शनिवार, २७ नोव्हेंबर, २०२१

शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१

अहंकार

              निष्क्रिय माणसं आणि अतिअहंकारी माणसं शेवटी एकटी पडतात. आपल्या ह्याच स्वभावापायी आपण एकटे पडलो आहोत, हेही ते मान्य करीत नाहीत आणि तरीही त्यांपैकी काहींचं नशीबच इतकं चांगलं असतं की, अशा माणसांना सांभाळणारी माणसं त्यांना शेवटपर्यंत लाभतात. त्यामुळे आपलं आजवर काहीच चुकलेलं नाही, अशा समजुतीत ती आपला आळस आणि अहंकार दोन्हींचं जतन करतात. cp

लग्नाबद्दल तुम्हाला काय वाटते?

      अस म्हणतात लग्न हे मोतीचुर लाडवासारखे आहे जे खात नाहीत ते तर पस्तवतातच पण जे खातात तेही पस्तवतात.  पूर्वी एकत्र कुटुबव्यवस्था होती. आज विभक्त कुटुंब पद्धती आहे. याचा लग्न प्रथेवर खूप प्रभाव होता. वधू वर दोन्ही कुटुंबामध्ये विश्वासू मधस्थी असायचा. वधू वराची सविस्तर बारीकसारीक माहिती गुणदोष दोन्ही कुटुंबांना कळायचे त्यामुळे निर्णय घेणे सोपे पडायचे. दोन्ही कुटुंबांना वर/वधूचे व्यंग अथवा कुठलेही दोष लपाऊन ठेवणे सोपे नव्हते. पण मध्यस्थी मुळे लग्नबंधन तुटण्या इतके विकोपाला जात नसत.
              नंतर हळू हळू मध्यस्थी कडून लग्न जुळविण्याची पद्धत बंद झाली.  मग सुरू झाली नवी पद्धत. रजिस्टर विवाह नोंदणी संस्थे कडून लग्न जुळवणे. वधू वराने अशा संस्थे मधे फॉर्म भरताना जी माहिती दिलेली असते त्याची खातरजमा न करताच कॉम्प्युटर मधे फीड केली जाते. अनेकवेळा ती माहिती चुकीची असते. जसे मुलगा/मुलगी यांचे शिक्षण चुकीचे असणे. जन्म तारीख चुकीची असणे. एखादे उघडपणे समजून न येणारे व्यंग लपवणे.लग्न तर होऊन जातात पण कालांतराने जेव्हा अशा गोष्टी उघड होतात तेव्हा त्याचा शेवट घटस्फोट पर्यंत जातो. संसार काचेसारखा असतो एकदा तडा गेला की परत जुळत नाही. नाहीतर मन मारून आंधळेपणाने संसारगाडा जीवनाची अखेर केव्हा होणार याची वाट बघत बसण्यापेक्षा दुसरा पर्याय नसतो. सहनशक्ती पणाला लागते. वरून सुखी दिसणारे संसार आतून पोखरलेले असतात.
             हे झाले अरेंज लग्ना बद्दल. पण सगळ्यात उत्तम प्रेम विवाह. या प्रकारात वर वधू एकमेकांना ओळखत असतात. गुण दोषांची माहिती असते. स्वभाव माहिती असतात. वीक पॉइंट माहिती असतात. एकमेकांच्या घरच्यांशी जुळून घेतले की संसार सुखाचा होतो. फक्त प्रेमामध्ये संसार सुख सोडून दू स रे  गुप्त उद्दिष्ट नसावे ( जसे पैसा, प्रॉपर्टी, दुष्मनी ई.) 
             महत्वाचे म्हणजे,  वधू, वराची  जन्म पत्रिका कुंडली, जुळतेका नाही यापेक्षा आवड निवड, स्वभाव जुळणे महत्वाचे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे दोघांचे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट एक्सचेंज करावे. उद्देश एव्हढाच की काही आजार लग्नानंतर कळले की मानसिक धक्का बसतो. पण आधी कळल्यास त्यावर मात करण्याचे मार्ग मोकळे होतात. लग्नाचा उद्देश सुखी संसारच असतो नाही का ?

आनंदा शिवाय जीवन जगणे

प्रत्येकाला मन असत. थोडक्यात इच्छा असतात. त्याच आनंदी किंवा दुःखी असन हे दुसरे आपल्याशी कशे व्यवहार करतात यावर अवलंबून असत असे मानले जाते. समोरची व्यक्ती आपल्या मनासारखं वागली की ती व्यक्ती आपल्याला समजून घेते असे वाटते. याउलट समोरची व्यक्ती आपल्या मनाविरुद्ध वागली की ती व्यक्ती आपल्याला समजून घेते नाही असे वाटणे स्वाभाविक आहे. पण समोरच्या व्यक्तीने आपल्या मनासारखे का वागावे ? आपल्याला समजूनच का घ्यावे ? असा पण विचार करायला हरकत नाही. जसे आपल्याला कोणी समजून घेत नाही ही भावना तयार होऊ शकते तशी ती भावना दुसऱ्याच्या मनात पण तयार होऊ शकते. आपल्याला कोणी समजून घेणे व आपण दुसऱ्याला समजून घेणे हे दोन्ही व्यक्तींकडून समानतेने आचरणात आणले गेले पाहिजे तरच आपल्याला कोणी समजाऊन घेत नाही अशी भावना कोणाचाही मनात येणार नाही.  दुसऱ्याने आपल्या मनासारखं वागण्याची अपेक्षा ठेवणे बरोबर आपण पण दुसऱ्याच्या मनासारखे वागतो का ? याची खात्री करून घेतली पाहिजे. 

आऊष्य

सोबत काही येत नाही..ji स्वतः आनंदाने जगा... दुसर्यालाही जगु द्या..!!

चांगलं करता येत नसेल तर, निदान वाईटही करु नका...

आयुष्याच्या कोणत्या वळनावर कोणाचा तळतळाट आडवा जाईल.... सांगता यायचं नाही..!!

पैसा कमी असला तरी चालेल भरपुर माणसे कमवा... आयुष्य माणसांशिवाय जगता येत नाही....

शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

साहित्य प्रसूती

साहित्य निर्मिती क्षेत्रात विशेषतः कवी वा लेखक यांच्या संदर्भात येथे विचार करणार आहोत. बाळ जन्माला येणे आधी स्त्री ला जीवघेण्या कळा, प्रसूती वेदना सहन कराव्या लागतातच. त्याच प्रमाणे कवी किंवा लेखकांकदून साहित्य प्रसूतीच्या वेदना होत असतात. साहित्य निर्मितीची ठरावीक वेळ, मुहूर्त असा नसतो, जसा बाळ जन्माला ही नसतो. जशी स्त्री ची एकप्रकारे तडफड अशा प्रसंगात होत असते तशीच परिस्थिती कवी/लेखक वर्गाची होत असते. केव्हा एकदा सुखरूप बाळंत होऊ असे त्या स्त्रीला सारखे वाटत असते, त्याच प्रमाणे लेखक/कवींना केव्हा एकदा साहित्य प्रसूती होऊन मोकळे होऊ असे वाटत असते.  अशा वेळी रात्री 2 वाजता उठून सुचलेले विचार कागदावर लिहून काढावयासे वाटत. कधीकधी जेवण अर्धवट टाकून टेबलावर जाऊन लिहावेसे वाटते. आता कागदावर लिहिणे हा प्रकार राहिला नाही कारण क था/कविता आता कॉम्पुटर, लॅबटॉप वर वर्ड फाईल ओपन करून लिहिता येते. साहित्य प्रसूती ही मूड वर फार अवलंबून असते. क था लिहीत असताना कोणी परिचित घरी आला व विचारले की " काय काका नवीन कथा लिहिणे चालू आहे वाटत" झालं लगेच मूड जातो. लिखाण थांबते. परत मूड यायला, विचार सुचायला कधी कधी दोन दिवस निघून जातात. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे, आई ला समोर थांबउन बाळ शी करायला बसते. आई सारखं दोन दोन मिनिटांनी विचारत असते बाळा शी झाली का? आटोप लवकर. तसतसे बाळ नुसता बसून राहतो, कारण त्याला शी होतच नसते. असाच काहीसा प्रकार साहित्य प्रसूती वेळी होत असतो. अनेकांचा असाच अनुभव असणार ही खात्री आहे.

मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१

रविवार, ७ नोव्हेंबर, २०२१

" Life : जीवन

" Life " 

 समय चला , पर कैसे चला,
 पता ही नहीं चला , 
 ज़िन्दगी की आपाधापी में ,
 कब निकली उम्र हमारी यारो ,
*पता ही नहीं चला ,*

कंधे पर चढ़ने वाले बच्चे 
कब कंधे तक आ गए ,
*पता ही नहीं चला ,*

किराये के घर से शुरू हुआ था सफर अपना ,
कब अपने घर तक आ गए ,
*पता ही नहीं चला ,*

साइकिल के पैडल मारते हुए                      हांफते थे उस वक़्त, 
कब से हम कारों में घूमने लगे हैं ,
*पता ही नहीं चला ,*

कभी थे जिम्मेदारी हम माँ बाप की ,
कब बच्चों के लिए हुए जिम्मेदार हम ,
*पता ही नहीं चला ,*

एक दौर था जब दिन में भी 
बेखबर सो जाते थे ,
कब रातों की उड़ गई नींद ,
*पता ही नहीं चला ,*

जिन काले घने बालों पर 
इतराते थे कभी हम ,
कब सफेद होना शुरू हो गए
*पता ही नहीं चला ,*

दर दर भटके थे नौकरी की खातिर ,
कब रिटायर हो गए  समय  का ,
*पता ही नहीं चला ,*

बच्चों के लिए कमाने बचाने में   
इतने मशगूल हुए हम ,
 कब बच्चे हमसे हुए दूर ,
*पता ही नहीं चला ,*

भरे पूरे परिवार से सीना चौड़ा रखते थे हम ,
अपने भाई बहनों पर गुमान था ,
उन सब का साथ छूट गया ,
कब परिवार हम दो पर सिमट गया ,
*पता ही नहीं चला ,* 

अब सोच रहे थे  अपने 
लिए भी कुछ करे ,
पर शरीर  ने साथ देना बंद कर दिया ,
*पता ही नहीं चला*
It's truth of life
forwarded

म्हणून ताटात उष्टे टाकू नये...*

*म्हणून ताटात उष्टे टाकू नये...*

ताटातलं पूर्ण अन्न संपवणाऱ्या एका युवकाचे मित्र त्याची थट्टा करायचे.अशातच एकदा एका मित्राने त्याला विचारले की,तू रोज ताटात एक कण सुद्धा का सोडत नाही. त्यावर त्या युवकाने उत्तर दिले,

तो म्हणाला..याची तीन कारणे आहेत. 
१) हा माझ्या वडिलांप्रति आदर आहे.जे हे अन्न मेहनतीने कमावलेल्या रुपयांनी विकत घेतात.
२) हा माझ्या आईविषयीचा आदर आहे.जी सकाळी लवकर उठून मोठ्या चवीने हे अन्न शिजवते.
३) हा माझ्या देशातल्या त्या शेतकऱ्यांविषयीचा आदर आहे जे शेतांत उपाशी राहून खूप मेहनत घेऊन  ते पिकवतात.
म्हणून शक्यतो 
ताटात उष्ट अन्न टाकू नये.
Cp