अनेकजण पदं-पैंसा-प्रति"ष्ठा ह्या पायऱ्यांवरच धडपडणार-"
000
" नेहमीच्या गोष्टी करणारा माणुससुद्धा अगतिक झालेला असतो. त्याचा पुनःरूक्तीचा आनंदही विटलेला असतो. पण त्याऐवजी काय करावं हेही त्याला कळत नाही. तो एक अगतिक सदवर्तनी किंवा निवृत्त भोगीच असतो. ह्याचं अवस्थेत बुद्ध भेटावा लागतो. कुणी सांगावं,आजच्या विसाव्या शतकातही अनेकजण बुद्धाची प्रतिक्षा करीत असतील. एखाद्याचं संपूर्ण परिवर्तन होईलही.' करून करून भागला आणि देवपूजेला लागला' ह्या वचनाला घाबरवून, ते कंटाळलेल्या मार्गांवरूनच चालतं असतील. खरं तर सगळ्या गोष्टी करून पाहिल्यावरच, शांती न मिळाल्यावर जो भक्तिमार्गाकडे वळतो, तो कायमचा वळतो. तोपर्यंतचा त्याचा प्रवास चिरंतन शांतीच्या दिशेनेच होत असतो. त्याला हसायचं कारण नाही, अनेकजण पदं-पैंसा-प्रतिष्ठा ह्या पायऱ्यांवरच धडपडणार- यम, नियम, असणापासून समाधीच्या पायरीकडे नुसते बघत, फास्ट लोकलकडे बघत, ठिकठिकाणी रखडणाऱ्या गाडीनेच प्रवास करतात. ह्याचं कारणासाठी सत्पूरुष व्यक्तीच्या, गतकाळातल्या चरित्र्याची चिरफाड करणाऱ्या वृत्तपत्रीय भाष्याला मी महत्व देत नाही. प्रेस कॉन्फरन्ससाठी बोलावलेल्या पत्रकारांपैकी दारूच्या बाटल्या घरी नेणारे महाभाग मला माहीत आहेत. "
वपुर्झा /213/Surendra / 19082025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा