*आधार कार्डधारक महिलांसाठी LIC ची खास पॉलिसी; मिळणार ‘हे’ फायदे*
आजच्या धकाधकीच्या आणि अनिश्चितेतच्या काळात सर्वांनाच विमा पॉलिसीची (Life Insurance) गरज आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी देखील (LIC) आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन विमा योजना आणत असते. सध्या एलआयसीने खास महिलांसाठी नवीन पॉलिसी आणली असून, आधारशीला प्लॅन (Aadhaar Shila Plan) असं या पॉलिसीचं नाव आहे. ज्यांच्याकडे यूआयडीएआयद्वारे (UIDAI) दिलेलं आधारकार्ड आहे त्यांच्यासाठी खास ही योजना आणण्यात आली आहे. ही खात्रीशीर परतावा देणारी योजना असून ती मार्केटशी जोडलेली नाही.
या योजनेत बोनससह काही खास फायदे देण्यात आले आहेत. विशिष्ट कालावधीमध्ये तुम्ही या विमा पॉलिसीचे वेळेवर हप्ते भरल्यास तुम्हाला बोनसचा लाभदेखील मिळणार आहे.
*या योजनेविषयी अधिक माहिती -*
1) विमा रक्कम : किमान- 75 हजार रुपये, कमाल- 3 लाख रुपये 2) पॉलिसीचा कालावधी : 10-20 वर्ष 3) हप्ते भरण्याचा कालावधी : तुम्ही निवडलेल्या वेळेपर्यंत 4) हप्ते भरण्याची सुविधा : मासिक, त्रैमासिक आणि सहामाही
*फायदे -*
*डेथ बेनिफिट -*
यामध्ये पॉलिसीधारकाचा पॉलिसी घेतल्यानंतर पाच वर्षाच्या आत मृत्यू झाल्यास वारसांना विम्याची निर्धारित रक्कम मिळते; पण पॉलिसीच्या 5 वर्षानंतर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास वारसाला मृत्यूनंतर मिळणारी निर्धारित रक्कम आणि लॉयल्टी अॅडीशन्सदेखील (काही असल्यास) मिळतात. मिळणाऱ्या रकमेत खालीलपैकी जे सार्वाधिक असेल ती रक्कम दिली जाते. वार्षिक हप्त्याच्या दहापट किंवा मूळ विमा रकमेच्या 110 टक्के अधिक रक्कम किंवा निर्धारित विम्याची रक्कम मृत्यूपर्यंत भरलेल्या हप्त्यांच्या 105 टक्क्यांपेक्षा कमी नसेल ती रक्कम वारसाला दिली जाते.
*मॅच्युरिटी लाभ -*
यामध्ये पॉलिसीधारकानं पॉलिसीचे सर्व हप्ते वेळेवर भरले, तर त्याला मॅच्युरिटीनंतर मिळणाऱ्या विमा रकमेसह लॉयल्टीचा लाभदेखील मिळतो.
*लॉयल्टी अॅडीशन -*
यामध्ये पॉलिसीधारकाचा पॉलिसी घेतल्यानंतर 5 वर्षांच्या आत मृत्यू झाल्यास त्यासाठी मिळणारा लाभ मिळतो. पण पॉलिसीच्या 5 वर्षानंतर त्याचा मृत्यू झाल्यास वारसाला मृत्यूनंतर मिळणारी रक्कम आणि लॉयल्टी अॅडीशनदेखील मिळते. याच्या दराची घोषणा एलआयसी करत असते. तुमची पॉलिसी पेड-अप पॉलिसीमध्ये बदलली गेली, तर तुम्ही जितका कालावधी ही पॉलिसी सुरू ठेवली आहे, तितक्या कालावधीची लॉयल्टी अॅडीशन मिळते.
*कोण घेऊ शकतं ही पॉलिसी -*
1) या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कमीतकमी आठ वर्ष वय असावं.
2) जास्तीतजास्त 55 वर्षांपर्यंतची महिला यामध्ये गुंतवणूक करू शकते.
3) पॉलिसी मॅच्युअर होताना वय 70 वर्षाच्या वर नसावं.
4) यामध्ये बचती बरोबरच लाईफ कव्हरदेखील मिळतं.
5) या पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर एकरकमी परतावा मिळतो.
6) पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ही रक्कम मिळते.
या योजनेतील अन्य अटी -
*रिव्हायव्हल -*
बंद झालेली किंवा पेड-अप झालेली पॉलिसी या द्वारे पुन्हा सुरू करता येते. शेवटचा हप्ता भरल्यानंतर दोन वर्षातच पॉलिसी पुन्हा सुरू करता येते. यासाठी तुम्हाला या दोन वर्षांचा हप्ता आणि त्यावरील व्याज भरणं आवश्यक आहे.
*ग्रेस पीरियड -*
काही कारणास्तव वेळेवर हप्ता भरू शकला नाही, तर एलआयसी तुम्हाला यासाठी अतिरिक्त वेळ देते. त्याला ग्रेस पिरीयड म्हणतात. साधारणपणे 30 दिवस ते 15 दिवसांचा हा कालावधी असतो. वार्षिक, सहामाही आणि तिमाही हप्ते भरणाऱ्यांसाठी 30 दिवसांचा तर मासिक हप्ता भरणाऱ्यांसाठी 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी दिला जातो.
*पेड अप व्हॅल्यू -*
ग्रेस पिरीयड मध्येही हप्ते न भरल्यास पॉलिसी बंद होते, मात्र किमान पॉलिसी घेतल्यानंतर सलग तीन वर्षे हप्ता भरलेला असल्यास ती पॉलिसी पेड-अप पॉलिसीमध्ये बदलते. या पेड-अप पॉलिसीमध्ये प्राप्त झालेल्या रकमेची देय रक्कम ही भरलेल्या प्रीमियमच्या प्रमाणात आणि वास्तविक देय रकमेच्या प्रमाणात कमी केली जाते. यात जमा बोनसदेखील जोडला जातो. ही रक्कम पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर किंवा व्यक्तीच्या मृत्यूनंतर दिली जाते.
*सरेंडर व्हॅल्यू -*
पॉलिसीधारकाला आपली पॉलिसी रद्द करण्याचा किंवा सरेंडर करण्याचा अधिकार असतो. मात्र यासाठी साधारणपणे सलग तीन वर्ष हप्ते भरलेले असणं आवश्यक आहे. त्यानंतरच पॉलिसी सरेंडर करता येते. पॉलिसी सरेंडर केल्यानंतर निर्धारित सरेंडर व्हॅल्यू आणि स्पेशल सरेंडर व्हॅल्यू यामध्ये जी रक्कम जास्त असते ती पॉलिसीधारकाला देण्यात येते.
*Call for more details.: 8554836989
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा