बालपण, तरुणपण, वृद्धावस्था मनुष्य जीवन तीन पार्ट मधे विभागले आहे. यापैकी बालपण, तरुणपण या अवस्थांबद्दल आपण विचार करणार नसून फक्त वृद्धावस्था बद्दल साधक बाधक विचार करणार आहोत. साधारणपणे वयाच्या 60 + नंतर ही अवस्था सुरू होत असल्याचे मानले जाते. ही कल्पना आता जुनी झाली असून साधारण पणे वयाच्या 75 वर्ष पर्यंत शाररिक कष्टाची नसतील पण बाउधिक कामे यशस्वी रित्या करू शकतो. याला एक्सेप्शन आहे ते मधुमेह, हाई बीपी, कॅन्सर इत्यादी क्रॉनिक रोगांनी ग्रासलेले असावे. मेडिकल क्षेत्रात अडवांस् technological शोधामुळे अनेक क्रॉनिक रोग बरे होऊ शकले नाही तरी नियंत्रणात आणण्यात ग्लोबल शास्त्रज्ञांना यश मिळत आहे. परिणाम स्वरूप average जगण्याचे वय 50 वरून 65 वर गेले आहे.
यावरून आनंद मानावा की दुःख हे सापेक्ष आहे. व्यक्ती व्यक्ती नुसार वेगवेगळे आढळून येते. सर्वसामान्य असे आढलून येते की 60+ व्यक्ती निरपयोगी असतात. समाजाला त्यांच्या जिवंत राहण्या मुळे काहीही फायदा नसून ऊपद्रव जास्त असतात. ही स्थिती साधारण कनिष्ठ जीवन स्तरा पासून माध्यम स्तरा पर्यंत दिसते. उच्य माध्यम वर्गीय, श्रीमंत व खासकरून राजकीय नेते या प्रकारात मोडत नाहीत असे आढलून येते.
कमीतकमी वेळेत, कमीतकमी श्रमात जास्तीतजास्त पैसा मिळवणे साठी तरुणांना जीवघेण्या स्पर्धेला तोंड द्यावे लागते. त्यामुळे वृध्द दुर्लक्षित राहतात. सरकारने कितीही वृद्ध व्यक्ती ला मदतीची व्यवस्था/स्कीम केली तरी त्यांच्या पर्यंत पोहचत नाही. या उत्तुंग महागाईच्या काळात महिन्याला फक्त ₹3000/- मानधनात एक निवृत्त व्यकी व त्याची पत्नी, डोक्यावर क्रॉनिक रोगाचे ओझे घेऊन कसे जगत असतील ? याचा विचार समाज, सरकार, पंतप्रधान, राष्ट्रपती, अथवा मुख्यमंत्री कोणालाही करायला वेळ नाही. कारण वृद्धांच्या दुःखा पेक्षा सत्तेचे, खुर्चीचे आकर्षण, महत्व जास्त असते हे कळण्या इतकी बुद्धी वृद्ध व्यक्तीकडे कुठून असणार नाही?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा