" पुन्हा एक बुद्ध हवा आहे. पण तोही हतबुद्ध होईल. "
000
" रामायणाच्या काळात, अयोध्याकांडापासून, युद्धकांडापर्यंत, एकूण किती कांड आहेत हे माझ्या ध्यानात नाही. गेले काही दिवस, वर्तमानपत्रातून रोज वाचावं लागतंय, ते वासनाकांड रामायणात नव्हतं. हे वासनाकांड रातोरात निर्माण झालेलं नाही. पात्रता नसणाऱ्यांना मिळणारी पदं, पक्षांच्या जोरावर निवडून येणारे अशिक्षित खासदार, आमदार, नगरसेवक, क्वचित काही मंत्रीही, लॉ आणि ऑर्डरमध्ये सरकारी हस्तक्षेप, ठिकठिकाणी उघडलेले बीअर बार्स आणि त्याहीपेक्षा जास्त परिणाम वर्षानुवर्षे होतोय, तो सेक्स आणि व्हायोलन्सनें सडलेल्या, किडलेल्या हिंदी चित्रपटांचा, वेब सिरीजचा. पोलीस कमिशनर, मंत्री ह्यांची निर्लज्ज नाचक्की पाहून, सेन्सॉर बोर्ड तर सोडाच, आतापर्यंत समाजातील कोणीही चित्रपट किंवा वेब सिरीज बंद पडायला धजावलेलं नाही. अख्या माहाराष्ट्राची, भारताची वीणा तुटून गेली आहे आणि कायद्याच्या तारा ढिल्या पडल्या आहेत. भ्रष्टाचाराच्या तारा ताणल्या गेल्या आहेत, पुन्हा एक बुद्ध हवा आहे. पण तोही हतबुद्ध होईल."
वपुर्झा /212/Surendra / 13082025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा