बुधवार, २१ डिसेंबर, २०२२

मराठी: नाते संबंध वर परखड विचार: powerful thought on today's human relationship by Deepak. Collection : सुरेंद्र पाथरकर.

घरे झाली सुबत्ता आली !
नाती मात्र फाटत गेली.. 😪
प्रेम, जिव्हाळा,माया, ममता
सारी सारी लुप्त झाली.😰

चार-चार बेडरूम्सची घरे झाली!
पण वडिल, आई वृद्धाश्रमी गेली..
आई-वडिलांचे कष्टं.. ऋणं..
सा..रे मुले विसरून गेली.. 😢

आजीआजोबांची नातवंडं
पाळणाघरातली children झाली
सोडायला आई, आणायला बाबा
घरच्या मायेला पारखी झाली..

प्रत्येकाची वेगळी खोली !
प्रत्येकाला 'space' झाली !
एवढ्या मोठ्ठया घरात फक्त
देवालाच जागा नाही उरली..

सारी 'extremely busy' झाली
विचारपूस करी ना कोणी..😷
रक्ताचीही नाती आता
WhatsApp मध्ये बंद झाली..!

Insta आणि Twitter वर
प्रत्येकाची accounts झाली !
घरातल्याच माणसांमधल्या
संवादांची होळी झाली..🤐

हॉटेलिंगची फॅशन आली !🍜
घरची जेवणे बंद झाली..
Modular च्या kitchen मध्ये
सगळी..बाहेरच जेवुन आली !😧

घरात पॉश गाडी आली ! 🚘
अंगावर पॉश साडी आली ! 
लाखालाखांची पॅकेजेस आली !
हीच सुखाची व्याख्या झाली!😥

Lifestyle 'क्लास' झाली 👠
माणुसकी मात्र खलास झाली..
खोल्यांची संख्या वाढत गेली
माणसे मात्र कुढत गेली..😓😓

मी, मला, माझे माझे 🤨😠
स्वार्थामुळे भाषा झाली..
Ego आणि freedom पायी
Divorce घ्यायची वेळ आली!🤭

Divorce होताच order सुटली
मुलाला आई कोर्टात भेटली.!😲
"आई हवी की बाबा हवे ?"☝
चिमुकल्यांची मनेच तुटली..👥

पैशामुळे नीती गेली..
नीतीमुळे मती गेली..👹
अहो पैशासाठी माणसाने
दुधातही भेसळ केली ..! 🙆😮

फेसबुक, गुगल, सगळे असून
का डिप्रेशन ची पाळी आली? 😤
प्रत्येकाला शुगर, बीपी .. 🤒
हार्ट चीही गोळी आली ! 💊

इंटरनेट ने क्रांती केली ! 💻
मोबाईल ने जादू केली ! 📱
स्वत:च्याच कोषामध्ये
माणसे आता मग्न झाली.. 🤔

माणसे जाऊन यंत्रे आली !🖥
यंत्रांची मग तंत्रे आली ! 🤕
यंत्रे-तंत्रे सांभाळताना
माणुसकीची फरफट झाली..

सुखं सांगायला कोणी नाही..😩
दु:ख ऐकायला कोणी नाही..😩
'Sharing' च्या या जमान्यात
माणसे मात्र यंत्रे झाली..😢
माणसे आता..यंत्रे झाली......😭

====================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा