतात ती *बळी* जाण्यासाठीच. *प्याद्यांनी* फक्त *लढायचं,*
* तेही समोरच्या *प्याद्यांविरुद्धच.*
*का ?* ते विचारायचं नाही.
* सरपटत-फरफटत प्यादी लढणार, झगडणार, मरणार..* स्मारकं मात्र *प्रतिष्ठितांचीच* उभारली जाणार.
* इतिहासाची पानही डामडौल्यांचीच नोंद घेणार.* उदोउदोही मानकर्यांचाच होणार.
* कारण, तसाच *रिवाज* असतो!
*कार्यकर्त्यांनी समजून घ्या !*
*आणि जर इच्छा झालीच*
*राजकारणातून बाजूला होऊन व्यवसायाकडे*__*वळा..........*_
*स्वतः कडे, स्वतःच्या कुटूंबाकडे, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या*
*गुलाम बनून आयुष्याचं मातेर नका करून घेऊ.*
*कुठलाही राजकीय पक्ष , राजकीय नेता तुम्हाला प्यादी म्हणूनच वापरत असतो.*
*अशी प्यादी आजकाल सोशल मीडिया वर जास्तच कार्यरत असतात.*
*म्हणून स्वतः प्यादी बनायचं की नाही हे ठरविता आलं तरच शिक्षणाचा उपयोग आहे.*
*कृपया प्यादी बनू नका...बुद्धिवादी व्हा....*
Cp
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा