बुधवार, १३ ऑगस्ट, २०२५

" सदवर्तनाची जशी एक नशा असते तशीच दृशकृत्याची पण एक चटक असते. कैफ असतो."

" सदवर्तनाची जशी एक नशा असते तशीच दृशकृत्याची पण एक चटक असते. कैफ असतो."

                                 000

                "   आपण एखाद्याचा मोठेपणा झुगारूनच द्यायचं ठरवलं, तर ते काय अशक्य आहे का? त्याला फार धाडस किंवा अक्कल लागते का? त्यासाठी फक्त नफ्फडपणा लागतो. आज वकील, डॉक्टर, प्राध्यापक, व्यापारी, समाजसेवक, चित्रपट, नाट्यव्यवसाय, राजकारण, न्याययंत्रणा ह्या सगळ्या व्यवसायात शुद्ध चारित्र्य राहीलच नाही, असं आहे का? जकात नाक्यावरही कात टाकलेली साधी, सरळ माणसं नाहीत का? रेल्वेपासून पोलीस खात्यापर्यंत युनिफॉर्मचा गैरवापर न करणारी माणसं कमी असतील का? पण तशी माणसं भेटावी लागतात. ह्यांच्या माना, पदं, पैंसा, प्रतिष्ठा मानणाऱ्या गेंड्यांच्या-नव्हे-झेंड्यांच्या गळफासत गेल्या असतील, तर ते कुठे जातील? - एका रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वतःची मानणाऱ्या लालबहादूर शास्त्रीचा जमाना कधीच संपला. शास्त्री गेले तेव्हा त्यांच्या खात्यावर किती पैसे होते, हे त्या वेळच्या समाजाला माहीत आहे. त्या शास्त्रीना दोन वेळा 'कोटी' ,' कोटी' नमस्कार. परिवर्तरन ही अंतर्मनाची प्रक्रिया आहे. तुम्ही एखाद्या माणसासमोर शंभर आदर्श ठेवा, दासबोधची पारायण करा किंवा अनेकजणांची उदाहरणं ज्ञा, त्या माणसावर ' डिम्म ' परिणाम होणार नाही. तो जे पटल्यासारखं दाखवतो, ते intellectual appreciation असतं. सदवर्तनाची जशी एक नशा असते तशीच दृशकृत्याची पण एक चटक असते. कैफ असतो. ज्या मनात ह्या दोन्ही गोष्टींचा उगम होतो, तिथंच जागृतीचा, awareness चा कोंब फुटावा लागतो. "

वपुर्झा /212/Surendra / 14082025

मंगळवार, १२ ऑगस्ट, २०२५

" पुन्हा एक बुद्ध हवा आहे. पण तोही हतबुद्ध होईल. "

" पुन्हा एक बुद्ध हवा आहे. पण तोही हतबुद्ध होईल. " 

                                 000

                "   रामायणाच्या काळात, अयोध्याकांडापासून, युद्धकांडापर्यंत, एकूण किती कांड आहेत हे माझ्या ध्यानात नाही. गेले काही दिवस, वर्तमानपत्रातून रोज वाचावं लागतंय, ते वासनाकांड रामायणात नव्हतं. हे वासनाकांड रातोरात निर्माण झालेलं नाही. पात्रता नसणाऱ्यांना मिळणारी पदं, पक्षांच्या जोरावर निवडून येणारे अशिक्षित खासदार, आमदार, नगरसेवक, क्वचित काही मंत्रीही, लॉ आणि ऑर्डरमध्ये सरकारी हस्तक्षेप, ठिकठिकाणी उघडलेले बीअर बार्स आणि त्याहीपेक्षा जास्त परिणाम वर्षानुवर्षे होतोय, तो सेक्स आणि व्हायोलन्सनें सडलेल्या, किडलेल्या हिंदी चित्रपटांचा, वेब सिरीजचा. पोलीस कमिशनर, मंत्री ह्यांची निर्लज्ज नाचक्की पाहून, सेन्सॉर बोर्ड तर सोडाच, आतापर्यंत समाजातील कोणीही चित्रपट किंवा वेब सिरीज बंद पडायला धजावलेलं नाही. अख्या माहाराष्ट्राची, भारताची वीणा तुटून गेली आहे आणि कायद्याच्या तारा ढिल्या पडल्या आहेत. भ्रष्टाचाराच्या तारा ताणल्या गेल्या आहेत, पुन्हा एक बुद्ध हवा आहे. पण तोही हतबुद्ध होईल." 

वपुर्झा /212/Surendra / 13082025

" Who is wrong ह्याऐवजी What is wrong ह्याचाच शोध घ्यायचं दोघांनी ठरवलंत तर, संसार बहरलाच पाहिजे"

"   Who is wrong ह्याऐवजी What is wrong ह्याचाच शोध घ्यायचं दोघांनी ठरवलंत तर, संसार बहरलाच पाहिजे".

                                 000

                "   संसार हा एक कोर्स आहे. न संपणारा अभ्यासक्रम. ह्याचं टेक्स्ट रोज बदलणार. रोज परीक्षा द्यायची. ह्याला करिक्युलम नाही. डिग्री नाही, गाईड नाही. आपण एका न संपणाऱ्या कोर्सला बसलो आहोत. आपण परीक्षकासारखेच एकमेकांशी वागलो तर कसं होणार? सगळ्या कुटुंबातून पतिपत्नी परीक्षकाप्रमाणे एकमेकांची गंमत बघत राहतात. कोण कसं चुकतं. मग मीही कशी जिरवतो किंवा जिरवते ते पहा. सगळीकडे एकच. आजपासून आपल्यापुरतं हे बंद. संसार रोज एक प्रश्नपत्रिका देईल, ऐनवेळी. अगोदर न फुटणारी. ती दोघांनी सोडवायची. ह्याचं एका कोर्समध्ये पेपर सोडवतांना कॉपी करायची परवानगी आहे. आपला प्रत्येक श्वास जसा वर्तमानकाळातल्या ताज्या क्षणांशी इमानाने नातं ठेवतो, तितक्याच प्रमाणात वृत्ती कोऱ्या ठेवून, संसारातला प्रत्येक क्षण जोखायचा. भूत, भविष्याची वजनं वापरून वर्तमानकाळातलाकोणताही क्षण तोलता येतं नाही. पाच पंचेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये हीच मोजमाप. Nobody is perfect हे सूत्र मनात हवं. शुद्ध हेतूबाबत कधीच शंका नसावी आणि खूप चांगलं चांगलं करण्या-वागण्याची इच्छा असूनही, मधल्या steps चुकू शकतात, ह्यावर श्रद्धा असावी. Who is wrong ह्याऐवजी What is wrong ह्याचाच शोध घ्यायचं दोघांनी ठरवलंत तर, संसार बहरलाच पाहिजे. तुमच्या भाषेत सांगायचं तर, सरळ पायऱ्या चढून शिखर गाठणं म्हणजे Who is wrong च्या मळलेल्या पायवाटेवरून जाणं. What is wrong चा शोध घेणं म्हणजे ट्रेकिंग. हेच ट्रेकिंग अखंड चालो. "

वपुर्झा /209/Surendra / 12082025

सोमवार, ११ ऑगस्ट, २०२५

" केवळ अंतरपाट दूर केल्याने अंतर्मनाच मिलन होईल ह्याची शाश्वती नाही. "

 "  केवळ अंतरपाट दूर केल्याने अंतर्मनाच मिलन होईल ह्याची शाश्वती नाही. "

                                 000

                "   कुणावर तरी प्रेम बसणं. त्यानंतर मनात होणारी हुरहूर, त्या पाठोपाठ काहूर ह्या सगळ्या अवस्था डोळ्यासमोर उभ्या राहतात. लग्नाला एकच दिशा असते, प्रेमाला अनेक. लग्न केलं म्हणजे एकमेकात प्रेम निर्माण होईल हया चुकीच्या धारणेवरच समाज उभा आहे. प्रेम हे आकाशाइतकं उत्तुंग आणि विशाल आहे. तर लग्नसंस्था  जमिनीला घट्ट धरून उभी आहे. म्हणूनच लग्नानंतर प्रेमाच नात निर्माण झालं नाही तर पायाखालची जमीन सरकायला लागते. नैसर्गिक धरणीकंप अधूनमधूनच होतात, अनेक घराघरातून होणाऱ्या धरणीकंपाची नोंद कुठल्याही वेधशाळेत घेतली जातं नाही. त्या जमिनी तिथल्या तिथेच थरथरत राहरात. प्रेम निसर्गाने निर्माण केलंय आणि लग्न संस्था समाजाने. प्रेमातून संसार फुलला पाहिजे, त्याऐवजी संसारातून मुलांची पैदास होते आणि त्यालाच आम्ही प्रेम समजून कवटाळत राहतो. प्रेम ही चैतन्याची खूण आहे. ते फुलतं आणि वरमाला बनवावी लागते. म्हणून केवळ अंतरपाट दूर केल्याने अंतर्मनाच मिलन होईल ह्याची शाश्वती नाही. "

वपुर्झा /200/Surendra / 11082025