मंगळवार, २४ जानेवारी, २०२३

मराठी: आयुष्य: सुरेखा सुर्यवंशी: _साडेसाती__चिंतन_* कलेक्शन: सुरेंद्र पाथरकर

*_साडेसाती__चिंतन_*
 
_एका मैत्रीणीने संदेश पाठवला, "कोणताही बाष्कळपणा न करता, जरा गंभीरपणाने साडेसातीवर लेख लिहीशील का?"_
     
_मी, "तुला साडेसाती सुरू झालीय का?" असे विचारले._ 
     
_त्यावर ती म्हणाली, "नवऱ्याला साडेसाती सुरू झाली आहे."_
     
_मी म्हंटले," मग तू कशाला काळजी करतेस? त्याला आतापर्यंत सवय झाली असेल."_
     
_त्यावर ती खळखळून हसली, म्हणाली, "झाला तुझा वाह्यातपणा सुरू?"_
     
_विनोदाचा भाग सोडला तर गेल्या महिन्याच्या अखेरीस शनीने घर बदलले आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली,_ 
_कोणाची संपली?_
_कोणाची सुरू झाली?_ 
_काय म्हणून काय विचारता महाराजा, *"साडेसाती"!*_     
    
_मकर, कुंभ आणि मीन या तीन राशींना सध्या साडेसाती सुरू आहे._
_शनी ज्या राशीत असेल त्या राशीला साडेसात वर्ष काही अप्रिय घटना आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो असे समजले जाते,_ 
_म्हणून त्या कालावधीला साडेसाती असे नाव पडले._ 
_ती येऊ नये असे प्रत्येकाला वाटत असेल तरी ती कोणालाही टाळता येत नाही._
 
_ज्योतिष मानत नाही, असे कितीही म्हंटले तरी प्रत्येक माणूस मनातून साडेसातीला थोडातरी घाबरतो._ 
    
_एक गोष्ट आहे._ 
_शनी आणि लक्ष्मी दोघांनी विष्णूला विचारले की "आमच्यातले कोण छान दिसते?"_
    
_प्रसंगावधानी, हजरजबाबी विष्णू भगवान म्हणाले,_ 
_"लक्ष्मी येताना छान दिसते_ 
_आणि_ 
_शनी महाराज जातांना चांगले दिसतात."_
      
_*शनी परीक्षक आहे. शाळेत अभ्यास किंवा ऑफिसमध्ये ऑडिट असते, तशी साडेसाती असते. चोख वागेल त्याने घाबरायचे काहीच कारण नाही.*_ 

_दर तीस वर्षांनी भेट देऊन साडेसात वर्ष मुक्काम करत असल्याने प्रत्येकाला आयुष्यात दोन ते तीन वेळा साडेसातीला सामोरे जावे लागते._ 
      
_देशपांडे नावाचे माझे सहकारी साहेबांनी बोलावले की..._ 
_"मी सरांशी गप्पा मारून आलोच"_ 
_असे सांगून जायचे. आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरून साहेब काय बोलले असावे याचा अंदाज येत नसे._

_एकदा त्यांना विचारले,_
 _"तुम्हाला सर ओरडत नाहीत का?_ 
_चुका काढत नाहीत का?"_
     
_देशपांडे म्हणाला,_
_"ओरडतात."_
     
_मी: " तुम्हाला वाईट वाटत नाही का?"_
    
_*देशपांडे: "वाटतं..., मीही माणूस आहे. मी मन लावून काम करतो त्यामुळे कौतुक व्हावं, अशी मला अपेक्षा असते.*_ 
_पण एका साहेबांनी मला सांगितले, ते मी लक्षात ठेवलं आहे."_
     
_मी: "काय?"_
    
_देशपांडे:_ 
_"एकदा साहेब मला ओरडले म्हणून मी खूप नाराज झालो. ऑफिसची वेळ संपली तरी रागाने काम करत बसलो._ 
_साहेब घरी निघतांना त्यांना मी दिसलो._ 
_ते मला म्हणाले,_
 _"देशपांडे चला, चहा पिऊ."_
    
_चहा पितांना ते म्हणाले,_ 
_"देशपांडे, तू लहान आहेस म्हणून सांगतो._

_*जो माणूस कौतुक करतो तो आवडतो, जो चुका दाखवतो त्याचा राग येतो. हा मनुष्य स्वभाव आहे.*_ 

_*घरी वडील आणि ऑफिसमध्ये साहेब काहीही बोलले तरी राग धरायचा नाही. त्यात आपले भले असते.*_
 
_आपण मानत नसलो तरी त्यांना आपल्यापेक्षा जास्त कळतं. त्यांना जे माहित आहे ते त्यांनी सांगितले नाही तर आपल्याला कळणार कसे?_ 

_गोड बोलून जी कामे होत नाहीत ती कडक वागण्याने लवकर होतात._ 

_*वडिलांना मुलांचे भले व्हावे असे वाटत असते,*_ 
_साहेबांनाही सहकाऱ्यांचे चांगले व्हावे, काम उत्तम व्हावे असेच वाटते._ 
_त्यांची खुर्ची त्यांना लोकांमधे फार मिसळू देत नाही, आणि त्यांना फार गोड बोलता पण येत नाही."_
         
_शनी महाराज असेच असतात._ 
_*पितृतुल्य मायेने धाकात ठेवतात. ते शत्रू नाहीत, ते करतील त्यात माणसाचे शंभर टक्के हित असते. ते मनाविरुद्ध असल्याने माणूस नाराज होतो,*_ 
_त्यात शनीचा दोष नाही._ 

_*शनीसारखी निष्ठा असावी, वाईटपणा येऊनही तो त्याचे काम चोख करतो.*_ 

_साडेसातीत माणूस कमी कालावधीत खूप शिकतो, दृष्टिकोन बदलतो, माणसे ओळखायला लागतो, स्वतःच्या क्षमता जाणतो, शिस्त अंगी बाणते._ 
_माणूस घाबरला, विरोधात गेला तर त्रास होतो कारण व्हायचे ते होतेच._ 
_*कष्टाची, बदलाची, लीनतेची तयारी ठेवली तर माणूस यातून सहजपणे पार होतो.*_ 

_*कोणत्याही कल्पना, तक्रारी केल्या नाहीत तर हा काळ खूप प्रगतीचा ठरतो, जातांना खूप संधी, अनुभव, शहाणपण देऊन जातो.*_ 

_या काळाकडे कसे बघतो, कसे सामोरे जातो त्यावर होणारा त्रास अवलंबून असतो._

_टिळक, सावरकर यांनी तुरुंगवासातही उत्तम साहित्य निर्माण केले. संधीचा फायदाच नाही तर त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मार्ग शोधला._ 

_अशी जिगर हवी. ओझे घेऊनच चढावे लागणार असेल तर खाऊ आणि पाणी घेऊन चढण्याचे प्रसंगावधान हवे._ 
         
_कधी कधी अचानक पाऊस येतो, जवळ छत्री, रेनकोट काहीच नसते. पाऊस पडणे कोणाच्याच हातात नसते, त्यामुळे न चिडता थांबायचे किंवा भिजायचे, हे दोनच पर्याय असतात._ 
_वेळ नसेल तर भिजत जायचे,_ 
_वेळ असेल तर थांबायचे,_ 
_ही निर्णयक्षमता साडेसातीत येते._

_चिडचिड करून त्रास करून घ्यायचा नाही, हे शहाणपण येते._ 
_भिजत जातांना किंवा वाट बघतांना चहा, भजी, कणीस असे काही खायचे, हे कळते._
          
_चांगल्या वाईट घटना आयुष्यभर घडत असतात. कधी इतरांची साथ मिळते, कधी नाही._ 
_आपला आनंद आपण मिळवायचा, आपली वाट आपण आत्मविश्वासावर चालायची, कुबड्या घेऊन चालायचे नाही हे माणूस शिकतो._ 

_*मला वाटले, माझ्या लक्षात आले नाही, इतकं चालतं, अशी वाक्ये मनात आणायची नाहीत. नाही तर महाराज पिच्छा पुरवतात.*_ 

_शरण जाणे, हा सोपा मार्ग आहे, पण अहंकार आड येतो. *अहंकार मनात धरून मारुती, पिंपळ, कोणालाही फेऱ्या मारून उपयोग होत नाही.* अंगी नम्रता असेल तरच शांत राहता येते. गुरूला शरण जाणे, हा सर्वात उत्तम मार्ग आहे._ 

_गुरूकडे गेलं की बरीचशी तयारी गुरू करून घेतात._ 

_शाळेत असताना शिकवणी लावून अभ्यास करा किंवा आपापला करा, अभ्यास करावा लागतो, परीक्षा नको, अभ्यास नको असे म्हणून चालत नाही._

_हॉटेलमध्ये खाल्लं की बिल द्यावे लागते, नाहीतर भांडी घासावी लागतात._
          
_डोकं शांत, मन प्रसन्न, काम चोख असेल तर काय चुकतंय, काय करायला हवं हे लक्षात येतं._ 

_*स्वतः च्या चुका ऐकूनही घेत नाही म्हणून माणसात सुधारणा होत नाही. कोणी सांगितले तरी माणूस चुका स्वीकारत नाही आणि सुधारतही नाही. चूक मान्य केली तर सुधारायची थोडी तरी शक्यता असते.*_

_घाबरावे असे शनी काही करत नाही._

_आरोग्य आणि अध्यात्म या दोन गोष्टीचे माणसाला महत्त्व पटवण्याचे आणि पैसा, संपत्ती, मीपणा यावरचे लक्ष कमी करण्याचे काम शनी महाराजांकडे सोपवले आहे._ 

_*त्यांचा अनुभवावर, कृतीवर, शिस्तीवर भर आहे, समजवण्यावर नाही, ते उपदेश करत नाहीत, थेट अनुभव देतात.*_

_*माणसाला असणारी धुंदी / गुर्मी उतरवण्याचे काम शनी महाराजांना दिले आहे.*_ 

_गीतेत कर्मण्येवाधिकारस्ते असे सांगितले आहे, त्याचा वस्तुपाठ शनी करून घेतात._ 

_गीता, एकंदरीत संतसाहित्यात असलेला उपदेश शनी प्रत्यक्ष कृतीत आणायला लावतो._ 

_*ज्या माणसांना कष्ट, शिस्त, नम्रपणा आवडत नाही त्यांना साडेसातीत त्रास होतो.*_ 

_खरं तर राग आणि अहंकाराने माणसाचे पूर्ण आयुष्यच खडतर जाते, त्रास होतो._
 
_अतीचिकित्सा न करता काही गोष्टी सोडून देतात ती माणसे समाधानी, आनंदी असतात._
    
_आयुष्य पूर्ण चांगले किंवा पूर्ण वाईट कधीच नसते._ 
_साडेसातीत नाही तर एकूण आयुष्यातच..._
_मी म्हणीन ते,_ 
_मी म्हणीन तसे,_ 
_मी म्हणीन तेव्हा.._ 
_असे वागणाऱ्या माणसांना मानसिक त्रास जास्त होतो._
_माणूस जे ठरवतो ते होतेच असे नाही,_ 
_होईल ते त्याच्या मनाप्रमाणे असते असे नाही,_ 
_तो करेल त्याचे श्रेय त्याला मिळते असेही नाही,_ 
_तो ज्यांना आपले समजतो ते त्याच्याशी आपलेपणाने वागतील असे तर मुळीच नाही._ 
     
_एका मुलाला त्याची आई स्वतःची कामे कर असे सांगत असते._ 
_आई एकदा त्याला कपडे धुवायला सांगते. तो कसेतरी धुतो. आई कपडे मातीत टाकून परत धुवायला लावते._
_तू नीट कपडे धुतलेस तरच जेवायला मिळेल, असे सांगते._ 
_मुलगा कपडे नीट धुतो, पण वाळत कसेतरी घातले म्हणून आई ते कपडे परत धुवायला लावले._ 
_*त्या मुलाने नंतर आयुष्यभर कपडे स्वच्छ धुतले आणि नीट वाळत घातले.*_ 
    
_ही सत्यघटना आहे. याला शिस्त म्हणणार की छळ?_ 
_हे वळण / शिस्त वाटत असेल तर शनी वाईट वागवतो असे वाटणार नाही. *चूक न सुधारता नुसती सांगून  उपयोग नाही.*_
    
_साडेसाती ही माणसाला सुधारण्यासाठी दिलेली संधी असते,_ 
_त्या संधीचे सोने करावे._ 
_*ज्ञानी, कर्तव्यकठोर, शिस्तप्रिय, धीरगंभीर शनी महाराज माणसाला खंबीर बनवतात. काहीही आयते देत नाहीत. काही मिळवायचे असेल तर कष्ट करायाला लावतात,*_

_माहिती हवी असेल तर अभ्यास करावा लागतो, आराम करून चालत नाही._ 
_साडेसाती म्हणजे नुसता त्रास नसतो, त्याची रसाळ फळे नंतर नक्की मिळतात._
 
_साडेसातीसाठी आध्यात्मिक उपाय या लेखात नाहीत, तो उद्देशही नाही. *साडेसातीमागची मनोभूमिका मांडली आहे. आहे त्या परिस्थितीला सामोरे जाणे उत्तम.*_ 

_सांगा बरं, साडेसाती चांगली की वाईट????_


रविवार, २२ जानेवारी, २०२३

मराठी: आयुष्य. " आपल्याजवळ काय आहे हे शोधावे" प्रकाश muthualgiri.कलेक्शन: सुरेंद्र पाथरकर

*आपल्याजवळ काय आहे हे शोधावे*

पन्नास पेक्षा जास्त वयाची नैराश्याने (डिप्रेशनने) ग्रासलेली एक व्यक्ती होती. त्यांच्या पत्नीने एका मनोचिकित्सकाची (साईकॕस्टिस्ट), जे भविष्य ही बघत असत, त्यांची भेट घेण्यासाठी वेळ मिळवली.  
       पत्नी म्हणाली :- "हे खुपच निराशाग्रस्त आहेत. यांची कुंडली पण बघा." आणि सांगितले की या सर्वामुळे माझीही तब्ब्येत ठिक रहात नाही. 
        ज्योतिष्याने कुंडली बघितली. त्यात ग्रहस्थिती वगैरे सर्व काही ठिक दिसले. आता त्यांनी बोलायला सुरुवात केली. काही खाजगी प्रश्न ही विचारले आणि त्यांच्या पत्नी ला बाहेर बसायला सांगितले.
     ती व्यक्तीला बोलते केले...
'खुप त्रासात आहे...
काळजीच्या ओझ्याने दबला गेलोय... नोकरी चा ताण... मुलांच्या शिक्षण आणि त्यांना नोकरी मिळेल की नाही याची काळजी.. घरासाठी घेतलेले कर्ज, गाडीसाठी घेतलेले कर्ज...
कशातच मन लागत नाही...
       लोक मला खूपच यशस्वी व्यक्ती समजतात... पण खरंतर माझ्याकडे काहीच नाही....
मी खूपच निराश आहे...' वगैरे म्हणत संपुर्ण जीवनाचे पुस्तक उलगडून सांगीतले. 
      मग त्या विद्वान चिकित्सकाने काही विचार केला आणि विचारले, "दहावी ला असताना कोणत्या शाळेत शिकत होतात ?"
        त्या व्यक्तीने शाळेचे नाव सांगितले.
     चिकित्सक म्हणाले:-
"तुम्हाला त्या शाळेत जावे लागेल. तेथून तुमच्या दहावी च्या  वर्गाची नोंदवही (रजिस्टर) घेऊन या, आपल्या मित्रांची नावे बघा आणि त्यांना शोधून त्यांच्या आजच्या स्थितीची माहिती मिळवायचा प्रयत्न करा. सर्व माहिती एका वहीत लिहुन काढा व एका महिन्यांनी ती माहिती घेऊन मला येऊन भेटा." 
       ती व्यक्ती आपल्या जुन्या शाळेत गेली, खुप विनंत्या करुन नोंदवही (रजिस्टर) शोधले व त्याची प्रत बनवून आणली. त्यात एकशे वीस नावे होती. महीनाभर दिवस-रात्र प्रयत्न केले तरीही मोठ्या मुश्किलीने आपल्या पंचाहत्तर ते ऐशी वर्गमित्रांच्या विषयी माहिती जमा करु शकले.  
        त्यांना मोठे आश्चर्य वाटले....
त्यांतील वीस मित्रांचा मृत्यू झालेला होता... सात मित्र/मैत्रीणी विधवा/विधुर आणि तेरा घटस्फोटीत होते... दहा नशेच्या अधिन झाले होते, जे बोलण्याच्या लायकीचेही नव्हते. काहींचा तर ठावठिकाणा ही माहित होत नव्हता.... पाच तर इतके गरीब होते की विचारता सोय नाही... सहा इतके श्रीमंत निघाले की विश्वासच बसत नव्हता.
काही कॅन्सर ने पिडीत होते, काहींना अर्धांगवायू झाला होता, कुणाला साखरेचा, कुणाला दमा तर कुणी हृदयविकाराच्या आजाराने त्रस्त होते.  
      एक दोघांचा अपघात होऊन त्यात हात/पाय किंवा मणक्याचे हाड मोडून अंथरुणावर पडून होते.... काहींची मुलं वेडी, व्यसनी, रिकामटेकडी, कामातून गेलेली निघाली... एक कारागृहात कैदेत होता....
      एक पन्नास वय झाल्यावर स्थिरस्थावर झाला होता म्हणून आता विवाहबद्ध होण्याच्या विचारात होता तर एक अजूनही 
स्थिरावू शकला नव्हता पण दोन घटस्फोट होऊन ही तिसरे लग्न करायच्या बेतात होता....

      महीन्याभरात दहावी इयत्तेची नोंदवही (रजिस्टर) भाग्याची व्यथा स्वतः ऐकवत होती...

चिकित्सकाने विचारले :- "आता सांगा, तुम्हाला नैराश्य (डिप्रेशन) कसलं आलं आहे?"

        या व्यक्ती च्या लक्षात आले की 'त्याला कुठला आजार नाही, तो भुकेने मरत नाही, मेंदू अगदी ठणठणीत आहे, कोर्टकचेरी पोलिस-वकीलांशी कधी संबंध आला नाही, त्याची पत्नी-मुलं खूप चांगले आहेत, स्वस्थ आहेत, तो ही स्वस्थ आहे, डाॅक्टर, दवाखान्याची कधी गरज पडली नाही...'

        त्याला असे जाणवले की जगात खरंच खूपच दुःख आहे आणि मी खुप सुखी आणि भाग्यवान आहे, तेव्हा नैराश्य येण्यापासून दूर रहाण्यासाठी-
*दूसऱ्याच्या ताटात* *ढुंकून पहाण्याची* सवय सोडून आपल्या ताटातील भोजन प्रेमाने ग्रहण करावे.
      *तुलनात्मक* विचार करु नये, *सर्वांचे नशिब* वेगवेगळे असते.
     आणि अजून एक गोष्ट....  सांगीतलेल्या, -ऐकलेल्या काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावे..

शनिवार, २१ जानेवारी, २०२३

मराठी: "साला मी अडाणी होती तेच बरे होते" आयुष्य:सुरेखा सुर्यवंशी. काल्लेक्शन: सुरेंद्र पाथरकर.

*साला मी अडाणी होतो*
*तेच बरं होतं.

साला मी अडाणी होतो तेच बरं होतं...
साधा सर्दी खोकला झाला की, आलं, तुळस काढा घ्यायचो,
पोट दुखलं की,
ओवा चावत जायचो.
ताप आला की, डोक्यावर पाण्याची पट्टी ठेवायचो.
ना टेस्ट, ना स्पेशालिस्टचं झंझट,ना हॉस्पिटलच्या ॲडमिशनमध्ये अडकत होतो...
निरोगी आयुष्य जगत होतो.
*साला मी अडाणी होतो*
*तेच बरं होतं.

राम राम ला राम राम, 
सलाम वालेकुम ला,
वालेकुम अस सलाम 
आणि
जय भीम ला
जय भीमनेच प्रेमाने आणि आदराने उत्तर देत होतो.
ना धर्म कळत होता,
ना जात कळत होती; 
माणूस म्हणून जगत होतो.
*साला मी अडाणी होतो*
*तेच बरं होतं.

सकाळी न्याहारीला दूध भाकरी,
दुपारी जेवणात कांदा भाकरी आणि रात्रीच्या जेवणाला कोरड्यास भाकरी
पोटभर खात होतो, 
हेल्थी ब्रेकफास्टचा मेनू, 
लंचचा चोचलेपणा आणि 
डिनरच्या सॉफेस्टिकेटेड उपासमारीपेक्षा दिवस भर भरपेट चरत होतो.
*साला मी अडाणी होतो*
*तेच बरं होतं.

शक्तिमान सोबत गिरकी घेत होतो,
रामायणात रंगून जात होतो, चित्रहार सोबत आयुष्याची चित्र रंगवत होतो,
ना वेबसिरीजची आतुरता, 
ना सासबहुचा लफडा , 
ना बातम्यांचा फालतू ताण सहन करत होतो.
खऱ्या मनोरंजनाचा आस्वाद घेत होतो.
*साला मी अडाणी होतो*
*तेच बरं होतं.

सण असो की जत्रा;
सुट्टी मिळेल तेव्हा वेळ मस्त कुटुंबासोबत घालवत होतो, 
चार मित्रांमध्ये मिसळत होतो, लोकांमध्ये उठत-बसत होतो.
ना टार्गेटची चिंता होती, 
ना प्रमोशमनचे टेन्शन होत,
ना पगार वाढीची हाव होती;
तणावमुक्त जीवन जगत होतो.
*साला मी अडाणी होतो*
*तेच बरं होतं.

गावातले वाद गावात मिटवत होते.
झाली भांडण तरी रात्री मंदिरात एकत्र येत होतो.
सकाळी पुन्हा एकत्र फिरत कामाला लागत होतो.
ना पोलीस केसची भीती,
ना मानहानीचा दावा,
ना कोर्टाच्या चकरा मारत होतो.
खरोखर खरा सलोखा जपत होतो.
*साला मी अडाणी होतो*
*तेच बरं होतं.

कुटुंबाला प्रेमाने पत्र लिहीत होतो,
पत्राची वाट बघत होतो, 
पत्राच्या प्रत्येक ओळीत प्रेमाचा ओलावा अनुभवत होतो.
ना मोबाईलवर कोरडी बोलणी, ना फॉरवर्डैड मेसेजेस, ना ऑनलाइनच्या निरर्थक चॅटिंगचा उगाच दिखावा करत नव्हतो.
*साला मी अडाणी होतो*
*तेच बरं होतं.

मातीच्या घरात रहात होतो, सारवलेल्या अंगणात बागडत होतो, 
ऐसपैस अर्धा एकरभर जागेत सुखात सगळे नांदत होतो.
ना एक बिएचके मध्ये कोंबलो होतो, 
ना बाल्कनी साठी भांडत होतो ,
ना मास्टर बेडरूममध्ये स्वतःला कोंडून घेत होतो.
मस्त मोकळ्या हवेत ढगाखाली मोकळा श्वास घेत होतो.
*साला मी अडाणी होतो*
*तेच बरं होतं.

अडाणी असताना सुशिक्षीतांत जाऊन त्यांचे आयुष्य जगावे अशी स्वप्न पाहत होतो; 
त्यासाठी मेहनत करत होतो,
आणि जेव्हा सुशिक्षित झालो; त्या भपकेबाजीत घुसू लागलो आणि ते ढोंगी जग बघू लागलो. 
मग परत मात्र वाटू लागलं.
*साला मी अडाणी होतो*
*तेच बरं होतं.

मराठी; आयुष्य - गजानन काळे : *पालक म्हणून हे कर्तव्य नक्की करा*. कॉलेक्शन्: सुरेन्द्र पाथरकर

 *पालक म्हणून हे कर्तव्य नक्की करा*.

1) एक किलोमीटर अंतराचे आत काम असल्यास मुलांना गाडी न वापरण्याचा सल्ला जाणीवपूर्वक द्या. 
2) प्रत्येक घरात एक सायकल हवीच. 

 *मुलांनो हे टाळा*

1) भरपूर नाश्ता जेवण केल्याशिवाय गाडीला हात लावू नका. 
2) कुठलेही वाहन हे लवकर जाण्यासाठी नसून सोयीप्रमाणे जाण्यासाठी आहे हे लक्षात घ्या. 
3) कोणाच्याही गाडीवर "ट्रिपल सीट " नको. 
4) वाहनावर आणि स्वतः च्या ताकदी बद्दल "फाजील आत्मविश्वास " नको. 
5) गाडीची खरंच गरज आहे का हा प्रश्न स्वतः ला विचारूनच गाडी स्टार्ट करा. 
6) वळणावर आजीबात "ओव्हरटेक "नको. 
7) गावात 20ते 30 आणि मोठ्या व गावाबाहेरच्या रस्त्यावर 40 ते  50 स्पिड पुरेसा आहे. यापेक्षा जास्त स्पिड नको. 
8) मित्रांच्या नादाने "रेसिंग किंवा स्टंट "करू नका. 
9)बाईकला असलेले दोन्ही आरसे काढण्याचे फॅड आलंय. पण तसे करणे चुकीचे आहे.
10) रस्त्याच्या कडेला पांढरा पट्टा असल्यास गाडी हळू चालवा आणि रस्त्याच्या खाली उतरू नका. 
11) रस्त्याच्या कडेला पिवळा पट्टा असल्यास गाडी हळू चालवा आणि.. रस्त्याच्या खाली अजिबातच उतरू नका. कडेला ओढा किंवा खड्डा असण्याची शक्यता आहे. 
12) आपले काम झाल्यावर टाईमपास नको. वेळेत घरी निघा.... उशीर झालाच तर "फास्ट"येवू नका. 
13) *डंपर,ऊसाचा ट्रक,सिमेंट- काँक्रीट नेणारा ट्रक, पोकलँड, कंटेनर* यांच्या जास्त जवळ जावू नका. 
14)मोबाईल कानाला लावून किंवा इअरफोन लावून गाडी चालवू नका. 

      *गाडीची काळजी*
1) गाडीचे योग्य वेळी सर्व्हिसिंग झालेले असले पाहिजे. 
2) दोन्ही ब्रेक- मागचा/ पुढचा लागतो का याची खात्री करा. 
3) दोन्ही ब्रेकचा वापर करा. पुढचा ब्रेक लावल्यास तोंडावर पडतो हा गैरसमज आहे. 
4)गाडीचा टेल लँप आणि ब्रेकलाईट लागणे अत्यंत महत्वाचे आहे. 
5) वळताना इंडीकेटरचा वापर करा. 

 *मुलांनो हे आवश्य करा*
1) आपल्या बेशिस्त मित्रांची माहिती त्याच्या आई-वडीलांना ताबडतोब द्या. 
2) दिवसासुद्धा हेडलाईट लावून गाडी चालवा. 
3) गाडी- टूव्हिलर शक्यतो पिवळ्या रंगाची घ्या. शास्त्रीय दृष्ट्या पिवळा रंग कमी प्रकाशातही दिसतो. 
4) ते शक्य नसल्यास गाडीवर मागे-पुढे पिवळे रेडियम लावा.
5) रात्री गाडी चालविताना हिरवे किंवा काळे कपडे नकोत. पिवळ्या रंगाचे हेल्मेट किंवा जॅकेट वापरा. 
6) पुढच्या वाहनापासून किमान 15  फूट इतके सुरक्षित अंतर ठेवा. 
7) टूव्हिलर वापरताना रस्त्यावर आपण पाहूण्यासारख वागाव. मोठ्या वाहनांचा आदर करावा. 
 ट्रक,बस इ.वाहनांचा *DT ड्रायव्हिंग टाईम* जास्त असतो. त्या वाहनांच्या ड्रायव्हरची खोड काढू नका. बर्याचदा या मोठ्या वाहनांचे ड्रायव्हर स्ट्रेस आणि टेंशन मधे असतात. 

       *सर्व शहरवासीयांनो आणि मुलामुलींनो*

 *मुलांनो लक्षात ठेवा अपघात प्रथम मनात घडतो आणि नंतर रस्त्यावर घडतो*
 प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला ही माहिती वाचायला सांगावी किंवा वाचून दाखवावी.
*लक्षात ठेवा मुलांनो तुमच्या जीवनापेक्षा आईवडिलांसाठी जगातील कोणतीही गोष्ट मौल्यवान नाही. तुम्ही खूप खूप महत्वाचे आहात. तुमच्या शिवाय जगणं त्यांच्यासाठी कल्पनेतसुध्दा असह्य आहे*
खरं सांगते तुमच्या दोनतीन मिनिटांच्या स्टंट करण्याने झूम स्टाईल बाईक चालवण्याचे कुणी सुध्दा इंप्रेस होत नाही. फक्त यमराज सोडून. ते इंप्रेस झाल्यावर मग घेऊनच जातात सोबत.आणि .......
   नंतर मात्र तुमचं घरं स्मशान होऊन जातं. पुन्हा कधी सुध्दा तुमचे आईवडील आयुष्य जगत नसतात.फक्त आला दिवस ढकलत राहतात.म्हणून हात जोडून विनंती मुलामुलींनो वाहनांशी मस्ती करू नका

मराठी: पुनर्जन्म : अशोक कुलकर्णी . कॉलेक्सन: सुरेंद्र पाथरकर

पुनर्जन्म
<><><><><><><><><><><>
नको मोक्ष मज नकोच मुक्ती
पुन्हाच मानव जन्म हवा
या जन्मी जे राहून गेले
भोगाया ते जन्म हवा

कधी न पुसले अश्रू कुणाचे
हासू न कोण्या ओठी आणले
प्रवाहात ना कधी पोहलो
काठावरती जीणे टांगले

शब्दांचे घट भरता-भरता
शब्दच अवघे जीवन झाले
तरी उपेक्षित जीणेच जगलो
यश शिखराचे कधी न पाहिले

योग्य पुत्र ना योग्य पति मी
योग्य बंधु ना योग्य सखा मी
अपूर्णतेचा शाप शिरावर
जीवन अवघे जळत राहिले

पुण्य न इतके कधी साठले
पापाचे ना टोक गाठले
जन्म-मृत्यूच्या फे-यामधुनी
सुटण्याचे मी दोर कापले

जगायचे जे राहून गेले
जगावया ते जन्म हवा
मोक्ष-मुक्ती ती नकोच मजला
पुन्हाच मानव जन्म हवा

: अशोक कुळकर्णी

मराठी: आयुष्य: निलेश जमदाडे .*मुलिंची खरच लग्न करायची आहेत.......?????*कलेक्शन: सुरेन्द्र पाथरकर

*मुलिंची खरच लग्न करायची आहेत.......?????*

कमी शिक्षण आहे - नको
पगार कमी आहे - नको
खेड्यात राहतो - नको
स्वतःचे घर नाही - नको 
घरात सासू सासरे आहेत - नको
शेत नाही - नको 
शेती करतो - नको
धंदा करतो - नको
फार लांब राहतो - नको
काळा आहे - नको
टक्कल आहे - नको
बुटका आहे - नको
फार उंच आहे - नको
चष्मा आहे - नको
वयात जास्त अंतर आहे - नको
तो जिथे राहतो तो एरिया बरोबर नाही- नको
एक नाडी आहे - नको
मंगळ आहे - नको
नक्षत्र दोष आहे - नको
मैत्रीदोष आहे - नको
सगळ्यालाच नकार देत राहिलात तर *मग लग्न कधी करणार*?
संसार कुणाबरोबर करणार ?
आई/ वडील कधी होणार ?
सासू/सासरे कधी होणार?
आजी/आजोबा कधी होणार ?
बरं एवढया सगळ्या कारणांसाठी मुलाला नकार देत असताना मुलींमध्ये अशी कोणती खास गुणवैशिष्ट असतात हे आईवडील सांगू शकतील काय ? अनेक मुलींना संसार कसा करतात हे माहीत नसतं, तडजोड कशी करायची हे माहित नसतं, रोजच जेवण सुद्धा बनवता येत नाही काही मुलींना. मान्य आहे मुली हुशार आहे, शिकलेल्या आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार जावयाची, त्याच्या लठ्ठ पगाराची, त्याच्या प्रॉपर्टीची अपेक्षा ठेवणार त्या अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून स्थळांना नकार देत राहणार आणि मुलीचं वय वाढत राहणार... या सगळ्यात नुकसान होतंय ते कमी पगार असलेल्या चांगल्या स्वभावाच्या आणि निर्व्यसनी मुलांचं... ज्यांना मनापासून जोडीदार हवा असतो पण मुलींच्या, त्यांच्या आईवडिलांच्या आणि नातेवाईकांच्या वेलसेटल च्या व्याख्येत ते बसत नाहीत त्यामुळे ते मागे पडतात,
मुलाचा लग्नाच्या वेळेस असलेल्या पगारावर मुलीच्या भविष्याची चिंता त्यांच्या पालकांनी करण्यापेक्षा त्या मुलावर विश्वास दाखवून मुलीच त्याच्यासोबत लग्न करून देण गरजेचं आहे, कारण त्या मुलाचा जो पगार आता आहे तोच भविष्यात राहणार नाही, त्यात दरवर्षी वाढ होत राहणार आहे तसंच लग्न झाल्यावर त्या मुलाला पण त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, भरारी घेण्यासाठी नवीन उत्साह, उमेद, बळ मिळणार आहे आणि पगार चांगला आहे म्हणजे मुलगी सुखी राहील हा एक गैरसमज आहे, भविष्यात काय होईल हे कोणालाच माहिती नसतं, त्यामुळे राजाचा रंक आणि रंकाचा राजा होऊ शकतो.
हल्ली लग्न म्हणजे मुलामुलींपेक्षा त्यांच्या आईवडिलांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी स्टेटस सिम्बॉल चा विषय झालेला आहे.
माझा जावई डॉक्टर, इंजिनीअर, MBA, C A, MCA आहे हे सांगण्यात, एवढं लाखाचं पॅकेज आहे हे सांगण्यात पालकांना मोठेपणा वाटतं आहे आणि तसं स्थळ मिळावं यासाठी प्रत्येक मुलीचा, मुलीच्या आईवडिलांचा आणि नातेवाईकांचा प्रयत्न असतो, पण सर्वांनीच अशा अपेक्षा ठेवल्या तर बाकी मुलांनी करायचं काय ? त्यांची लग्न कशी होणार हा प्रश्नच आहे.
जेव्हापासून लग्नात माणसापेक्षा शिक्षण, पैसा, प्रॉपर्टी याला जास्त महत्व आलंय तेव्हापासून नवरा बायको मध्ये भांडणाचं आणि घटस्फोट होण्याचं प्रमाणही वाढलंय हे सत्य विसरून चालणार नाही.
लग्नात भौतिक सुखांपेक्षा मानसिक सुखाची, आधाराची, समजूतदार पणाची जास्त गरज असते.

पुढच्या जन्मात मनुष्य देह मिळेल  की नाही माहिती नाही,
स्वर्गातून भगवंत नेहमी तथास्तु म्हणत असतो. 
आणि आपण सगळ्याच गोष्टीत नकारात्मकता ठेवून या जन्मातला  सगळा अर्थच संपवून टाकतोय.

आईवडिलांनी आपल्या मुलाचा / मुलीचा सुखाचा विचार जरूर करावा,
पण तो करताना त्यांच्या वाढत जाणाऱ्या वयाचं आणि निघून चाललेल्या वेळेचं भानही आईवडिलांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी ठेवायला हवं, कुठेतरी थांबायला हवं आणि अपेक्षांवर अडून न बसता तडजोड करून पुढे जायला हवं, कारण अपेक्षा या कधीच न संपणाऱ्या असतात...

मराठी: माणसे जिंकायची आहेत?श्री. व.पु.काळे (कादंबरी 'स्वर' ) कलेक्शन: सुरेन्द्र पाथरकर

माणसे जिंकायची आहेत ?
मग दोन तीन मिनिटे काढून हे वाचाच !!
एका ऑफिसमध्ये लेडीज रिसेप्शनिस्टची जागा भरायची असते. पेपरला जाहिरात देण्यात येते. कंपनी नामांकित असल्याने अर्जही खूप येतात. ठरलेल्या दिवशी मुलाखती सुरू होतात. बॉस स्वतःच मुलाखत घेत असतो. एकीची मुलाखत चालू असतानाच टेबलावरचा फोन वाजतो. डिस्टर्ब् झाल्याने बॉस त्रासून फोन उचलतो. मात्र तिकडून अतिशय गोड आवाज येतो. 
"नमस्कार सर, मी स्वरदा बोलतेय."
फोनवरचा तो गोड आणि मंजुळ आवाज ऐकून बॉसचा वैताग कमी होतो. 
बॉस : "बोला"
"काही नाही. तुमच्या ऑफिसमधील रिसेप्शनिस्टच्या जागेसाठी मलाही यायचंय."
बॉस : "मग प्रॉब्लेम काय आहे ? इथे मुलाखती सुरू आहेत. तुम्हीही येऊ शकता"
"तेच तर न सर, मलाही यायचंय पण ट्रॅफिक जाममध्ये अडकली आहे. पोचायला उशीर होतोय:"
बॉस : "ओके ओके, या तुम्ही"

इकडे मुलाखत सुरू राहते. अजून एकदोन मुलाखती होतात . पण बॉसच्या कानात त्या स्वरदाचा आवाज गुंजत असतो. 
दहा पंधरा मिनिटांनी पुन्हा फोन येतो. 
"सर, ट्रॅफिक कमी झालेय मी निघाली आहे. पण प्लिज सर उशीर झाला तर समजून घ्या"
बॉस : "हरकत नाही. या तुम्ही, पण शक्यतो वेळेत या"

पुन्हा तो आवाज ऐकून बॉस विचार करू लागतो. खरेच किती सौजन्यशील मुलगी आहे. फोनवरचा आवाज ऐकताना आपण मंत्रमुगध होतोय. हीच मुलगी परफेक्ट आहे रिसेप्शनिस्ट म्हणून !!
तरी इकडे अजून शिल्लक उमेदवाराच्या मुलाखती सुरूच असतात. पण बॉस आता या मुलाखती औपचारिकपणे घेत असतो. कारण त्याच्यासाठी "स्वरदा" फिक्स झालेली असते. इतक्यात अर्ध्या तासाने पुन्हा फोन येतो.
"सर, मी तुमच्या ऑफिसच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये आहे. पण गाडी लावायला जागा नाहीये. मी बाहेर रस्त्यावर कुठे जागा मिळतेय का पाहून येतेय. सर प्लिज, त्यामुळे थोडा उशीर होतोय. प्लिज प्लिज"
बॉस : "हरकत नाही. या तुम्ही सावकाश"

आता बॉसला तिला भेटायची, पाहायची उत्सुकता लागून राहते. इतक्या मंजुळ आवाजाची मुलगी, नक्की कशी असेल ? म्यानर्स तर चांगले आहेत. नक्की हिलाच घेऊया. 

अजून सात आठ उमेदवार शिल्लक असतानाच एक चिट्ठी घेऊन शिपाई केबिनमध्ये येतो. चिट्ठीवर लिहिलेले असते.
"सर, मी स्वरदा, आलेय तुमच्या ऑफिसमध्ये"
बॉस बाकी उमेदवाराची लिस्ट बाजूला ठेवूंन तिला लगेच आत बोलावतो. 
स्वरदा आत येते. आणि sssssss 
बॉस एकदम दचकतो. दारात एक सावळी (जवळपास डार्कच कलरची, थोडीशी ग्रामीण ढंग वाटावा अशी "स्वरदा" उभी असते. बॉसचा भ्रम निरास होतो. त्याच्या अपेक्षेत तिची प्रतिमा जरा वेगळीच (आणि सुंदर वगैरे) असते. 
स्वरदा बोलू लागते. 
"सर, मला माहीत आहे. तुम्ही मला पाहून निराश झाला असणार. तुमच्या अपेक्षे प्रमाणे मी दिसायला सुंदर नाही. ते मलाही माहीत आहे. पण सर, मी इथे येण्याआधी तुमच्या कंपनीची माहिती काढलीय. त्यानुसार इथे बाहेरून येणारे ग्राहक कोणीच नसतात. आपली सर्व कामे फोनवर चालतात. आणि सर फोनवर आवाज लागतो, सौंदर्य नाही. हे तुम्हालादेखील माहीत आहे. आणि अजून एक सर, केवळ सौंदर्य नाही म्हणून आजवर अनेक ठिकाणाचा नकार पचवलाय. यावेळी म्हणून मी थोडा वेगळा विचार केला. आणि ठरवून तुमच्याशी मुद्दाम आधीच तीनचार वेळा फोनवर बोलत राहिले. माझे जे मेन qualification आहे तो आवाज तुम्ही ऐकला. म्हणून तर बाकी उमेदवाराला बाजूला ठेवून तुम्ही आधी मला आत बोलावलेय. आता निर्णय तुम्ही घ्यायचाय सर"
**
दोन मिनिट निशब्द शांतता. 
बॉस : "ते ठीक आहे. पण तरी इथे इतर स्टाफ वेगळ्या स्टाईलमध्ये राहणारा आहे. त्यांना तू आणि तुलाही ते ऑकवर्ड होईल. त्याचे काय ?"
स्वरदा : "मनासारखी अप्सरा तर कुणालाच मिळालेली नसते. तुमचे लग्न झाले असणारच. विचार करून पहा सर,. तुमच्या १००% अपेक्षेसारखी पत्नी आहे का ? पण तरी तुम्ही सुखी होताच न. कारण सहवासाने समोरच्यामधील एखादे वैगुण्य नंतर ते वैगुण्य वाटत नाही सर. तसेच इथल्याचे होईल"

तात्काळ बॉसने ड्रॉवरमधून अपॉईंटमेन्ट लेटर काढले, त्यावर सही केली आणि म्हणाला, 
"उद्या सकाळी तू रिसेप्शन टेबलवर मला दिसली पाहिजेस. गुड लक"
आपल्यात उणीव आहे, किंवा आपण कशात तरी कमी आहोत, म्हणून निराश होण्याचे कारण नाही. दुसरा असा एकतरी गुण नक्की असेल जो तुम्हाला विजयी करेल. यशस्वी करेल. त्या "एका" गुणांचा शोध घ्या. नक्की सुखी व्हाल......

व. पु. काळे   (कादंबरी  'स्वर' )    
                                          ------------

बुधवार, १८ जानेवारी, २०२३

मराठी: आयुष्य : बर्वे हार्ट :. अल्झायमर: कलेक्शन: सुरेंद्र पाथरकर



अमित,
 *अरे बाबा उठले नाहीत का अजून?* औषधांची वेळ चुकली की मग सगळं तंत्रच बिघडतं रे त्यांचं! 
*अमित, जरा बघतोस का खोलीत जाऊन त्यांच्या*? माझ्या पोळ्या चालल्यात भाजी ठेवलीय गॅस वर! तुझा डबा भरायचाय अजून! 
उठल्या उठल्या चहा लागतो त्यांना आणि तोही सकाळी सातच्या ठोक्याला, पावणे आठ होत आले, आज चहा चहा करत किचन मध्ये आले नाहीत!
 
अदितीचं बोलणं ऐकताच अमितलाही आश्चर्यच वाटलं, बाबा अजून उठले कसे नाहीत? तो लगेचच उठून त्यांच्या खोलीत गेला, *बाबा अजून झोपलेलेच होते*. 
बाबा उठा.. आठ वाजत आले! आज चहा नकोय वाटतं? 
काही प्रतिसाद नाही म्हणून अमित त्यांना हलवून उठवू लागला तर प्रतिसाद न देणार *बाबांचं थंडगार पडलेलं शरीर बघताच तो जोरात ओरडलाच* , अदितीsss आगं इकडे येss हे बघ बाबा उठत नाहीयेत!

पोळपाटावर लाटत असलेली पोळी आणि तव्यावरची भाजत ठेवलेली पोळी तशीच  अर्धवट ठेऊन *गॅस बंद करून अदिती धावत बाबांच्या खोलीत पळाली*.

अमितला काही सुचनासं झालं होतं. अदितीs बाबा उठत नाहीयेत! अदीतीही घाबरून गेली आणि बाबांना हलवत उठवू पाहत होती. बाबा उठत नाहीयेत! अदितीच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या. स्वतःला सावरत ती अमितला म्हणाली अरे औषधांमुळे गाढ झोप लागली असेल थांब मी डॉक्टरांना फोन करते.

अदितीने बाबांच्या नेहमीच्या डॉक्टरांना फोन लावला 
हॅलो डॉक्टर, मी गीता बोलतेय 
हो हो बोल.. *बाबा बरे आहेत ना?परवाच  येऊन चेक करून गेलो*. बी पी वाढलेलं होतं पण औषधं बदलून दिली आहेत.

अदिती : डॉक्टर *बाबा उठतच नाहीयेत* . बहुतेक... तुम्ही याल का घरी लगेच?

डॉक्टर : हो हो येतो मी लगेचच.

डॉक्टर पुढच्या दहा मिनिटात घरी पोहोचले. अमितच्या पाठीवर थोपटत म्हणाले *पहाटेच गेलेत ते, बी पी शूट झालं असावं*. मी डेथ *सर्टिफिकेट* लिहून  देतो. 
 
डॉक्टरांचं बोलणं ऐकून अदिती *ढसाढस रडू लागली*. 

डॉक्टर तिला म्हणाले गीताss *जन्म मरण आपल्या हातात थोडी असतं* आणि वय ही झालंच होतं ना त्यांचं? काहीतरी निमित्त व्हायचंच. 
अमित कडे पहात ते म्हणाले मी तर म्हणेन सुटले ते बरं झालं नाहीतर *अल्झायमर सारख्या आजारात पुढे खूप त्रास सहन करावा लागतो पेशंट आणि त्याच्या नातेवाईकांना* देखील...
 
*डेथ सर्टिफिकेट* वर त्यांचं नाव काय लिहायचं? *मी त्यांना तपासायला यायचो तेव्हा तुमचं ऐकून ऐकून बाबाच म्हणायचो नेहमी*. गीताचे बाबा म्हणूनच मी ओळखतो यांना. 

अदिती आणि अमित दोघेही थोडे गोंधळून गेले.. 
अदिती त्यांना म्हणाली डॉक्टरss माझं नाव गीता नाहीये माझं नाव अदिती!

*गेल्या दहा वर्षांपासून मी गीता झाले होते बाबांची!*
 
डॉक्टर: म्हणजे? 

डॉक्टर, दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे! मी मंडईत भाजी आणायला गेले होते, भाजी घेऊन बाहेर पडले आणि रिक्षाला हात करत उभी होते. तितक्यात *गीताss गीताss म्हणून मागून हाक आली आणि एक आजोबा माझ्याजवळ येऊन माझा हात धरून म्हणायला लागले* , गीता ss अगं मला घर सापडत नाहीये आपलं! केव्हाचा मी इथे थांबलोय पण कुठे जायचं कळत नाहीये. बरं झालं तू आलीस चल घरी जाऊ. 

*आजोबा चांगल्या घरातले वाटत होते*, दिसायलाही आणि त्याच्या कपड्यांवरूनही. माझा हात धरून म्हणायला लागले गीता sss चल लवकर मला भूक लागलीय कधीची? 

काय करावं मला  सुचेना!

*आजोबांचं केविलवाणं बोलणं ऐकून* वाटलं घरी घेऊन जावं याना काहीतरी खायला द्यावं आणि सावकाश त्यांना त्यांचा पत्ता विचारून घरी सोडावं. रिक्षा पकडून आम्ही दोघं घरी आलो.
 
पोहोचताच आजोबा ओरडायला लागले "गीताsss आमटी भात वाढ गं लवकर खूप भूक लागलीय" 
घाईने त्यांना जेवायला वाढलं. *बऱ्याच दिवसांचे उपाशी असल्या सारखे ते जेवत होते*. पोटभर जेवून झाल्यावर त्यांना विचारलं , *आजोबा कुठे राहता तुम्ही?* आठवतंय का? मी सोडते तुम्हाला तुमच्या घरी!
 
त्यावर त्यांचं उत्तर , गीता हेच तर घर आहे ना आपलं? मला कांही सुचत नव्हतं! आजोबा जेवण झाल्यावर बाहेर सोफ्यावर झोपून गेले. 

संध्याकाळी अमित घरी आला तेव्हा त्याला हा प्रकार सांगितला तेव्हा *तो म्हणाला आपण शोध घेऊ त्यांचा घराचा पत्ता आणि नातेवाईकांचा*. बातम्यांमध्ये , पेपरमध्ये कोणती मिसिंग कंपलेंट आहे का दोन तीन दिवस चेक करत होतो. पोलीस चौकीत कळवलं! *पोलिसांचं म्हणणं पडलं काही शोध लागला तर कळवू तोपर्यंत तुमच्याकडे राहूदे त्यांना*.

तुम्हाला अडचण वाटत असेल तर त्यांची सोय सरकारी वृद्धाश्रमात किंवा दवाखान्यात करू.
 
दोन दिवस गीता गीता म्हणत माझ्या मागे मागे करत होते अगदी. गीता आज भेंडीची भाजी कर, लसणाची फोडणी देऊन कढी कर आशा फर्माईशी करत होते.
त्यांच्याकडे पाहून मला खूप वाईट वाटत होतं, भरून येत होतं पण आजोबांचं ते आपुलकीचं हक्काचं बोलणं आवडायलाही लागलं. 
आठवडा झाला आजोबांच्या घराचा, माणसांचा काही शोध लागला नाही.

*घरात असलेल्या अशा मोठ्या माणसाचा आम्हालाही आधार वाटू लागला* . त्यांचं करावं लागतं होतं त्यात आनंदच वाटू लागला. त्यांची काही मदत न होवो पण त्यांचं  अस्तित्व आमचा आधार बनू पहात होतं...
 
मी आणि अमितने निर्णय घेतला *आजोबांना आपण इथेच ठेऊन घेऊ*. पोलिसांना तशी कल्पना देऊन ठेवली होतीच. तेव्हापासून ते आमचे बाबा झाले.
 
आज *दहा वर्ष झाली त्या गोष्टीला! माझं दुसऱ्यांदा नामकरण झालं* गीता!

आज बाबांबरोबर गीताचंही अस्तित्व संपलं!

अदितीचं बोलणं ऐकून डॉक्टर निःशब्द झाले थोड्यावेळ! मला *जरासुद्धा कल्पना आली नाही कधी की हे तुमचे वडील नसून* कोणी परके आहेत! *खरंतर अल्झायमर हा आजार फार गंभीर आहे* आणि आजकाल  बऱ्याच वृद्धांना याने ग्रासलं जात आहे ही फार मोठी समस्या होत चाललीय.

*आजकाल पोटच्या मुलांना धडधाकट आई वडील नको झालेत*, पैसे प्रॉपर्टी गिळंकृत करून *म्हाताऱ्या आई वडिलांची जवाबदारी टाळली जाते*. दिवसेंदिवस वृद्धाश्रम वाढत चालले आहेत. पण अशीही माणसं आहेत जगात! याचं आश्चर्य वाटतंय मला.
 
अश्रू अनावर झालेल्या अदिती आणि अमितच्या पाठीवर हात फिरवून, *डेथ सर्टिफिकेट देऊन डॉक्टरही पाणावलेल्या डोळ्यांनी तिथून बाहेर पडले*.

मराठी: आयुष्य: संदेश नाईक: मोकळे व्हा: Always Be Open कलेक्शन: सुरेंद्र पाथरकर

*मोकळे व्हा*

लाखो जीव घेणार्‍या क्रूर  •हिटलरने• आत्महत्या केली शेवटी.!••
सुंदर विचार देणारे ●साने गुरुजी● आत्मघात करुन घेतात.
मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे स्वामी ●विज्ञानानंद●मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात.
आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण केलेले व कित्येकांना आधार देणारे ●भैय्युजी महाराज●आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात.
पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करुनही ●सुशांत सिंग● राजपुतनं नैराश्यातून आत्महत्या केली.
-आणि आता सहा आठ महिन्यापूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या ●शीतल आमटे करजगी● आपलं जीवन संपवतात. 
आजची नागपूर ची बातमी उच्च विद्याविभूषित, दिवंगत कुलगुरू च्या पत्नी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख ●डॉ. ज्योत्स्ना मेश्राम● यांनी नवव्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या करतात.

या काही सेलिब्रिटींच्या उदाहरणातुन काय शिकायचं आपण.? 

पाण्यात शांतपणे पोहोणारं बदक वरुन शांत दिसत असलं तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात.     शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी फक्त. ●त्याचे कष्ट त्यालाच माहित असतात.●

माणुस वर वर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असं नाही. मनात वेगळी खळबळ असु शकते त्याच्या, जी आपल्यापर्यंत पोहोचत नसते किंवा तो त्या आनंदी आणि सुखी चेहर्‍याच्या आड लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो.  शेवटी काय...?? वर सुंदर ●ताजमहाल● असला तरी खाली पायात ●कबरच● आहे, हे विसरुन चालत नाही.

●Outlet●
●भय्यूजी महाराजांनी●आत्महत्या केल्या नंतर ●ABP माझा चँनल●ने एक परिचर्चा घडवून आणली होती.
त्यात बोलताना भय्यूजी महाराजांचे मित्र - ●अशोक वानखेडे● यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला. भैय्यूजी महाराज स्वतः एक ●"अध्यात्मीक"● गूरू होते, परंतू ते एक व्यक्ती पण होते.● आपल्या मनातील ●"स्ट्रेस"●बाहेर काढायला त्याच्या जवळ *●"outlet"●* नव्हता. ●डॉ. शितल आमटे●
(बाबा आमटे यांची नात - त्याचं ही अगदी भैयु महाराजासारखं झाले)

इतकं महत्वाचं असतं का हे outlet.?
●होय !●
कोट्यावधी रूपये खर्च करून पाण्यासाठी ●विशाल धरण● बांधलं आणि समजा त्याला outlet च दिले नाही तर काय होईल? निश्चितच धरण फूटेल. इतकं महत्वाचं असते हे ●waste weir...●मानवी शरीर म्हणजे विवीध पंचतत्वापासून सांधलेलेलं एक ●धरणच●आहे. या शरीरात समस्यांची आवक अती प्रमाणात झाली तर हे शरीररूपी धरण फूटेल की राहील ?

●मुंबई का तुंबते? पुरेसे outlets राहिले नाहीत.●

म्हणून आपलं outlet सदैव सताड उघडं ठेवा. आपल्या ●तोंडाचे outlet● वापरून आपल्या समस्या, आपल्या माणसांना सांगा. आपल्या अंर्तमनाचं outlet open करण्यासाठी ●विपश्यना, ध्यान साधनेचा अवलंब● करा आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात मोठं outlet म्हणजे आपले ●डोळे, ते उघडा.●फुटून जाऊ द्या ●अश्रूचा बांध●...वाहून जाऊ द्या.. ●स्ट्रेस, दूःख, उपेक्षा..● पिस्तोलच्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, पंख्याला लटकण्यापेक्षा.. ●हे केव्हाही सोप्प नाही का.?●

म्हणूनच ●मित्र● नावाच्या खांद्याचा आधार घ्या. मन मोकळं करा. ●बेस्ट आउटलेट परीवार आणि मित्र!●
●हसा ! बोला ! रडा ! भांडा !●
●व्यक्त व्हा !!  मुक्त व्हा.. !!● 

●काळजी घ्या●....

  🙏😊🙏सोडून गेल्यावर "ᴍɪss ʏᴏᴜ" म्हणण्यापेक्षा

सोबत आहे तोपर्यंत "ᴡɪᴛʜ ʏᴏᴜ" म्हणा. 
*आपुलकीची माणस मिळायला खुप मोठं भाग्य लागतं.*
🙏🙏🙏🙏

मंगळवार, १७ जानेवारी, २०२३

मराठी: आयुष्य: सुरेखा सुर्यवंशी. संस्कार सर्वश्रेष्ठ आहेत. colleaction: सुरेंद्र पाथरकर

अगदी जड अंतःकरणाने अविनाशने कारच्या डिक्कीचा दरवाजा उघडला, आईची बॅग आत सरकवली, दरवाजा बंद केला, दरवाज्याच्या काचेवर ठळक “आईची पुण्याई” लिहलेल्या अक्षराकडे पाहून त्याचे डोळे पाणावले! कारचा दरवाजा उघडला, आई आत बसली अन गाडी निघाली.
दोघेही शांत होते !
बाबा गेल्यावर सर्व घराची धुरा सांभाळत आईबाबा दोघांची जबाबदारी आपल्या सर्व आशा आकांक्षा बाजूला गुंडाळून आईने प्रचंड ताकतीने पेलवली होती! बाबानंतर बाबांच्या पेन्शनच्या पैशातून त्यांच्या स्वप्नातील त्यांचे घर चालवत एकुलत्या एक अविचे उच्चशिक्षण, एका नामांकित कंपनीत मोठ्या पॅकेज ची नौकरी, उच्च विद्याविभूषित संस्कारी घरातील मुलीशी विवाह, एक गोंडस आजीच्या छत्रछायेत वाढलेली संस्कारी कन्यारत्न अन गेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी अविच्या स्वप्नातली त्याला घेऊन दिलेली ही कार ! सर्व अविच्या जमेची बाजू होती !
सातव्या महिन्यात जन्मलेली ‘मनू’ कदाचित वाचणार नाही असे डॉक्टरने सांगितल्यावर सर्व देव पाण्यात टाकून, बाबांचे वर्षश्राद्ध न करता सतत वीस दिवस आई दवाखान्यातून हलली सुद्धा नव्हती ! मनू आज दहा वर्षाची झाली तरी आईपेक्षा आजीच्या सानिध्यात राहूनच तिने ‘उत्तम संस्कार’ आत्मसात केले होते, त्याचा परिणाम पण असा होता की शाळेच्या पालक सभेत जाणे अन मनूची प्रशंसा ऐकून घरी परत येणे! याशिवाय अवि अन उच्चविद्याविभूषित पत्नी ‘जयंती’ कडे पर्याय नव्हता !
सर्वकाही ठीकठाक चालले होते !
आई आईचे सर्व काम स्वतःच करत होती ! आजपर्यंत आईने अविकडे एक रुपया देखील मागितला नव्हता !नियमित चालणे, धार्मिक ग्रंथाचे वाचन, न चुकणारा हरिपाठ यामुळे तिला दवाखाना माहीत नव्हता !
पण सर्वच सुखात चालले तर दुःखाने कोणाच्या खांद्यावर डोके टेकायचे ………????
उच्चविद्याविभूषित संस्कारी घरातील सून आणण्याचा आईचा निर्णय कदाचित चुकला होता ! सुंदर, सालस, संस्कारी, गर्भश्रीमंत होती पण माणसाला माणूस अन प्राण्याला प्राणी समजण्याची कला तिला अवगत नव्हती !
छोट्या छोट्या गोष्टींमुळे, मैत्रिणींच्या सल्ल्यामुळे, माहेरच्या गुजगोष्टीमुळे तिने गेल्या तीन महिन्यापासून अविचे अक्षरशः डोके खाल्ले होते, अन गेल्या पंधरा दिवसापासून अविशी अबोला केला होता !
विपन्नावस्थेत असलेला अवि प्रचंड मानसिक दबावाखाली जगत होता, त्याच्या मनात अस्तित्व निर्माण करणारी जननी विरुद्ध जन्मजन्मांतरी साथ देणारी(?) पत्नी यांचे पारंपरिक युद्ध तो प्रत्यक्षात अनुभवत होता !
याचा पूर्णविराम त्याला हवा होता.
आईला कळू न देता त्याने एका वृद्धाश्रमाची माहिती तो काढून आला होता !अन आज आईने घेऊन दिलेल्या कारमध्ये तो आईला बसवून त्या वृद्धाश्रमात सोडण्यासाठी निघाला होता अन ते पण आईला याची पूर्वकल्पना न देता !! त्याच्यासाठी हा दैवदुर्विलास !!
गाडी गल्लीतून मुख्य रस्त्याला लागली, ताकतीने पळण्याची क्षमता असूनही गाडी फारच कमकुवत मनाचा चालक बसल्यामुळे अगदी चालकाच्या सोयीप्रमाणे चालत होती ! आईने पॉकेट ज्ञानेश्वरी काढली अन वाचत बसली !
आईने अविला एका शब्दाने विचारले नव्हते की तो तिला कुठे घेऊन जात आहे ! कदाचित तिला कळले तर नसेल ?? त्याच्या मनात एक संघर्ष पेटला होता, आयुष्य घडवणारी आई का आयुष्याच्या शेवटपर्यंत साथ देणारी पत्नी ??
पण आई माझ्या भावना समजावून घेईल अन माझ्या निर्णयाला नेहमीप्रमाणे समर्थन देईल या भावनेतून त्याने आईला न सांगता हे पाऊल उचलले होते ! पण आईला प्रत्यक्ष बोलण्याची हिम्मत त्याच्यात अजिबात नव्हती !!
काय सांगू ? कसे सांगू ? या विचारात गेल्या नव्वद दिवसापासून होता तो !!

यएखाद्या मालिकेमध्ये एकाच भागात संपणारा विषय तीन महिने घोळावा अन त्यातून काहीतरी अनपेक्षित बाहेर यावे तसाच हा विषय होता !! समोरील चौकातून गाडी डावीकडे वळली, महिन्याच्या वारीसाठी एकादशीला नाथमहाराजांच्या दर्शनाला जाणाऱ्या आईचा अगदी पाठ झालेला रस्ता असल्याने आईने त्या रस्त्याचे दर्शन घेतले.
हळव्या मनाच्या अविच्या डोळ्यात अश्रू थांबत नव्हते, सतत गालावर ओघळत होते.
गाडी वृद्धाश्रमच्या दिशेने चालत होती, अविच्या मनातला संघर्ष तीव्र होत होता ! जगण्याची कला ज्या गुरूंनी शिकवली होती त्याला, त्यांना तो अखेरचा श्वास कुठे घ्यावा हे शिकवायला निघाला होता !! त्याच्या माथी आज भयंकर संकट धर्मयुध्दाच्या रूपाने उभे होते ! कोणत्याही परिस्थितीत अपयश त्याच्याच पदरी पडणार होते !!
अत्यंत रहदारीचा रस्ता असल्याने त्याची नजर फक्त समोर होती, दुरवर एक रसवंती दिसली. रसवंतीवर थांबून मन मोकळे करावे असा विचार त्याच्या मनात आला. सर्व आईला सांगून मोकळे व्हावे, आई जे म्हणेल त्याला सामोरे जावे असा विचार त्याने केला ! गाडी थांबली !
वेड्यावाकड्या लाकडावर उभ्या केलेल्या चार पत्राच्या शेडमध्ये एक चरक उभे केले होते. चरकाच्या वर विठ्ठलाचा फोटो अन त्याच्या शेजारी एका तरुणाचा हार घातलेला फोटो होता! एक आजीबाई चरकातून ऊस ढकलण्यात अन चरकासमोर उभी राहून पिळून निघालेला ऊस आजीबाईंच्या हातात पुन्हा देण्यात एक तरुण स्त्री मग्न होती, उसाचा शेवटचा थेंब आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी त्यांची धडपड वाखाणण्याजोगी होती ! एका इंग्रजी शाळेच्या गणवेशातील नऊ दहा वर्षाची पोर टेबलवर पिण्याचे पाणी ठेवत हाफ का फुल ? गोड आवाजात विचारत होती.
अंगठा अन तर्जनी ताणून दाखवत अविने तिला फुल्ल रस पाहिजे असा इशारा केला, ती चरकाकडे वळाली. रस आणून ठेवला.

“नाव काय गं तुझं ?” कुतूहलाने आईने त्या मुलीला विचारले.
“माय नेम ईज ‘भागीरथी’ ” सांगत ती आपल्या कामात व्यस्त झाली.
आईने रस पिऊन संपवला, अविने अजून ग्लासला हात लावला नव्हता.
अवि विचारात मग्न होता अन आई निरखून त्या तरुणाच्या फोटोकडे पहात होती ! चरक बंद झाला होता, आईचे निरीक्षण करणाऱ्या आजीबाई आईच्या बाजूला बसत बोलली, “ल्योक हाय माझा ! डायव्हर हुता ! आक्सिजंट मधी गेला ! आम्हास्नी रस्त्यावर टाकून !”
तिचे डोळे पाणावले होते ! आईने तिच्या खांद्यावर हात ठेवला, तिचे पण डोळे पाणावले !
गिऱ्हाईक आल्याने आजीबाई उठली, अवि सर्व पहात होता.
अवि दहा वर्षाचा असतांना त्याचे बाबा गेले पण त्याच्या संगोपणात कसलीच कमतरता येऊ न देता त्याला आज समाजात ताठ मानेने फिरवणारी त्याची आई होती ! या कुटुंबावर आज जी वेळ आली तशी त्याच्या आईवर आली असती तर ?? किंवा भविष्यात जयंती अन मनू वर अशी वेळ आली तर ??? या विचाराने अवि अगदी कोमात गेल्यासारखा बसला होता !

“अवि रस घे ना रे बेटा !” आईच्या शब्दाने तो खडबडून जागा झाल्यासारखा “हो आई!” बोलून एका घोटात रस संपवत ग्लास खाली ठेवला.
बिल देत दोघेही गाडीत बसले ! गाडी निघाली !
.
.
.
जातांना म्हातारीने कसली कळकट पर्स ठेवली म्हणून उत्सुकतेने जयंतीचे ती उघडली, तिच्या नावे केलेली पंधरा लाखाची एफ.डी. अन मनूच्या नावे केलेली दहा लाखाची एफ. डी. व आईचे काही जुने दागिने होते त्यात ! जयंतीचे डोळे विस्फारले, त्यात आपोआप पाणी आले, ती ढसाढसा रडत होती, स्वतःच्या मुलाच्या नावे एक रुपयाही न टाकता सून अन नातीच्या नावे आपली सर्व पेन्शन समर्पित करणारी सासूच्या रुपात लाभलेल्या आईला तिने काही क्षणापूर्वी घरातून काढले होते ! स्वतःच्या नजरेत आज अपराधी झाली होती ती !!
.
.
.
तिने फोन उचलला..अविला लावला…
फोन वाजला, जयंतीचा होता, उचलला नाही, पुन्हा आला, उचलला नाही, पुन्हा वाजला, पुन्हा उचलला नाही !
काय झाले? किंवा काय केले ? यासाठीच फोन असणार याची त्याला कल्पना होती …!!!!
त्याच्या डोळ्यासमोर चरकाची दोन चाके स्पष्ट दिसत होती, एक आई अन दुसरी जयंती, मध्ये पिळून निघणारा ऊस त्याला त्याचे अस्तित्व भासत होता, या सर्व प्रक्रियेत त्याचा पालापाचोळा होणे त्याला अटळ वाटत होते !
एका पारंपरिक प्रथेत त्याचा बळी जाणार हे शाश्वत होते !
समोर वृद्धाश्रमाची पाटी दिसली ! अविचे अंग थरारले ! आईच्या पदरातून बाहेर पडण्याची कला त्याला अवगत नव्हती, त्याने गाडीची गती वाढवली, अगदी पाटी आईला अस्पष्ट दिसेल एवढी !

वृद्धाश्रम मागे पडले ! पण पुढे जायचे कुठे ??
अगदी थोड्या अंतरावर मंदिराजवळ गर्दी दिसली, समोर लावलेल्या बॅनर वरून नव्याने निर्माण झालेल्या साईबाबांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होती असा संबोध होत होता, गाडी तिकडे आपोआप वळली !
आईच्या चेहऱ्यावर आंनद दिसला, तो पाहून अविच्या मनालाही आनंद झाला !
आई कार्यक्रमात व्यग्र झाली, आईला वृद्धाश्रमात न सोडण्याचा निर्णय त्याच्या संवेदनशील मनाने घेतला होता ! काहीही किंमत मोजावी लागली तरी चालेल पण शेवटच्या श्वासापर्यंत आई माझे अस्तित्व बनून राहील ! असा ठाम निर्णय त्याने घेतला होता !!
आपण आईला कोणत्या कारणाने आणले हे आईला कळले नाही याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
कार्यक्रम संपला ! आतापर्यत जयंतीचे जवळपास तीस कॉल त्याने ‘मिस’ केले होते, ‘आईला सोडा, लवकर या ! याशिवाय ती काय बोलणार ?’ म्हणून त्याने तिचे कॉल रिसिव्ह केले नव्हते !
आई अगदी तृप्त मनाने अन आनंदी चेहऱ्याने देवळाच्या पायऱ्या उतरतांना दिसली, अवि लगबगीने तिच्या जवळ गेला, दर्शन घेतले, तिच्या हातातील प्रसादाची वाटी घेऊन गाडीपर्यंत येऊन आईला गाडीत बसवले.
एक नवी ऊर्जा नवा जोश संचारल्यागत तो वेगाने गाडी घराच्या दिशेने पळवत होता !
गाडी दारात येऊन थांबली ! जयंती पळत आली अन गाडीतून उतरण्याच्या तयारीत असलेल्या आईला अक्षरशः ओढत तिच्या गळा पडून रडत होती ! रडत रडत फोन का उचलत नाही म्हणून अविला भांडत होती !

अविसाठी हे चमत्कारापेक्षा तीळभर सुद्धा कमी नव्हते !!
सहा वाजले तरी मनू शाळेतून आली नाही म्हणून जयंती चिंतीत पण होती !अविने व्हॅनच्या चालकाला फोन लावला, त्याने सांगितले की मनू ला घरासमोर सोडले !!
आता अवीची अन जयंतीची चिंता खरोखरच वाढली !
आईने दोघांना मागे येण्याचा इशारा केला अन पुढे चालत जवळच असलेल्या गेल्या वीस वर्षांपासून दररोज न चुकता हरिपाठ साठी जाणाऱ्या मंदिरात घेऊन गेली ! अवि अन जयंती पहिल्यांदाच मंदिराच्या आवारात प्रवेश करीत होते !
हरिपाठ, आरती आटोपली होती, मनू सर्व आजींना आपल्या खाऊसाठी दिलेल्या पैशातून प्रसाद म्हणून ‘खडीसाखर’ वाटत होती !!
आजीला बाहेर पाहून ती पळत येत तिला बिलगली, “आजी आज आपला प्रसादाचा वार होता ना, तू नव्हती म्हणून मी आले ! माझं काही चुकलं का ?” मनू
“माझा वाघाचं काही चुकतं का ??” दप्तरासगट तिला उचलून घेत आई बोलली !
तिच्या बालमनावर झालेले पवित्र संस्कार! अन आपल्या मनावर राग,लोभ,मद, मत्सर,अहंकार अन पैशाच्या मस्तीने केलेले व्यभिचार याच्या तुलनेत अवि अन जयंतीची मने खजील झाली होती !!
तात्पर्य: संस्कार सर्वश्रेष्ठ आहेत.🙏🏻

सोमवार, १६ जानेवारी, २०२३

मराठी: आयुष्य: चांगण: कर्म आणि पाप: कलेक्शन: सुरेंद्र पाथरकर


              बोध कथा
        कर्म आणि पाप
----------------------------------------
      रोज एक भिकारी दारात जाऊन भिक्षा मागायचा आणि घरमालक बाहेर आल्यावर शिवीगाळ करून शिव्या द्यायचा, मर, तू काम का करत नाहीस. आयुष्यभर भीक मागत रहा, कधी कधी तो रागाच्या भरात त्याला ढकलूनही द्यायचा, पण भिकारी फक्त म्हणायचा, देव तुमच्या पापांची क्षमा करो.

एके दिवशी सेठला खूप राग आला, बहुदा धंद्यात तोटा झाला असावा, तो भिकारी त्याच वेळी भीक मागायला आला, सेठ ने रागात, थेट त्याच्यावर दगडच मारला, भिकाऱ्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले, तरीही तो देव तुझी पापे माफ करो, असे म्हणत तिथुन निघून गेला.शेठ रागातून थोडासा शांत झाला, विचार करू लागला की मी त्यालाही दगड मारला.पण त्याने फक्त प्रार्थना केली, यामागचं रहस्य काय आहे, हे आपल्याला कळायला हवं आणि तो त्या भिकाऱ्याच्या मागे लागला.
भिकारी कुठेही गेला तरी सेठ त्याच्या मागे लागला, त्या भिकाऱ्याला कोणी भिक्षा दिली तर कोणीतरी त्याला मारायचे, अपमानित करायचे, शिवीगाळ करायचे, पण भिकारी एवढाच म्हणाला, देव तुमची पापे माफ करो, आता अंधार पडू लागला होता, तो भिकारी परत गेला. त्याचे घर. परत येत होता, शेठ सुद्धा त्याच्या मागे होता, तो भिकारी आपल्या घरी परतला, एका तुटलेल्या खाटावर एक म्हातारी झोपली होती, जी एका भिकाऱ्याची बायको होती, तिच्या नवऱ्याला पाहताच ती उठली आणि पाहू लागली. भिकेच्या भांड्यात, त्या भिकेच्या भांड्यात फक्त अर्धी शिळी भाकरी होती ती पाहताच म्हातारी म्हणाली, एवढंच आहे आणि बाकी काही नाही. आणि तुमचे डोके कुठे फुटले?भिकारी म्हणाला, हो, एवढंच, कुणी काही दिलं नाही, सगळ्यांनी शिव्या दिल्या, दगडफेक केली, त्यामुळेच माझं डोकं फुटलं, तो भिकारी पुन्हा म्हणाला, हे सगळं माझ्याच पापाचं फळ आहे, आठवत नाही का, आपण किती श्रीमंत होतो. काही वर्षांपूर्वी आमच्याकडे काय नव्हते आपल्याकडे सर्व होते, पण आम्ही कधीच दान केले नाही.तो आंधळा भिकारी आठवला का, म्हातारी बाईच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती हो म्हणाली. आम्ही त्या आंधळ्या भिकाऱ्याची कशी चेष्टा करायचो, भाकरीच्या जागी कोरे कागद कसे टाकायचो, त्याचा अपमान कसा करायचो. त्याला मारायचे किंवा कधी ढकलायचे, आता म्हातारी म्हणाली, मला आठवते सगळं कसं मी सुद्धा त्याने रस्ता दाखवला नाही आणि, जेव्हा कधी मी तिथे भाकरी मागायचो तेव्हा फक्त शिव्या दिल्या, एकदा वाटी फेकून दिली, आणि तो आंधळा भिकारी नेहमी म्हणायचा, देवा तुझ्या पापांचा हिशोब घेईन मी नाही, आज त्या भिकाऱ्याचा शाप आणि आम्हांला दु:ख झाले बुडालो,तेव्हा तो भिकारी म्हणाला, पण मी कोणाला शाप देत नाही, माझ्यावर कोणताही त्रास झाला तरी, माझ्या ओठांवर नेहमीच आशीर्वाद असतो, असे वाईट दिवस मला दुसऱ्या कोणाला पाहू नयेत, माझ्यावर अन्याय करणाऱ्यांना मी प्रार्थना करतो. प्रत्येकासाठी, कारण त्यांना माहित नाही की ते कोणते पाप करत आहेत.आपण भोगले तसे दु:ख दुस-या कुणालाही भोगावे लागू नये, म्हणूनच माझी स्वतःची अवस्था पाहून मनातून फक्त आशीर्वाद निघतात सेठ गुपचूप सर्व ऐकत होता, आता त्याला सर्व काही समजले, म्हातारी बाई अर्धी रोटी एकत्र खाल्ली, आणि परमेश्वराचा महिमा म्हणत झोपी गेली.

दुसऱ्या दिवशी तो भिकारी इथे सेठला भीक मागायला गेला, सेठने भाकरी आधीच बाहेर ठेवली होती, त्याने ती भिकाऱ्याला दिली आणि हसतमुख आवाजात म्हणाला, माफ करा बाबा, चूक झाली, तो भिकारी म्हणाला, देव तुमचे भले करो. आणि तो निघून गेला,

  बोध

सेठला एक गोष्ट समजली होती, माणसं फक्त आशीर्वाद देतात,शाप देतात पण देव हे सगळं माणसाच्या कर्मानुसार करतो
शक्य असल्यास, फक्त चांगले करा, जर तो परमेश्वर दिसत नसेल तर काय झाल.
त्याच्याकडे सर्वांचे खाते पक्के असते.

शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

मराठी: बापाने मुलाला लिहिलेले पत्र !

प्रत्येक बापानं वयात येणा-या प्रत्येक मुलाला आवर्जुन लिहाव अस पत्र.

नक्की वाचा आणि पटलं तर आपल्या वयात येणाऱ्या मुलांनाही वाचायला द्या. फक्त एकदा नाही तर पुन्हा पुन्हा वाचा आणि पुन्हा पुन्हा वाचायला सांगा....
पुन्हा पुन्हा एवढ्यासाठी कि ज्यावेळी जसा मूड असेल तसा प्रत्येक वेळी वेगळा अर्थ समजून येईल.

"माझ्या लाडक्या मुला. मी हे असं तुला पत्र लिहितोय बघ, वाच, आणि ठरव....

जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील-बिघडतील सांगता येत नाही. सगळंच अर्त्यक्य आपण अमुक इतके दिवस जगू हे कुणी सांगू नाही शकत. त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोललेल्या बऱ्या.

मी बाप आहे तुझा, मी तुला जे सांगेन ते इतर कुणी कदाचित कधीच नाही सांगणार.

मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट, जिवाचे चटके आणि मनाचा त्रास बराच कमी होईल, म्हणून काही गोष्टी तुला सांगतोय.

माणसांविषयी मनात आकस ठेवू नको, कुणाचा द्वेष करू नकोस. तुझ्याशी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी इतर लोकांवर काही आपण सक्ती नाही करू शकत. त्यामुळे ते असंच का वागतात असं म्हणून तणतणू नको. तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या आईचीच आहे. जेंव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात, त्यांच्याशी तु चांगलं वाग. पण हे कायम लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या हेतूपोटी करतो. त्यामुळे जी माणसं गोड बोलतात, तुझ्याशी कायम चांगलीच वागतात त्यांना तू खरंच आवडतो असं काही नसेलही. जरा माणसं तपासून बघ, पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची घाई करू नकोस.

जगणं कशानेच कुणामुळेच थांबत नाही. त्यामुळे माणसं तुला सोडून जातील. नाकारतील, झिडकारतील किंवा ज्यांच्यावर तू जीव तोडून प्रेम केलंस तेच तुझ्या आयुष्यातून निघून जातील. तेव्हा हेच कायम लक्षात ठेव की, कुठल्याही माणसामुळे आपलं जगणं थांबत नाही. कधीच नाही.

आयुष्य फार छोटं आहे आणि तीच तुझी खरी पुंजी आहे. त्यामुळे आज वाया घालवलास तर उद्या कदाचित जगणंच तुला सोडून जाईल. त्यापेक्षा आज मनापासून, भरभरून जग. आनंदी राहा.

प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे. ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणेही बदलते. ज्यांच्यावर तू जिवापाड प्रेम करतोस तेच समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धर. काळाच्या मलमानं या जखमाही भरून निघतील. प्रेमात पडलास म्हणजे तेच सगळ्यात सुंदर आणि अतीव चांगलं असं समजू नकोस आणि प्रेमभंग झाला म्हणून त्या दु:खालाही जास्त कवटाळून बसू नकोस.

अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं, तरी ते यशस्वी झाले अशा कहाण्या तू वाचल्या असशीलच ! पण याचा अर्थ असा नाही की, एक शिक्षण सोडलं की तूही यशस्वी होशील. नॉलेज, ज्ञान हे एक शस्त्र आहे हे लक्षात ठेव. शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे खरंय, पण कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करायला लागतेच ना.

माझी अपेक्षाच नाही की मी म्हातारा झाल्यावर तू मला सांभाळावंसं. मीही तुला जन्मभर पोसणार नाहीच. तू स्वत:च्या पायावर उभा राहू शकशील तोर्पयत तुला सपोर्ट करणं ही माझी जबाबदारी. त्यानंतर तुला बसमधून फिरायचं की लिमोझीनमधून, गरीबच राहायचं की श्रीमंत व्हायचं हा निर्णय तुझा तू घ्यायचा.

आणखी एक, मीही अनेकदा लॉटरीचं तिकीट काढलं, ते कधीच लागलं नाही. एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही. श्रीमंत व्हायचं तर मेहनत करावीच लागते. जगात फुकट कधीच काहीच मिळत नाही.
बाळा कदाचीत तुला हे पाठविलेले पत्र आवडेल कि नाही हे माहीत नाही पण हे पत्र तुझ्या आयुष्याची शिदोरी नक्की बनेल हे मात्र पक्क. म्हणुन बाळा हे पत्र तुला आवडो वा ना आवडो लगेच फेकुन देऊ नकोस या पत्राला तु नेहमी तुझ्या सोबत ठेव व वेळ मिळेल तेंव्हा पुन्हा पुन्हा वाच.....

फक्त तुझेच वडील
 

मराठी: कथा एक किती रुपये. लेखक: सुरेंद्र पाथरकर

Surendra Patharkar लिखित कथा "एक कोटी रुपये" मातृभारती वर विनामूल्य वाचा
https://www.matrubharti.com/book/19925029/ak-koti-rupaye 

मराठी:श्रीमंती कशाला म्हणतात: अप्रतिम आवडलेली गोष्ट !

https://renukaaai.blogspot.com/2021/09/blog-post_27.html

मराठी: एक राधा हवीच ना ! अजरामर कविता cp

https://renukaaai.blogspot.com/2021/09/cp.html

मराठी: खरी नाती

https://renukaaai.blogspot.com/2022/01/blog-post_85.html

मराठी: जीवन भाव !

https://renukaaai.blogspot.com/2022/03/blog-post_28.html

मराठी:इथुनपुढे ज्याचं आरोग्य उत्तम,तोचं खरा श्रीमंत...

https://renukaaai.blogspot.com/2022/09/blog-post_38.html

मराठी: मृत्यू

https://renukaaai.blogspot.com/2022/09/blog-post_17.html

मराठी: आम्ही निपुत्रिकच बरे

https://renukaaai.blogspot.com/2022/09/blog-post_18.html

मराठी: ई साहित्य प्रतिष्ठानची प्रगती

https://renukaaai.blogspot.com/2022/09/blog-post_22.html

मराठी: बरोबर बोललास: वell Said

https://renukaaai.blogspot.com/2022/09/well-said.html

मराठी; चुकली सारी गणिते

https://renukaaai.blogspot.com/2022/10/blog-post.html

मराठी: तिलांजली

https://renukaaai.blogspot.com/2022/12/blog-post.html

मराठी: ह्याला आयुष्य म्हणावे का?

https://renukaaai.blogspot.com/2022/12/blog-post_2.html

मराठी कथा: रेशीम गाठी. लेखक: सुरेन्द्र पाथरकर

https://renukaaai.blogspot.com/2021/11/blog-post_27.html

मराठी कथा : अपहरण. लेखक: सुरेंद्र पाथरकर

https://docs.google.com/document/d/1XoXLiR5HMdakobClSBYWu72SmN2BX9Jr/edit?usp=drivesdk&ouid=117005573785910821462&rtpof=true&sd=true

मराठी कथा : माझे ते माझे तुझे ते पण माझे . लेखक: सुरेन्द्र पाथरकर

https://docs.google.com/document/d/1XoXLiR5HMdakobClSBYWu72SmN2BX9Jr/edit?usp=drivesdk&ouid=117005573785910821462&rtpof=true&sd=true

मराठी कथा: मर्सी डेथ.Mercy Death लेखक: सुरेंद्र पाथरकर

https://docs.google.com/document/d/1Oo-45uQEaifUwXCTbDIu5RoVT5XJ9Hcw/edit?usp=drivesdk&ouid=117005573785910821462&rtpof=true&sd=true

मंगळवार, १० जानेवारी, २०२३

मराठी: म्हातारपणी अजून काय पाहिजे? आयुष्य:दीपक. What more needs in old age? Collection: Surendra Patharkar.

*बाप लेकाचा अनोखा खटला !!*

आपल्या मुलाबद्दल तक्रार करता यावी म्हणून एक वृद्ध माणूस न्यायालयात दाखल झाला. 
न्यायाधीशांनी विचारले की तुमची काय तक्रार आहे.
वृद्ध वडील म्हणाले, मला माझ्या मुलाकडून त्याच्या परिस्थितीनुसार महिन्याचा खर्च हवा आहे.
न्यायाधीश म्हणाले की, हा तुमचा अधिकार आहे. यामध्ये सुनावणीची गरज नाही. तुमचा सांभाळ तुमच्या मुलाने केलाच पाहिजे. ते त्यांचं कर्तव्यच आहे.
वडील म्हणाले की मी खूप श्रीमंत आहे. माझ्याकडे पैशांची कमतरता नाही. पण तरीही मला माझ्या मुलाकडून दर महिन्याचा खर्च घ्यायचा आहे.
न्यायाधीश आश्चर्यचकित झाले,ते त्या वृद्ध वडीलांना म्हणाले "जर तुम्ही इतके श्रीमंत आहात तर तुम्हाला तुमच्या मुलाच्या पैशांची काय गरज आहे ?"
यावर त्या वृद्ध वडीलांनी आपल्या मुलाचे नाव आणि पत्ता सांगितला. वडील न्यायाधीशांना म्हणाले, माझ्या मुलाला कोर्टात बोलावलं तर तुम्हाला सगळं नीट कळेल.
न्यायाधीश त्या मुलाला कोर्टात बोलावून घेतात आणि सांगतात की, तुमच्या वडीलांना दर महिन्याला तुमच्याकडून खर्च हवा आहे,मग तो कितीही असो, तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला तो द्यावा लागेल.
न्यायाधीशांचं बोलणे ऐकून मुलगा गोंधळून जातो आणि म्हणतो, माझे वडील तर खूप श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे पैशांची कमतरता नाही मग त्यांना माझ्या पैशांची काय गरज आहे ?
न्यायाधीश म्हणतात, ही तुमच्या वडीलांची मागणी आहे आणि त्यांचा हक्क पण आहे.
मग वडील म्हणतात, न्यायाधीश महोदय, तुम्ही माझ्या मुलाला सांगा की, त्याने मला दरमहा फक्त १०० रुपये द्यावे, परंतु अट अशी आहे की त्याने स्वतःच्या हाताने मला पैसे आणून द्यावेत आणि ते पैसे देण्यास कोणताही विलंब होता कामा नये.
न्यायाधीश म्हणतात, ठीक आहे, तुमच्या मनासारखं होईल. मग न्यायाधीश त्या मुलाला सांगतात की, तुम्ही दर महिन्याला १०० रुपये तुमच्या वडिलांना विलंब न करता हातात आणून देत जावे आणि हा कोर्टाचा आदेश आहे, त्याचे तुम्ही पालन कराल ही अपेक्षा !
खटला संपल्यावर न्यायाधीश त्या वृद्ध वडिलांना आपल्याकडे बोलवतात. तुमची काही हरकत नसेल तर मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. तुम्ही इतके श्रीमंत असताना तुमच्या मुलावर हा खटला का दाखल केला आणि मुलाकडून फारच तुटपुंजी किंमत का मागितली ? असे का ??
आता मात्र त्या वृद्ध वडीलांचे डोळे पाणावले. न्यायाधीश साहेब,मला माझ्या मुलाचा चेहरा पाहण्याची खूप इच्छा होती, तो त्याच्या कामात इतका व्यस्त आहे की, मला त्याला भेटून बरेच दिवस झाले आणि समोर बसून तर सोडाच पण मोबाईलवर ही कधी आम्ही बोललो मला खरच् काही आठवत नाही. 
माझे माझ्या मुलावर खूप प्रेम आहे.म्हणूनच मी त्याच्यावर हा खटला दाखल केला, जेणेकरुन दर महिन्याला तो माझ्यासमोर येईल, त्याला पाहून माझ्या मनाला आनंद होईल.
वृद्ध वडीलांचे म्हणणे ऐकून न्यायाधीशांच्या डोळ्यात अश्रू आले. न्यायाधीश म्हणाले, तुम्ही जर हे मला आधी सांगितले असते तर वडीलांना दुर्लक्षित केल्याचा आणि सांभाळ न केल्याच्या गुन्ह्याची शिक्षा मी तुमच्या मुलाला सुनावली असती.
यावर ते वृद्ध वडील हसतमुखाने न्यायाधीशांकडे बघतात आणि म्हणतात, माझ्या मुलाला शिक्षा झाली आणि ते ही माझ्यामुळे या सारखे वाईट काय ! कारण माझा त्याच्यावर खूप जीव आहे आणि माझ्यामुळे त्याला शिक्षा किंवा त्रास झालेलं मला कधीच सहन होणार नाही.
हे सर्व तो मुलगा लांबून ऐकत असतो. आता मात्र त्याच्याही डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटतो. तो धावत येतो आणि वडीलांना मिठी मारतो. बस्स ! अजून काय हवं असतं म्हातारपणी आईवडीलांना....
*मित्रांनो हजारो माणसं भेटतील आयुष्याच्या प्रवासात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आईवडील पुन्हा मिळणार नाहीत... हो ना !!!*

शनिवार, ७ जानेवारी, २०२३

मराठी: वयाची सत्तरी पार करतांना! Applicable thoughts while crossing age 70. Unknown. Surendra Patharkar

*वयाची सत्तरी पार करतांना !!* (पोस्ट माझी नाही आवडली म्हणून  पाठवली)

            *एकदा एका पासष्टी👨ओलांडलेल्या आणि सत्तरीच्या 👨‍🦳 वाटेवर असणाऱ्या मित्राला त्याच्या मित्राने विचारले, "मित्रा, तुझ्यात काय बदललंय असे तुला वाटतंय?" त्यानंतर त्या मित्राने जे उत्तर दिले ते आपल्यातील प्रत्येकाने समजून घेतलं तर प्रत्येकांसाठी आपले आयुष्य सुसह्य होईल हे निश्चित! त्याने जे उत्तर दिले ते असे...*

*१. आजवर मी माझ्या आईवडिलांवर, भावंडांवर, मुलांवर, बायकोवर, सहकार्यावर, शेजाऱ्यापाजाऱ्यांवर, मित्रांवर खूप प्रेम केले, त्यांची खूप काळजी घेतली. पण आता मी स्वतःवर प्रेम करायला लागलोय, आता मी स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केलीय.*👨

*२.मला याची जाणीव झालीय की, आता मी शारिरीक किंवा मानसिकदृष्ट्या इतका सक्षम राहिलो नाही की कुणीही यावं आणि त्यांनी आपले ओझे माझ्या खांद्यावर टाकावे.*👨‍🦰

*३.आता मी भाजीवाल्याशी, फळविक्रेत्याशी, फेरीवाल्याशी घासाघीस करायचं सोडून दिलंय. उलट आता मला असं वाटतं की माझ्या काही पैश्याने त्यांच्या मुलांचे शिक्षण होणार असेल किंवा त्याची गरीबी दूर होणार असेल तर चांगलेच होईल ना!* 👨

*४.आता मी माझ्या जीवन संघर्षाच्या कहाण्या इतरांना सांगण्याचं आणि सल्ले देण्याचं बंद केलंय. कारण एकतर त्या सगळ्यांना सांगून झाल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या आता कदाचित कालबाह्य झाल्या आहेत. माझ्या त्या संदर्भांचा आजच्या पिढीला किती उपयोग होईल हे माझे मलाच माहीत नाही.*👨‍🦰

*५.आता मी कुणाला त्याच्या चुका सांगण्याच्या किंवा काय बरोबर आणि काय चुकीचे हे सांगण्याच्या भानगडीत पडत नाही.‌ कारण सगळ्यांना सुधारण्याची जबाबदारी माझी एकट्याची नाही हे मला कळून चुकलंय. आता मला इतरांच्या परफेक्शनपेक्षा माझी शांतता अधिक महत्वाची वाटते.*👨

*६.आता मी समोरच्याच्या चांगल्या गोष्टीसाठी त्याला निखळ दाद द्यायला आणि त्याचे कौतुक करायला शिकलोय. त्याने समोरच्याला बरे वाटते, तो सुखावून जातो.*👨‍🦰

*७.आता माझ्या अंगावरच्या कपड्यांची घडी चुरगाळलेली असेल किंवा शर्टावर एखादा डाग पडला असेल तर त्याचा मला खूप फरक पडत नाही. जे लोक मला अंतर्बाह्य ओळखतात त्यांच्यासाठी माझा पेहराव फार महत्वाचा नाही हे मला कळून चुकलंय.*👨

*८.ज्यांना माझी किंमत नाही अशांना मी आता दुर्लक्ष करतो. कारण त्यांना माहित नसली तरी मला माझी किंमत चांगली माहिती आहे.*👨‍🦰

*९.आता माझं वय कुरघोड्या करण्याचं राहिलेलं नाही.*👨

*१०.आता मला माझ्या भावना व्यक्त करायची लाज वाटत नाही. भावना असणं हे जिवंतपणाचे लक्षण आहे. आता हसावंसं वाटलं की हसून घ्यायचं आणि रडावंसं वाटलं की रडून घ्यायचं. भावना लपवण्याच्या नादात उगाच घुसमटत रहायचं नाही.*👨‍🦰

*११.आपला अहंकार आपल्या नात्याच्या आड येणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतो. प्रसंगी मला थोडा कमीपणा घ्यायला लागला तरी मी एकवेळ तडजोड करतो, पण स्वतःचा स्वाभिमान सांभाळून! कारण नाते टिकवण्याची जबाबदारी कुणा एकाची असूच शकत नाही.*👨

*१२. आता मी येणारा प्रत्येक क्षण सर्वार्थाने जगण्याचा प्रयत्न‌ करतो. मला जे करावसं वाटत ते मी करतो. फक्त एवढंच की, माझ्या स्वछंदी जगण्याचा इतरांना त्रास होणार नाही याची मी काळजी घेतो.* 👨‍🦰

*१३. मला माहित आहे की, जे मी आजवर जगलोय त्यापेक्षा आता माझ्याकडे वेळ फार कमी आहे. त्यामुळे आज मी ना भूतकाळात जाऊन पश्चात्ताप करत बसत, ना भविष्यकाळात जाऊन चिंता करत बसत... आता निख्खळ आणि निख्खळ जीवनाचा आनंद घ्यायचा आणि जेवढा इतरांना देता येईल तितका द्यायचा...!!*👨

*आता माझं उर्वरित आयुष्य पैसे मिळवण्यासाठी नसून परोपकारासाठी असल्याची भावना मनात निर्माण झाली आहे.*👨

             *आता लक्षात आले आहे की, संकटात असलेल्या व्यक्तीला मदत नाही केली तर तो तक्रार न करता देवासमोर जावून रडतो. त्याचा तळमळलेल्या आत्म्याचा आवाज कानात ऐकू येत असलेली भावनाही मनात येते.*👨‍🦰

*खरंच, वर दिलेल्या एका मित्राच्या उत्तरातून आपण काही समजून घेतलं तर आपल्यातील प्रत्येकाला किती छान जीवन जगता येईल ना?*

*आत्ता  कळले जीवन सुंदर आहे. पण ते सरळमार्गाने जगणाऱ्या व्यक्तीचे आहे.*

*खूप खूप शुभेच्छा सत्तरीच्या.वाटेवर असणाऱ्या मित्रांना !!*

     🙏

गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

मराठी: जीवन एक रेस. Life is like Houese Race. Writer: Unknown Collection: Surendra Patharkar

तुम्हाला काय आहे... मुलगी-मुलगा? की रेसचा घोडा?

एक तरुण interview रूम मध्ये बसला होता. समोर तीन
professionals चष्मा आणि tie लावून बसले होते.
Executive engineer ने तरुणाकडे पाहून विचारले, " 
tell me , जिथे खूप पाउस पडतो, तिथे जास्त प्रमाणात काय निर्माण
होतं?"

तरुणाने उत्तर दिलं- "छत्र्या!"
दुसर्या tie वाल्या लठ्ठ CEO ने विचारलं- " यावर्षी पद्मश्री कोणाला मिळाली?"
तरुणाने उत्तर दिलं- " मला... कारण माझं नुकतंच लग्न झालं
असून बायकोच नाव आहे पद्मश्री !!"
तिसरा Regional manager वैतागून म्हणाला-" काही डोक
आहे का तुला?"
तरुणाने शांतपणे उत्तर दिलं-" हो, खूप डोक आहे. शाळेत
भरती झाल्यापासून ह्या interview पर्यंत सगळे जण तेच खात
आहेत."
Executive engineer ने विचारलं, " तुझ्या bio - data मध्ये M A ,
B F D डिग्री लिहिली आहे, काय आहे ही पदवी?"
तरुणाने पुन्हा शांतपणे उत्तर दिलं-" Matric appeared but
failed thrice "
त्यावर CEO ने चिडून फाइल आपटली आणि ओरडला-" फार
मोठा गाढव आहेस तू !!"
तरुण तितक्याच शांतपणे म्हणाला- "साहेब, मोठे तर तुम्ही आहात, मी तर फार लहान आहे"
एक पिढी शिक्षण घेवून गाढव
बनली आणि आता नवी पिढी शिक्षण
घेताना रेसचा घोडा बनत आहे.
परीक्षेत १००% पाहिजेत, कराटे क्लासमध्ये black बेल्ट
मिळवायचा आहे. त्यानंतर dance क्लास attend करायचा.
भगवतगीता स्पर्धेत जायचं आहे. श्लोकांचा अर्थ
कळला नाही तरी ते तोंडपाठ करायचेच. कारण first prize
मिळालंच पाहिजे !! मग drawing competition असते. तिथून
बाहेर निघाला की चालला तबला वाजवायला...संगीत विशारद बनायला.
Albert Einstein बनवून देणाऱ्या Multi -national school आल्या.
पण Albert हा Einstein बनण्यासाठी शाळेत गेला नव्हता. एक
अमिताभ बनला तर हजारो acting school उभ्या राहिल्या.
पण अमिताभ अभिनेता बनण्यासाठी कोणत्याही school
मध्ये गेला नव्हता. आता लवकरच मोदी तयार
करणाऱ्या शाळा उभ्या राहतील. आणि पालक लाखो रुपये
फी भरून त्यात मुलांना पाठवतील. आज
मुलाच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च एका वर्षाला होतो,
तितके रुपये त्याच्या पालकांना संपूर्ण शिक्षण
घेण्यासाठी सुध्दा लागले नाहीत.
आता शाळा सुरु केल्या आहेत investors नी.
मागणी तसा पुरवठा ह्या तत्वावर.
पालकांना आपल्या मुला-मुलीला रेसचा घोडा बनवायचं आहे
ही मागणी पाहून जास्तीत जास्त अभ्यास
मुलांच्या डोक्यात कोंबायला सुरुवात केली. दप्तराचं
आणि पालक-शिक्षकांचं अपेक्षांचं ओझं वाहणारी मुले म्हणजे
चालती बोलती प्रेते बनत चालली आहेत. जरा शुद्धीवर
आली की " what is square of 12 ? " असं विचारून त्यांचं बालपण चिरडून टाकतात.

श्री मोदी ह्यांनी मुलांना एक प्रश्न विचारला होता-"
तुमच्यापैकी किती जण घाम गळेपर्यंत खेळतात?"
तेव्हा एकाही मुलाने हात वर केला नाही. कारण आता मुले AC मध्ये जन्म घेतात, AC मध्ये वाढतात. चिप्स खातात, soft ड्रिंक पितात आणि mobile वर game खेळत बसतात. उन,
पाऊस, वारा ह्याच्याशी संबंध येत नाही. पडणं-लागणं,
खेळात हरणे माहीतच नाही. school bus आली नाही तर
शाळेपर्यंत चालत जाण्याची ताकद मुलांमध्ये नाही. वय वर्ष
६ पार होत नाही तर डोळ्याला चष्मा लागतो. हात
पायांच्या एकतर काड्या होतात नाहीतर लठ्ठपणा वाढतो.
कारण शारीरिक कष्ट संपले आणि Modified food starch,
maltodextrin, hydrolyzed corn gluten, disodium inosinate/
guanylate, yeast extrac, hydrolyzed soy protein मिसळलेले पदार्थ खाणे सुरु झाले. ह्या ingredients ची खासियत म्हणजे
ते मुलांच्या पोटात शिरून जास्त काळ टिकतात आणि पोटातील पोषके शोषून घेतात. मुलांची hormonal
आणि जैविक वाढ रोखतात. ज्यामुळे मुले दुबळी होत जातात.
हे घटक पिझ्झा-बर्गर मध्ये असतात. म्हणून भारत लवकरच
diabetes चे सर्वाधिक रुग्ण असलेला देश बनणार आहे. सोबत
इतरही विकार येत आहेत.
शेंगदाणे, चणे, रवा, तांदूळ, बाजरी, सुका मेवा आणि फळे ह्यात
घातक ingredients नसतात. लापशी, सातू, शिरा, पोहे
किंवा अंड्याचे घरी बनवलेले पदार्थ मुलांना उत्तम पोषण
पुरवतात. ते मिळत नसल्यामुळे मुलांची शारीरिक वाढ नीट
होत नाही. प्रतिकार क्षमता संपते. मग vitamins , DHA ,
minerals देणारे product विकत आणून ते खायला देतात.
वास्तविक, शरीर हा जगातील सर्वात
मोठा कारखाना आहे. ह्याच शरीराला योग्य आहार, कष्ट मिळाले तर कुठेही तयार न होऊ शकणारं रक्त तयार होतं. साध्या भाज्या, अस्सल भारतीय जेवण मिळालं की शरीराची यंत्रणा स्वत काम करते. म्हणून
ताज्या भाज्या, भाकरी खाणारी आणि मिनरल्स, calcium , proteins माहित नसलेली माणसे १०० वर्षे
जगली आणि हे माहित झालेली माणसे फक्त ६० वर्षे जगतात… तेही अनेक रोग सोसत, औषधे घेवून !!
खेळ, व्यायाम, भटकंती आणि दर्जेदार वाचन न केल्यामुळे मुलांना मानसिक कमतरता जाणवते. संघर्ष माहित
नसतो आणि team work कळत नाही. मित्र फक्त whats app ,
face बुक वर भेटतात. प्रत्यक्ष भेट नाही. सुख- दुखाची देवाणघेवाण नाही आणि मित्राचा-मैत्रिणीचा मानसिक आधार नाही. दिलखुलास हसणे
आणि ओक्साबोक्शी रडणे मानसिक आरोग्यासाठी चांगले असते. ह्या दोन्ही क्रिया मुलांना करता येत नाहीत. आपोआपच, जरा मनाविरुद्ध घडलं की लहान मुले-मुली आत्महत्या करतात. बरीच एकुलती एक मुले, ज्या मुलांना बहिण नसते, चांगली मैत्रीण नसते त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन संकुचित बनतो.
ह्या उणीवांचा शिक्षणात विचार केलेलाच नाही.
भारतीय शिक्षण पद्धत सर्वांगीण नाही हे शिक्षण तज्ञ सांगत होते तोवर शिक्षणाचा धंदा सुरु झाला. मोठे
उद्योजग, पुढार्यांनी शाळांमधून गुंतवणूक करून शिक्षण संकल्पनेला धूळ चारली. एखादी स्त्री गरोदर राहिली तर जन्माला येणाऱ्या जीवाच्या admission ची तयारी सुरु होते. 

कृष्णाला जन्मण्याआधी मारायची तयारी मामाने केली होती. आता मुल
जन्माला येण्याआधी त्याला रेसचा घोडा बनवायची तयारी सुरु होते. आता मुलाने बोलायला सुरुवात केली की थेट E =Mc square म्हणायचं बाकी राहिलं आहे. अशी मुले सर्व formula पटापट म्हणून दाखवतील पण स्वताचा formula कधीही शोधू शकणार नाहीत. guitar शिकतील पण स्वताची संगीत रचना करू शकणार नाहीत.
लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर, मेरी कोम ह्यांचं अनुकरण अचूक करतील. पण स्वताची ओळख निर्माण करणार नाहीत. कारण त्यांना फक्त अनुकरण करायला शिकवलं जातं. जगायची कला, गीत-संगीतातील आनंद,
निसर्गासंपदेची भव्यता, नव्या संकल्पनांची निर्मिती, जुन्या विचारांचा आधार, साहित्य ह्याला बाजारू किंमत नसल्यामुळे फक्त जे विकलं जातं तेच ज्ञान मुलांना मिळतंय,
त्यात ते पारंगत होत आहेत. काही जणांना campus मध्ये दर
महिना ४ लाखांपेक्षा जास्त पगार
असणारी नोकरी मिळतेय....पण त्यात देशाचं नाही, भांडवलदारांच हित साधला जातंय. पुढची पिढी मोठी पदवी मिळवेल पण न स्वत
जगण्याचा आनंद लुटू शकतील, न
दुसर्याला जगण्याची मजा मिळू देतील... अगदी हाच धोका ओळखून जपानमध्ये शाळेत AC लावत
नाहीत. तिथे मुलांना घोकंपट्टी पेक्षा practical वर भर देतात. वृक्ष-वेली स्वताच अन्न स्वत तयार करतात
त्या प्रक्रियेला काय म्हणतात?...असे प्रश्न विद्यार्थ्यांना न विचारता शाळेत व बाहेर भाजी लावायला शिकवतात.
त्या रोपांची-वेलींची जोपासना करायला लावतात. 

"निप्पोन technology " ने केलेल्या तपासणीत म्हटलं आहे की शाळेच्या आवारातील वेलींमुळे तापमान चार अंश कमी झाल आहे. आणि मुले पाना-फुलांसोबत भावनिक नात जोडू लागली आहेत. जर्मनी मुलांना Transference शिक्षण देते. तिथे लहान मुलांची बोटे नाजूक असतात हे लक्षात घेवून दुसरी पर्यंत लेखन करू देत नाहीत. पाचवीपर्यंत practical चालतं आणि त्यानंतर विद्यार्थी बँक कर्मचारी बनेल की हवाई
सेविका, प्रशासन सांभाळेल की कुशल कामगार होईल ह्याची सतत तपासणी होते. दहावीनंतर फक्त त्याला आवडणाऱ्या क्षेत्रांच प्रशिक्षण देतात. सगळे एकदम science मध्ये भरत नाहीत. अनावश्यक विषय शिकवत नाहीत.
चीन हा cycle प्रेमी देश ४ वर्षाच्या मुलांना cycle चालवण्याच शिक्षण देतो. त्यानंतर theory कमी आणि प्रत्यक्ष कृती शिकवतात.
प्रत्येक विद्यार्थी उद्या देश चालवणार ह्याचा विचार Netherlands सारखा देशही करतो. एकाच विद्यार्थ्यावर
सगळ्या विषयांचा मारा करत नाहीत. चारी दिशांनी अनेक विषय आणि क्लासचा मारा सोसण्याच काम भारतीय विद्यार्थ्यांना करावे लागते.
शिक्षण काय असतं?
रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात पहा.
टागोरांची "शांतीनिकेतन" शाळा झाडांखाली भरत असे. पक्ष्यांची किलबिल ऐकू येई. एकदा टागोर
झाडाखाली बसले होते. चार विद्यार्थी त्यांच्या समोर पुस्तकात डोक खुपसून बसली होती. आणि उरलेली बरीच मुले
खेळत-बागडत होती. कोणी झाडावर चढला होता, कोणी फुलांचा सुगंध घेत फिरत होता. तेवड्यात एक पालक
तिथे आले. पाहतात तर काय...गुरुदेव शांतपणे बसले होते
आणि फक्त चार मुले पुस्तकात डोके खुपसून बसली होती व इतर मुले हसण्यात-नाचण्यात रमली होती. सुटा-बुटातील पालक महाशय टागोरांना म्हणाले- “या नाचणाऱ्या-बागडणऱ्या मुलांच्या भवितव्याची तुम्हाला चिंता वाटत नाही का?”
टागोर म्हणाले- “चिंता वाटते, पण नाचणाऱ्या-बागडणऱ्या मुलांची नाही तर पुस्तकात तोंड खुपसून बसलेल्या मुलांची. ही मुले खेळण्या बागडण्याच्या वयात मोठ्या माणसासारखी वागत आहेत. ही मुले लहान वयात प्रौढ झाली आहेत. प्रौढ तर मीसुद्धा अजून झालो नाही. खरं
तर मलाही झाडावर चढाव असं वाटतं. पक्ष्यांशी बोलावसं वाटत. भरपूर खेळावस वाटतं. पण माझ शरीर आता साथ देत नाही. “
टागोर जगण्यासाठी शिकवत होते.
आता शिकण्यासाठी जगावे लागते.
जास्त ज्ञान, जास्त कला घेवून मुले धावत असतात.
आणि पालक त्यांच्यावर पैसे लावतात !

मग एक रेस सुरु होते आणि जगायचं राहून जातं !!

C.P.