निशब्द...
पिकलेल्या आंब्यांना गळती लागायचे दिवस होते, दुर्दैवाने माणसांनाच गळती लागायला लागली... 'रस' प्यायच्या दिवसांत 'लस' घ्यायचे दिवस आले.... जितक्या सहजतेने लोक 'सॉरी', 'थँक्स' म्हणायचे, तितक्याच सहजतेने 'भावपूर्ण श्रद्धांजली' म्हणायला लागले आहेत्... आयुष्यभर मर-मर करून कमावलेली धन-दौलत,गाडी-बंगला, अधिकार, पद, मान-सन्मान, खुर्ची इ. सगळं सगळं सोडून जावं लागतं. लोक फार फार तर 'इमोशनल' लिहीतील... चार-दोन दिवस स्टेटस, डी पी ठेवतील.... पुन्हा पुढचा जाईल तसा डी पी बदलत राहील... "फोटो आभास' देतो, 'स्पर्श' नाही."
म्हणून,
" जे आहेत तोवर परस्परांशी सौहार्दपणे वागणं, सहकार्य करणं, भेटण-बोलणं झालं पाहिजे. "
Cp
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा