मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

कर्माचा लेखा-जोखा एक स्वैर अनुवाद.: सुरेंद्र पाथरकर

  पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून म्हणून कोण येत असत ? जांचे तुमच्या बरोबर कर्माचे देणेघेणे असतात ते. देणेघेणे नसेल तर नाही येणार ते तुमच्या आयुष्यात.
          
           एक सैनिक होता. त्याला आई/वडील नव्हते. त्याने लग्न केले नव्हते, मूलबाळ नव्हते, भाऊ बहिण नव्हते. एकटाच सैनिक म्हणून काम करीत पैसे साठवत होता.
           थोड्याच दिवसात त्याची ओळख एका शेठजीशी झाली जो सैनिकांना लागेल ते सामान पुरवठाचे काम करीत असे. त्याचे बरोबर  दोस्ती पण झाली.
       
          सेठ जी सैनिकाला म्हणाले तुम्ही जो पैसा साठवता आहे तो जशाच्यातसा पडलेला आहे. तुम्ही तो मला दिला तर मी त्याचा व्यवसायात उपयोग करीन. पैशाने पैसा वाढेल म्हणून तुम्ही  साठवलेले पैसे मला देऊन टाका.

          सैनिकाने शेठजीला साठवलेले पैसे देऊन टाकले. सेठ जी ने व्यवसायात त्या पैशाचा उपयोग केला. व्यवसायाला ऊर्जितावस्था आली, इन्कम वाढले, व्यवसाय पण वाढला.  थोड्याच दिवसात लढाई सुरू झाली त्यात सैनिकाला सहभागी व्हावे लागले.
  
          लढाई मधे सैनिक घोडीवर चढून लढू लागला. घोडी इतकी बदतमीज होती की, सैनिक जितक्या जोरात लगाम खेचत होता तितक्या जोरात घोडी वेगाने पळत होती .

         सैनिकाला घोडीला थांबवण्यात अपयश आले, लगाम खेचून खेचून त्याचे हात रक्तबंबाळ झाले. तोपर्यंत घोडी शत्रूच्या गोल सर्कल मधे जाऊन उभी राहिली. शत्रूच्या सैनिकांनी लगेच एकच वार केला त्यामुळे सैनिक जागीच ठार झाला. घोडी पण जागीच ठार झाली.

           आता शेठजी ला कळाले की सैनिक तर लढाई मधे ठार झाला त्यामुळे तो खूश झाला कारण सैनिकाचा कोणी वारस नव्हता आता त्याने सैनिकांकडून घेतलेला पैसा कोणाला द्यावा लागणार नव्हता.
आता माझ्याजवळ भरपूर पैसे आहेत, व्यवसाय पण जोरात चालत आहे, पैसे परत मागणारा पण राहिला नाही, त्यामुळे शेटजी ला खूप आनंद होता.

        थोडेच दिवसात शेठजी ला मुलगा झाला. देवाची खुप कृपा झाली. खूप संपत्ती मिळाली, व्यवसाय उत्तम चालू लागला, मुलगा पण झाला, पैसे मागणारा पण मेला, शेठजीच्या  खूपच आनंदला झाला.

         शेठजी चां मुलगा अभ्यासात हुशार होता, समजदार होता.  शेटजी ने त्याच्या मुलाला उत्तम शिक्षण दिले. शेटजी ने विचार केला हा मुलगा आता आपला व्यवसाय उत्तम करू शकतो, त्याचे लग्न करून दिले पाहिजे.
  
          लग्न करताच घरी सूनबाई आली. आता शेटजी ने विचार केला, चला मुलाचे लग्न झाले आता तो व्यवसाय उत्तम सांभाळेल. परंतु थोड्याच दिवसात मुलाची प्रकृती बिघडली.

           आता शेठ जी ची डॉक्टर, हकीम, वैद्य याच्याकडे धावपळ सुरू झाली. सगळ्यांचे औषध देऊन सुध्दा उपयोग होत नव्हता. आजारपण वाढतच होते. पैसा बरबाद होत होता. खर्च वाढत होता पण रोग बरा होत नव्हता.

            शेवटी डॉक्टरांनी सांगितले की मुलाला असाध्य रोग झाला आहे.आता याचा मृत्यू दोन दिवसात होईल.  डॉक्टरांचे उत्तर ऐकून निराश होऊन रडत रडत शेठजी मुलाला घेऊन परत येत असताना रस्त्यात एक माणूस त्यांना भेटून म्हणाला अरे शेठजी काय झाले.खूप दु:खी दिसत आहेत.        

             शेठजी ने सांगितले की मला वाटत होते हा माझा तरुण मुलगा म्हातारपणी माझी सेवा करेल. हा आजारी पडला. त्याला बरे वाटावे म्हणून त्याच्या इलाजासाठी जो मागेल तितका पैसा खर्च केला.

            परंतु डॉक्टरांनी आज सांगितले की हा आता वाचणार नाही. असाध्य रोग झाला आहे त्यावर इलाज नाही. त्याला आता घरी घेऊन जा, दोन दिवसात त्याचा मृत्यू होईल.

            तो माणूस म्हणाला अरे 
शेठजी काळजी कशाला करता. माझ्या शेजारी एक वैद्य औषध देतात. चार आण्याची पुडी खाउन मेलेला पण उठून उभा राहतो अशी त्यांची ख्याती आहे. लौकर जाउन तू त्या वैद्य कडून औषधाची पुडी घेऊन ये.
            शेठजी ने पळत जाऊन वैद्याला चार आणे दिले , औषधाची पुडी घेऊन आला व लगेच मुलाला औषध दिले. औषधाची पुडी 
खाताच मुलगा मेला.
            आता शेठजी, शेठानी त्यांची सूनबाई व पुरा गाव रडायला लागला. 
            तेव्हड्यात एक महात्माजी तिथे आले. त्यांनी विचारले ही रडारड का चालली आहे?
            या शेठजी चां एकच तरुण मुलगा होता तो मेला म्हणून सर्व  दु:खी झाले म्हणून रडत आहेत.

           महात्माजीने सेठ ला विचारले" का रडत आहेस बाबा ?"
           सेठ म्हणाले " महाराज जाचा तरुण मुलगा मरतो तो रडणार नाही तर काय करणार ?            
          महात्मा म्हणले: त्या दिवशी तर तुम्ही खूप खुश झाले होते.
          
सेठ : कुठल्या दिवशी ?

महात्मा:- सैनिकाने ज्या दिवशी पैसे दिले होते.
सेठ : हो व्यवसायासाठी पैसे मिळाले म्हणून खुशी होती.
महात्मा:-  आणि त्या दिवशी तर तुम्हाला खूप आनंद झाला होता. 
सेठ : कधी ?
महात्मा : अरे ज्या दिवशी सैनिक मेला होता ? 
सेठ : हां महाराज खुश तर झालो होतो.
महात्मा:- आणि त्या दिवशी तर आपल्या आनंदला पारावार राहिला नव्हता, तुम्ही किती मिठाई वाटली होती ?
 सेठ : कोणत्या दिवशी ?*
महात्मा : अरे ज्या दिवशी तुला मुलगा झाला होता.
सेठ : महाराज मुलगा झाला तर सगळेच खूश होतात, मी पण खूश झालो म्हणून काय झाले ?
महात्मा : त्या दिवशी तर तुला खुशीने आकाश ठेगणे वाटत होते. सेठ : कोणत्या दिवशी ?*
महात्मा : अरे त्या दिवशी मुलाचे लग्न झाले होत.
सेठ : महाराज मुलाचे लग्न झाले की प्रत्येक माणूस खूश असतो, मी पण खूश झालो होतो.
महात्मा:- जर इतक्या वेळेला खुस झाला होतास तर छोट्याश्या गोष्टी साठी का रडत बसला आहेस?
सेठ : महाराज तरुण मुलगा मरतो ही छोटीशी गोष्ट आहे? 
 महात्मा : अरे शेठजी तोच सैनिक पैसा परत घेण्यासाठी मुलगा बनून आला होता. शिक्षणासाठी खाणेपिणे, कपडा लत्ता, शौक शृंगार ला जेवढे पाहिजे तितके खर्च केले. लग्नकार्यात सर्व खर्च केले. व्याजावर व्याज देऊन डॉक्टरांना दिले.
            आता जेव्हा फक्त चार आणे पैसे वाचले होते ते पण वैदयला देऊन टाकले आणि औषधाची पुडी खाऊन मरून गेला.आता कर्माचे देणेघेणे चां हिशेब पुरा झाला.           

            सेठजी म्हणले, आमच्या बरोबर तर कर्माचे देणेघेणे होते, चला आमच्या बरोबर जे झाले ते झाले परंतु ती तरुण सूनबाई घरात रडत बसली आहे, तरुण सूनबाई ला विधवा बनऊन मुलगा मेला, सूनबाई ने काय गुन्हा केला होता की तिला हे भोग भोगावे लागणार आहेत. 
महात्मा : म्हणले ही तीच घोडी आहे जिने जवानीत त्याला धोका दिला होता.
          ही गोष्ट आमच्या सर्वांची आहे. जे आम्ही पेरल असते तेच आम्हाला परत मिळत असते.
म्हणून कोणाला दोष देऊ नका, दोष बघू नका, आमचा स्वतःचा दोष आहे.
           इंद्रियांच्या प्रतेक क्रियेत
आणि  मनाच्या वाहत्या विकल्प प्रवाहात  त्याचे फक्त तटस्थ जाणता निरीक्षक बनून आपल्या स्वभावानुसार पुरुषार्थ करणे हेच आपले एकमात्र कर्तव्य आहे.
 वेद, शास्त्र व पुराण यांच्या बरोबर सगळे साधु संतांचे सांगणे आहे की 
हा संसार कर्मों चा लेखा जोखा आहे
यात जो जीव चैतन्य( आत्मा) चे स्वतःचे स्वरूप, स्वभाव ला समजून घेईल तोच भव सागर पार करू शकेल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा