मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

कर्माचा लेखा-जोखा एक स्वैर अनुवाद.: सुरेंद्र पाथरकर

  पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून म्हणून कोण येत असत ? जांचे तुमच्या बरोबर कर्माचे देणेघेणे असतात ते. देणेघेणे नसेल तर नाही येणार ते तुमच्या आयुष्यात.
          
           एक सैनिक होता. त्याला आई/वडील नव्हते. त्याने लग्न केले नव्हते, मूलबाळ नव्हते, भाऊ बहिण नव्हते. एकटाच सैनिक म्हणून काम करीत पैसे साठवत होता.
           थोड्याच दिवसात त्याची ओळख एका शेठजीशी झाली जो सैनिकांना लागेल ते सामान पुरवठाचे काम करीत असे. त्याचे बरोबर  दोस्ती पण झाली.
       
          सेठ जी सैनिकाला म्हणाले तुम्ही जो पैसा साठवता आहे तो जशाच्यातसा पडलेला आहे. तुम्ही तो मला दिला तर मी त्याचा व्यवसायात उपयोग करीन. पैशाने पैसा वाढेल म्हणून तुम्ही  साठवलेले पैसे मला देऊन टाका.

          सैनिकाने शेठजीला साठवलेले पैसे देऊन टाकले. सेठ जी ने व्यवसायात त्या पैशाचा उपयोग केला. व्यवसायाला ऊर्जितावस्था आली, इन्कम वाढले, व्यवसाय पण वाढला.  थोड्याच दिवसात लढाई सुरू झाली त्यात सैनिकाला सहभागी व्हावे लागले.
  
          लढाई मधे सैनिक घोडीवर चढून लढू लागला. घोडी इतकी बदतमीज होती की, सैनिक जितक्या जोरात लगाम खेचत होता तितक्या जोरात घोडी वेगाने पळत होती .

         सैनिकाला घोडीला थांबवण्यात अपयश आले, लगाम खेचून खेचून त्याचे हात रक्तबंबाळ झाले. तोपर्यंत घोडी शत्रूच्या गोल सर्कल मधे जाऊन उभी राहिली. शत्रूच्या सैनिकांनी लगेच एकच वार केला त्यामुळे सैनिक जागीच ठार झाला. घोडी पण जागीच ठार झाली.

           आता शेठजी ला कळाले की सैनिक तर लढाई मधे ठार झाला त्यामुळे तो खूश झाला कारण सैनिकाचा कोणी वारस नव्हता आता त्याने सैनिकांकडून घेतलेला पैसा कोणाला द्यावा लागणार नव्हता.
आता माझ्याजवळ भरपूर पैसे आहेत, व्यवसाय पण जोरात चालत आहे, पैसे परत मागणारा पण राहिला नाही, त्यामुळे शेटजी ला खूप आनंद होता.

        थोडेच दिवसात शेठजी ला मुलगा झाला. देवाची खुप कृपा झाली. खूप संपत्ती मिळाली, व्यवसाय उत्तम चालू लागला, मुलगा पण झाला, पैसे मागणारा पण मेला, शेठजीच्या  खूपच आनंदला झाला.

         शेठजी चां मुलगा अभ्यासात हुशार होता, समजदार होता.  शेटजी ने त्याच्या मुलाला उत्तम शिक्षण दिले. शेटजी ने विचार केला हा मुलगा आता आपला व्यवसाय उत्तम करू शकतो, त्याचे लग्न करून दिले पाहिजे.
  
          लग्न करताच घरी सूनबाई आली. आता शेटजी ने विचार केला, चला मुलाचे लग्न झाले आता तो व्यवसाय उत्तम सांभाळेल. परंतु थोड्याच दिवसात मुलाची प्रकृती बिघडली.

           आता शेठ जी ची डॉक्टर, हकीम, वैद्य याच्याकडे धावपळ सुरू झाली. सगळ्यांचे औषध देऊन सुध्दा उपयोग होत नव्हता. आजारपण वाढतच होते. पैसा बरबाद होत होता. खर्च वाढत होता पण रोग बरा होत नव्हता.

            शेवटी डॉक्टरांनी सांगितले की मुलाला असाध्य रोग झाला आहे.आता याचा मृत्यू दोन दिवसात होईल.  डॉक्टरांचे उत्तर ऐकून निराश होऊन रडत रडत शेठजी मुलाला घेऊन परत येत असताना रस्त्यात एक माणूस त्यांना भेटून म्हणाला अरे शेठजी काय झाले.खूप दु:खी दिसत आहेत.        

             शेठजी ने सांगितले की मला वाटत होते हा माझा तरुण मुलगा म्हातारपणी माझी सेवा करेल. हा आजारी पडला. त्याला बरे वाटावे म्हणून त्याच्या इलाजासाठी जो मागेल तितका पैसा खर्च केला.

            परंतु डॉक्टरांनी आज सांगितले की हा आता वाचणार नाही. असाध्य रोग झाला आहे त्यावर इलाज नाही. त्याला आता घरी घेऊन जा, दोन दिवसात त्याचा मृत्यू होईल.

            तो माणूस म्हणाला अरे 
शेठजी काळजी कशाला करता. माझ्या शेजारी एक वैद्य औषध देतात. चार आण्याची पुडी खाउन मेलेला पण उठून उभा राहतो अशी त्यांची ख्याती आहे. लौकर जाउन तू त्या वैद्य कडून औषधाची पुडी घेऊन ये.
            शेठजी ने पळत जाऊन वैद्याला चार आणे दिले , औषधाची पुडी घेऊन आला व लगेच मुलाला औषध दिले. औषधाची पुडी 
खाताच मुलगा मेला.
            आता शेठजी, शेठानी त्यांची सूनबाई व पुरा गाव रडायला लागला. 
            तेव्हड्यात एक महात्माजी तिथे आले. त्यांनी विचारले ही रडारड का चालली आहे?
            या शेठजी चां एकच तरुण मुलगा होता तो मेला म्हणून सर्व  दु:खी झाले म्हणून रडत आहेत.

           महात्माजीने सेठ ला विचारले" का रडत आहेस बाबा ?"
           सेठ म्हणाले " महाराज जाचा तरुण मुलगा मरतो तो रडणार नाही तर काय करणार ?            
          महात्मा म्हणले: त्या दिवशी तर तुम्ही खूप खुश झाले होते.
          
सेठ : कुठल्या दिवशी ?

महात्मा:- सैनिकाने ज्या दिवशी पैसे दिले होते.
सेठ : हो व्यवसायासाठी पैसे मिळाले म्हणून खुशी होती.
महात्मा:-  आणि त्या दिवशी तर तुम्हाला खूप आनंद झाला होता. 
सेठ : कधी ?
महात्मा : अरे ज्या दिवशी सैनिक मेला होता ? 
सेठ : हां महाराज खुश तर झालो होतो.
महात्मा:- आणि त्या दिवशी तर आपल्या आनंदला पारावार राहिला नव्हता, तुम्ही किती मिठाई वाटली होती ?
 सेठ : कोणत्या दिवशी ?*
महात्मा : अरे ज्या दिवशी तुला मुलगा झाला होता.
सेठ : महाराज मुलगा झाला तर सगळेच खूश होतात, मी पण खूश झालो म्हणून काय झाले ?
महात्मा : त्या दिवशी तर तुला खुशीने आकाश ठेगणे वाटत होते. सेठ : कोणत्या दिवशी ?*
महात्मा : अरे त्या दिवशी मुलाचे लग्न झाले होत.
सेठ : महाराज मुलाचे लग्न झाले की प्रत्येक माणूस खूश असतो, मी पण खूश झालो होतो.
महात्मा:- जर इतक्या वेळेला खुस झाला होतास तर छोट्याश्या गोष्टी साठी का रडत बसला आहेस?
सेठ : महाराज तरुण मुलगा मरतो ही छोटीशी गोष्ट आहे? 
 महात्मा : अरे शेठजी तोच सैनिक पैसा परत घेण्यासाठी मुलगा बनून आला होता. शिक्षणासाठी खाणेपिणे, कपडा लत्ता, शौक शृंगार ला जेवढे पाहिजे तितके खर्च केले. लग्नकार्यात सर्व खर्च केले. व्याजावर व्याज देऊन डॉक्टरांना दिले.
            आता जेव्हा फक्त चार आणे पैसे वाचले होते ते पण वैदयला देऊन टाकले आणि औषधाची पुडी खाऊन मरून गेला.आता कर्माचे देणेघेणे चां हिशेब पुरा झाला.           

            सेठजी म्हणले, आमच्या बरोबर तर कर्माचे देणेघेणे होते, चला आमच्या बरोबर जे झाले ते झाले परंतु ती तरुण सूनबाई घरात रडत बसली आहे, तरुण सूनबाई ला विधवा बनऊन मुलगा मेला, सूनबाई ने काय गुन्हा केला होता की तिला हे भोग भोगावे लागणार आहेत. 
महात्मा : म्हणले ही तीच घोडी आहे जिने जवानीत त्याला धोका दिला होता.
          ही गोष्ट आमच्या सर्वांची आहे. जे आम्ही पेरल असते तेच आम्हाला परत मिळत असते.
म्हणून कोणाला दोष देऊ नका, दोष बघू नका, आमचा स्वतःचा दोष आहे.
           इंद्रियांच्या प्रतेक क्रियेत
आणि  मनाच्या वाहत्या विकल्प प्रवाहात  त्याचे फक्त तटस्थ जाणता निरीक्षक बनून आपल्या स्वभावानुसार पुरुषार्थ करणे हेच आपले एकमात्र कर्तव्य आहे.
 वेद, शास्त्र व पुराण यांच्या बरोबर सगळे साधु संतांचे सांगणे आहे की 
हा संसार कर्मों चा लेखा जोखा आहे
यात जो जीव चैतन्य( आत्मा) चे स्वतःचे स्वरूप, स्वभाव ला समजून घेईल तोच भव सागर पार करू शकेल.


गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

कलेचे जीवनातील महत्व

सौजन्य - ब्लूपॅड(https://bluepad.in/share/4mfLpuZTVZwRvMwp6) 
कलेच जीवनातील महत्व - सुरेंद्र पाथरकर 

             कलेच जीवनातील महत्व हा विषय सांगायला, लिहायला, समजायला खूपच सोपा असे वाटणे स्वभाविक आहे. पण तसे ते इतके सोपे नाही. "कलेची" शाब्दिक व्याप्ती खूप मोठी आहे. चांगली गोष्ट चातुर्याने करण्याला जसे कला संबोधतात तसेच वाईट गोष्ट चातुर्याने करण्याला देखील उपहासाने का होईना कलाच म्हणतात. असो 
             कुठलीही कला ही उपजीविकेचे उत्तम साधन होऊ शकते. प्रत्येकात काही काही उपजत कला दडली असते, फक्त त्याचे समाज उपयोगिते साठी समाजात उत्तम प्रकारे प्रदर्शन करता आले पाहिजे. समाजाची सुद्धा व्यक्ती व्यक्तीत दडलेल्या कलेला प्रोत्साहन देणे ही सामाजिक जबाबदारी असते. कला ही कलाच असते. कुठलीही कला गौण नसते. 
           काही कलांना समाजमान्यता मिळत नाही. कोल्हाला द्राक्षे आंबट सारखा हा प्रकार असतो. आपण आपल्यातील कला समाज उपयोगीते साठी प्रस्तुत करण्यात अपयशी ठरलो तर सर्व कला दोष शोधण्याचा स्वभाव बनतो. ज्यात समज्याचे नाही तर वैयक्तिक नुकसान होते.  
         आपले बोलणे समोरच्याने ऐकणे ही कला अनेकांमध्ये असते.
 आपण लिहिलेले किंवा व्यक्त झालेले विचार समोरच्याने आत्मसात करणे ही कला पण अनेकांमध्ये असते. 

आणखी वाचा - https://bluepad.in/share/MJFMecuP4tLcLcZG6 
ब्लूपॅड अ‍ॅप डाउनलोड करा - https://bluepad.in/share/4mfLpuZTVZwRvMwp6

गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१

बॅग कशी भरायची ? आवडलेली कविता.

बॅग कशी भरायची: 

आयुष्याच्या परतीच्या प्रवासासाठी  बॅग कशी भरायची ते आता मला कळले आहे ! फापट पसारा आवरून सारा , आता सुटसुटीत व्हायचं  आहे  !
याच्या साठी त्याच्या साठी , हे हव, ते हवं ,इथे तिथे - जाईन जिथे , तिथलं काही नवं  नवं  हव्या चा हव्यास आता प्रयत्नपूर्वक सोडायचा आहे, 
बॅग हलकी स्वतः पुरती आता फक्त ठेवायची आहे ! बॅग कशी भरायची ते आता मला कळले आहे ! 
अपेक्षांच्या ओझ्याखाली आजवर त्रस्त होतो आयुष्याच्या होल्डॉल मध्ये काय काय कोंबत होतो ! किती बॅगा किती अडगळ ! साठउन साठवून ठेवत होतो काय राहिलं, कुठे ठेवलं आठवून आठवून पाहत होतो 
त्या त्या वेळी ठीक होतं आता गरज सरली आहे, कुठे काय ठेवलंय ते ते  आता विसरून जायच आहे 
बॅग कशी भरायची ते  आता मला कळले आहे ! 
खूप जणांनी खूप दिलं सुख दुखाःचं भान दिलं आपण कमी पडलो याचं शल्य आता विसरायचं आहे ! मान, अपमान, ‘मी’ , ‘तू’  यातून बाहेर पडायचं आहे !
बॅग कशी भरायची ते  आता मला कळले आहे 
आत बाहेर काही नको  आत फक्त एक कप्पा, जना - मनात एकच साथी  सृष्टी करता एकच देवबाप्पा ! सुंदर त्याच्या निर्मिती ला डोळे भरून पाहायचं आहे !रीक्त -मुक्त होत होत अलगत उठून जायचं आहे 
बॅग कशी भरायची ते आता मला कळले आहे !

60 + अंत.

 बालपण, तरुणपण, वृद्धावस्था मनुष्य जीवन तीन पार्ट मधे विभागले आहे. यापैकी बालपण, तरुणपण या अवस्थांबद्दल आपण विचार करणार नसून फक्त वृद्धावस्था बद्दल साधक बाधक विचार करणार आहोत. साधारणपणे वयाच्या 60 + नंतर ही अवस्था सुरू होत असल्याचे मानले जाते. ही कल्पना आता जुनी झाली असून साधारण पणे वयाच्या 75 वर्ष पर्यंत शाररिक कष्टाची नसतील पण बाउधिक कामे यशस्वी रित्या करू शकतो. याला एक्सेप्शन आहे ते मधुमेह, हाई बीपी, कॅन्सर इत्यादी क्रॉनिक रोगांनी ग्रासलेले असावे. मेडिकल क्षेत्रात अडवांस् technological शोधामुळे अनेक क्रॉनिक रोग बरे होऊ शकले नाही तरी नियंत्रणात आणण्यात ग्लोबल शास्त्रज्ञांना यश मिळत आहे. परिणाम स्वरूप average जगण्याचे वय 50 वरून 65 वर गेले आहे.

    यावरून आनंद मानावा की दुःख हे सापेक्ष आहे. व्यक्ती व्यक्ती नुसार वेगवेगळे आढळून येते. सर्वसामान्य असे आढलून येते की 60+ व्यक्ती निरपयोगी असतात. समाजाला त्यांच्या जिवंत राहण्या मुळे काहीही फायदा नसून ऊपद्रव जास्त असतात. ही स्थिती साधारण कनिष्ठ जीवन स्तरा पासून माध्यम स्तरा पर्यंत दिसते. उच्य माध्यम वर्गीय, श्रीमंत व खासकरून राजकीय नेते या प्रकारात मोडत नाहीत असे आढलून येते. 

        कमीतकमी वेळेत, कमीतकमी श्रमात जास्तीतजास्त पैसा मिळवणे साठी तरुणांना जीवघेण्या स्पर्धेला तोंड द्यावे लागते. त्यामुळे वृध्द दुर्लक्षित राहतात. सरकारने कितीही वृद्ध व्यक्ती ला मदतीची व्यवस्था/स्कीम केली तरी त्यांच्या पर्यंत पोहचत नाही. या उत्तुंग महागाईच्या काळात महिन्याला फक्त ₹3000/-  मानधनात एक निवृत्त व्यकी व त्याची पत्नी, डोक्यावर क्रॉनिक रोगाचे ओझे घेऊन कसे जगत असतील ? याचा विचार समाज, सरकार, पंतप्रधान, राष्ट्रपती, अथवा मुख्यमंत्री कोणालाही करायला वेळ नाही. कारण वृद्धांच्या दुःखा पेक्षा सत्तेचे, खुर्चीचे आकर्षण, महत्व जास्त असते हे कळण्या इतकी बुद्धी वृद्ध व्यक्तीकडे कुठून असणार नाही?




गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१

एक राधा हवीच ना ! अजरामर कविता cp

एक राधा हवीच ना.....?
एकांतात बोलायला...
हातात हात धरायला...
काळजात सामावनू ..काळजी करायला...एक राधा हवीच ना.....?
जग हसत जेव्हा जेव्हा,
तेव्हा समजतूकाढायला...
भकूनसतांनाही आग्रह करून,
हक्काने जेवण वाढायला...
एक राधा हवीच ना.....?
कुणीच नसते आपल अस ...
एकाकीपण भरायला...
नकळत ओघळनारे दोन अश्र
तळहातावर धरायला...
एक राधा हवीच ना.....?
श्वास होतात मदं मदं ,
धडधड नसु ती ऐकायला...
शांत निवांत शेवटाला,
सुरेल भरैवी गायला...
एक राधा हवीच ना.....?
आसमतं रिता होतांना...
आभाळ भरून आणायला...
“होय” मी फ़क्त तजुीच आहे
कानांमधे म्हणायला...
एक राधा हवीच ना.....?
एक राधा हवीच ना.....?

श्रीमंती कशाला म्हणतात: अप्रतिम आवडलेली गोष्ट !

श्रीमंती कशाला म्हणतात? 
 तुमचे मन भरुन येईल ; कदाचीत डोळेही पाणावतील.......
😢😢😢😢😢😢😢
Cp
शाळेने पत्रक काढलं,'; यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायचीबी आहे, तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा,ज्यायोगे ही मदत योग्य विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला मिळेल !

आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे, खरोखर पंचाईतच होती. ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की,अगदी एक विजार, एक सदरा असेल,तरी तो रोज धुऊन-वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात
गरीब मुलगा शोधायचा कसा ? आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं, तुमच्यात कोण गरीब; तेही सर्वात गरीब म्हणून? मोठीच अडचण होती. तीन - चार दिवस नुसता अंदाज बांधण्यात गेले. वयाने मोठ्या माणसांमधे गरीब माणूस शोधणं सोप्पं आहे ;पण लहान मुलांमधे अडचणीचं .शेवटी दोन-चार मुलांना हाताशी घेतलं, जी गाडीने शाळेत यायची
आणि गाडीनेच घरी जायची.

मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफ़रचंद खातांना मला दिसायची. अशा मुलांना विचारलं ," मला एक मदत कराल का? आपल्या वर्गातला सर्वात गरीब.......?"

क्षणाचाही विलंब न करता सर्वानी एकच नाव उच्चारले," सर आपल्या वर्गातला तो मयूर आहे नं, तो सर्वात गरीब आहे."

मुलांनी एका झटक्यात प्रश्न सोडवला होता. "कशावरून म्हणता?" 
" सर. त्याचा सदरा दोन- तीन ठिकाणी तरी फ़ाटलाय. त्याने शिवलाय; पण फ़ाटलेला शर्ट घालतो. त्याची खाकी पॅंट तर नीट बघा , मागून दोन ठिगळं लावलेली आहेत. चपला त्याला नाहीतच. मधल्या सुट्टीत आम्ही डबा उघडतो . तो मात्र प्लॅस्टीकच्या पिशवीतून अर्धी भाकरी आणतो.सर,ती भाकरीही कालचीच असते.भाजी कुठली सर? गुळाचा खडा असतो. आम्ही सांगतो,तो सर्वात गरीब आहे. शाळेने त्याच मुलाला मदत द्यायला हवी ."

मुलं एखाद्या खळाळत्या प्रवाहासारखी पुढे बोलतच राहीली . पण मला ते ऐकू येणे शक्य नव्हते. मयूर एवढा गरीब असेल? की सर्वांनी एकमुखाने त्याच्या गरीबीचे दाखले द्यावेत? कारण, मयूर वर्गातील सगळ्यात चपळ मुलगा होता. अक्षर स्वच्छ, मोकळं होतं. त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचे दर्शन मला घडे. एकदा तर त्याची वही मी माझ्या घरात पत्नीला दाखवली आणि म्हट्लं, " पाहिलंस ! हे सातवीतल्या मुलाचे अक्षर.असं अक्षर असावं हे माझे स्वप्न होते.उत्तराला सुबक परीच्छेद, समास सोडून योग्य प्रस्तावना आणि
अखेर करून लिहिलेली उत्तरे........." चे गठ्ठे आणायला मयूर सर्वात आधी धावत यॆई. माझ्याआधी ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा उत्साह मला थक्क करून टाकत असे......

असा मयूर परिस्थितीने एवढा खचलेला असेल याची कल्पनासुद्धा मला येऊ नये, या गोष्टीचीच मला खंत वाटली .जी गोष्ट माझ्या इतर विद्यार्थ्यांना उमगते आणि मला त्याचा पत्ताही नसतो......अरेरे!..., 
मी खूप कमी पडतोय. मयूर , गेल्या सहलीला आला नव्हता. अवघी पंचवीस रूपये वर्गणी होती; पण त्याचं नाव यादीत नव्हतं. आपण
त्याला साधं विचारलंसुद्धा नाही.

असलेल्या मुलांच्या किलबिलाटात न आलेल्या मयूरची मला आठवणही झाली नव्हती. केवळ पंचवीस रूपये नसल्याने त्याचे National Park बघण्याचे राहून गेले. एका छान अनुभवाला मुकला होता तो. हा आनंद मी हिरावला होता.यादीत मयूरचे नाव नाही म्हणून मी त्याला जवळ का बोलावलं नाही? मयूर स्वत:हून सांगणं शक्यच
नव्हतं आणि माझ्या व्यग्र दिनक्रमात मयूरसाठी जणू वेळच शिल्लक नव्हता!

शिक्षक म्हणून मी एक पायरी खाली आलो होतो. खरंच आहे, मुलांनी सुचवलेलं नाव. आर्थिक मदत, तीही भरघोस मदत मयूरला मिळायलाच हवी. आता शंकाच नव्हती. त्याची गरीबी बघायला त्याच्या घरी जायचेही काहीच कारण नव्हते. मुलांनी एकमुखाने सुचवलेले नाव आणि मयूरने सहलीला न येणं याची सांगड घालून मी मुख्याध्यापकांना नाव देउन
टाकले'; मयूर, सातवीअ, अनुक्रमांक बेचाळीस';

डोळ्यावरचा चष्मा हातात खेळवीत आदरणीय मुख्याध्यापक म्हणाले, " खात्री केलीये ना सर? कारण थोडीथोडकी रक्कम नाही. या विद्यार्थ्याची वर्षाची फ़ी, त्याचे शालेय शिक्षण साहित्य, गणवेश...इत्यादी सर्व या रकमेत सामावणार आहे."

मुख्याध्यापकांना मोठया आत्मविश्वासाने मी म्हटलं, " सर, त्याची काळजीच करू नका. वर्गातला सर्वात गरीब आणि आदर्शही म्हणा हवं तर-मयूरच आहे!"

एका योग्य विद्यार्थ्याची निवड केल्याचे समाधान घेऊन मी निघालो. मयूरला मिळणारी मदत, त्यामुळे त्याचे आर्थिकद्रूष्ट्या सुसह्य होणारे शैक्षणिक वर्ष याची कल्पनाचित्रे
रंगवतांना दिवस कसा संपला ते कळालेच नाही.

दुस~या दिवशी शाळेत लवकरच गेलो. देखण्या अक्षराच्या कदम सरांनी मोठ्या दिमाखाने फ़ळा सजवला होता.त्यावर 'गरीब असूनही आदर्श ' असं म्हणून मयूरचं नाव होतं. शाळा भरली. मी अध्यापक खोलीत बसलेलो होतो. इतक्यात खोलीच्या दाराशी मयूर उभा दिसला. 

त्याच्या चेह~यावरचा भाव समजत नव्हता. राग आवरावा तसा करारी चेहरा... " सर, रागवू नका; पण आधी त्या फ़ळ्यावरचे माझे नाव पुसुन टाका." अरे, काय बोलतोयस तुला समजतय का?" चुकतही असेन मी . वाट्टेल ती शिक्षा करा; पण ते नाव...!!"

त्याच्या आवळलेल्या मुठी, घशातला आवंढा, डोळ्यातलं पाणी......मला कशाचाच काही अर्थ लागेना. मी ज्याचं अभिनंदन करायच्या तयारीत, तो असा.....?

" सर, मला मदत कशासाठी? 
गरीब म्हणून? मी तर श्रीमंत आहे."

त्याची रफ़ू केलेली कालर माझ्या नजरेतून सुटत नव्हती.येतानाच त्याचे अनवाणी पाय पाहिले होते. शाळेच्या चौदा वर्षाच्या माझ्या व्यावसायिक कालखंडात अशी पंचाईत प्रथमच आली होती. 

"अरे पण....?"

"सर,विश्वास ठेवा.मी श्रीमंत आहे.कदाचित सर्वात श्रीमंत असेन...सर, मी गरीब आहे हे ठरवले कोणी? मी चुकतोय बोलतांना हे कळतंय मला; पण सर ते नाव तसंच राहिले तर मी आजारी पडेन आज."

अचानक तो जवळ आला आणि त्याने माझे पायच धरले. त्याला उठवत मी म्हणालो, " ठीक आहे. तुला नकोय ना ती मदत, नको घेऊस; पण तू श्रीमंत आहेस ते कसे
काय?"

" सर, माझ्या अभ्यासाच्या वह्या बघा, कुठल्याही विषयाच्या.... त्या पूर्ण आहेत.पुस्तकं मी Second Hand वापरतोय ...खरयं ! पण मजकूर तर तोच असतो ना? मनात काय उतरवतो ते महत्वाचे नाही का? 
सर, माझे पाचवीपासूनचे मार्क बघा, नेहमी पहिल्या तीनात असतो. गेल्या वर्षी स्पोर्टसपासून निबंधापर्यंत सर्व बक्षिसे मलाच आहेत.
सर...सर,सांगा ना, मी गरीब कसा?"

मयूर मलाच विचारत होता आता मघाचचं दु:खाचं पाणी विरून त्यात भविष्याचं स्वप्न थरारत होतं.

"खरयं मयूर. पण तुला या पैशाने मदतच......."

" सर, मदत कसली? माझी श्रम करण्याची वॄत्तीच नाहीशी होइल. शाळाच फ़ी देतीये म्हटल्यावर, मी वडीलांबरोबर रंगाच्या कामाला जाणं बंद करेन! "

"म्हणजे?"

" वडील घरांना रंग द्यायचे काम करतात. Contractor बोलावतो तेव्हाच काम मिळते. तेव्हा ते मला त्यांच्याबरोबर नेतात. चार पैसे मला मिळतात, ते मी साठवतो. सर, संचयिका आहे ना शाळेची, त्यातलं माझं पासबुक बघा. पुढच्याही वर्षाची फ़ी देता येइल एवढी रक्कम आहे त्यात...

मुलांनी तुम्हाला काहीतरीच सांगितलेले दिसते.....
म्हणून तुम्ही मला निवडलेलं दिसतं. पण सर, मीच नाही तर आमचं घरच श्रीमंत आहे. घरातले सगले काम करतात. काम म्हणज
कष्ट. रंगाचं काम नसतं तेव्हा बाबा स्टेशनवर हमालीही करतात.आई धुणं-भांडी करते. मोठी बहीण दुसरी-तिसरीच्या शिकवण्या घेते. सर, वेळ कसा जातो,दिवस कसा संपतो ते कळतच नाही....शाळेतल्या वाचनलयातली पुस्तकं मीच सर्वात जास्त वाचली आहेत. तुम्हीच सांगितल्याप्रमाणे लेखकांनाही पत्र पाठवतो मी. सर, माझ्या घरी याच तुम्ही, माझ्याकडे पु.ल. देशपांडे यांच्या स्वाक्षरीचं पत्र आहे. ........सर,आहे ना मी श्रीमंत?"

आता तर तो स्मितरेषांनी मोहरला होता. सर, शेजारच्या काकांकडून मी उरलेल्या वेळात पेटीही शिकलो. रात्री देवळात होण्या~ या भजनात मीच पेटीची साथ देतो. भजनीबुवा किती छान गातात! ऐकताना भान हरपून जातं."

त्याच्या सावळ्या रंगातही निरोगीपणा चमकत होता.अभावितपणे मी विचारलं," व्यायामशाळेतही जातोस?"

"सर, तेवढी फ़ुरसत कुठली? घरातच रोज चोवीस सूर्यनमस्कार आणि पन्नास बैठका काढतो ."

अंगावर एक थरार उमटला... कौतुकाचा.

" मयूर मित्रा, मला तुझा अभिमान वाटतो.तुझ्यासारखा श्रीमंत मुलगा माझ्या वर्गात आहे त्याचा .."

" म्हणूनच म्हणतो सर......!"

" हे नाव ज्या कारणासाठी आहे, त्यात तू नक्कीच बसणार नाहीस. आमची निवड चुकली; पण याचं रूपांतर वेगळ्या शिष्यवॄत्तीत होईल. शाळेतील सर्वात अष्टपैलू बुद्धिमान मुलगा म्हणून, हे पारितोषीक तरी........."

" सर, एवढ्यात नाही. त्याला वर्ष जाउ द्या. मी लिंकनचं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र वाचलं, हेलन केलरचं महात्मा फुले यांचे चरित्र वाचलं.सर, हे वाचलं की कळतं की ही माणसे केवढे कष्ट करून मोठी झाली. माझ्यासारख्या मुलांना प्रोत्साहन द्या, योग्य वयात ते परखड मार्गदर्शन करा; पण सर, नको त्या वयात असा पैसा पुरवत गेलात तर घडायचं राहूनच जाईल. जे काय करतोय ते पैशासाठी असे हॊऊन जाईल... सर.....प्लीज.....!"

वाचनानं, स्पर्धांतल्या सहभागानं , कलेच्या स्पर्शानं, कष्टानं....... त्याच्या वाणीला प्रगल्भतेची खोली होती, संस्कारामुळे नम्रतेची झालर होती. आता मला माझ्या समोरचा मयूर जाधव स्पष्ट दिसतही नव्हता. त्याच्याबद्दलच्या कौतुकाचे अश्रू माझ्या डोळ्यात दाटले होते.

शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा माझ्यासमोर उभा होता. परिस्थिती पचवून, परीश्रमाने स्वत:वर पैलू पाडणारा ! श्रीमंत.

आवडलेली हिंदी कविता: मजेमे हू !

 *मजे में हूँ*

घुटने बोलते हैं
लड़खड़ाता हूँ
छत पर
रेलिंग पकड़कर जाता हूँ
दाँत कुछ ढीले हो चले
रोटी डुबा कर खाता हूँ
वो आते नहीं
बस फोन पर पूछते हैं
कि कैसा हूँ ?
बड़ी सादगी से कहता हूँ
मजे में हूँ मजे में हूँ ।😄😄

दिखता है सब
पर वैसा नहीं दिखता
लिखता हूँ सब
पर वैसा नहीं लिखता
आसमान और आँखों के बीच अब
कुछ बादल सा है दिखता
पढ़ता हूँ अखबार
पर कुछ याद नहीं रहता
डॉक्टर के सिवाय
किसी और से
कुछ नहीं कहता
पूछते हैं लोग तबियत
बड़ी सादगी से कहता हूँ
मजे में हूँ मजे में हूँ ।😁😁

कभी दो रंगी मोजे
जूतों में हो जाते हैं
कभी बढ़े हुऐ नाखून
यकायक चश्मे से
किसी महफिल में दिखाई देते हैं
फिर अचकचा कर
उनको छुपाता हूँ
कभी बीस व तीस
का अन्तर
सुनाई नहीं देता
बहुत से काम
अब अंदाजे से कर लेता हूँ
कोई कभी
पूछ लेता है
कहाँ हूँ कैसा हूँ
हँस कर कह देता हूँ
मजे में हूँ मजे में हूँ😁😁

बीत गया है लंबा सफर
पर इंतज़ार बाँकी है

हासिल कर ली हैं मंज़िलें
पर प्यास अभी बाकी है
ख़ुद तो दौड़ सकता नहीं
अब अपनों में बाज़ी लगाता हूँ
ठहर गयीं हैं यादें
पुरानी बातें सुनाता हूँ
क्या मज़ा है जिंदगी का
उनके जबाब का इंतज़ार अभी बाँकी है
ये दिल है कि मानता नहीं
अब भी धड़कता वैसे ही है
बूढ़ा तो हो चुका है
पर मानता नहीं
शरीर दुखता हैj
पर आँखों की शरारत जारी है

इसलिये तो बार बार कहता हूँ
मजे में हूँ मजे में हूँ।
Cp
😊😊😁😁😁😁

" चाक " आवडलेला सुंदर लेख

*एक सुंदर आर्टिकल* जरुर वाचाच 

*चाक..*

     *प्रिया आणि समरच्या लग्नाला आता जवळजवळ तीन वर्ष होत आली होती. L0VE MARRIAGE च्या जमान्यात त्यांच ARRANGED MARRIAGE होत. सुरवातीला सगळं सुरळीत चालू होत. पण नंतर काही ना काही कारणामुळे खटके उडू लागले.*

*प्रिया बँक मध्ये कामाला होती तर समर एका परदेशी कंपनीत.*

*घरात सगळ्या सुख-सोई होत्या. नव्हता तो फक्त एकमेकांसाठीचा वेळ आणि एकमेकांना समजून घेण्याची समज.*

*भांडणाच कारण कधी गादीवर पडलेला ओला टॉवेल तर कधी किचनमध्ये सुरु राहिलेला पंखा.*

*आजकाल तर काहीही शुल्लक कारण पुरेस होतं होत.*

*आज सकाळीही खिडकीवर विसरलेला कालचा चहाचा कप वादळ उठवून गेला.*

*दोघे एकमेकांशी तावातावने खूप भांडले नी काही न खाता उपाशी ऑफिसला निघून गेले.*

*आज नविन महिन्याचा पहिला आठवडा त्यामुळे ऑफिसमध्ये काम भरपूर असणार एखादे वेळेस लंचसाठी देखील वेळ मिळणार नाही हे.*

*प्रियाला माहित होत पण तरी देखील ती तशीच निघून आली.*

*आज ४ तारीख, म्हणजे दर महिन्याप्रमाणे आज पाटील आजी आजोबा पेंन्शन साठी बँकमध्ये येणार.*

*पाटील आजी आजोबा संपूर्ण बँकमध्ये कौतुकाचा विषय होता. दोघे जोडीने नेहमी येत, कडक इस्त्री केलेली कॉटनची साडी आणि तसाच कडक इस्त्रीचा कॉटनचा शर्ट.*

*दोघे सत्तरीच्या घरात होते, पण एकमेकांना खूप सांभाळत होते.*

*दरवेळी येताना बरोबर शबनम बॅग त्यात पाण्याची बाटली, छत्री, बिस्कीटचा पुडा आणि दोघांची डॉक्टरची फाईल न चुकता असे.*

*त्यांच्याकडे बघून प्रिया नेहमी विचार करत असे कि आपल्या नशिबात हे सुख का नाही.*

*नेहमीप्रमाणे आजोबांनी स्वतःचा फॉर्म भरला नी काउंटर वर दिला आणि आजीकडे तिचा फॉर्म घ्यायला वळले आणि नेहमी प्रमाणे आजी रिकामा फॉर्म घेऊन तशीच उभी होती.*

*'अगं काय हे, एक साधा फॉर्म भरता येत नाही तुला ? आणखी किती वर्ष माझ्याकडून भरून घेणार आहेस, आज शेवटचा भरतो आहे, पुढच्यावेळी तूच भर'.*

*'असू द्या ओ तुम्ही आहात ना, मग मी कशाला चिंता करू ?"' आजीचं गोड हसून उत्तर..*

*थोड्याफार प्रमाणात हा संवाद दर महिन्याचा होता.*

*आज काउंटरवर प्रिया होती, प्रियाच्या हातात फॉर्म देत 'बावळट आहेस' आजोबा पुटपुटले आणि आजी लाजली. 'इथेच थांब, मी मॅनेजरला भेटून येतो, जाऊ नकोस कुठे, हरवशील, वेंधळी आहेस तू' म्हणत आजोबा केबिन कडे गेले.*

*'आजी, अहो इतके बोलतात आजोबा तर शिकून घ्या ना फॉर्म भरायला, त्यात काहीच कठीण नाहीे' प्रिया वेळ काढण्यासाठी बोलली.*

*आजी हसली 'अग मला येतो भरता फॉर्म, पण मला तो येत नाही म्हणून ह्यांची होणारी ती प्रेमळ चिडचिड मला आवडते'.*

*'मी एकटी सगळं करू शकते, पण मी ते करू शकत नाही म्हणून हे जे जबाबदरीने करतात ते मला फार आवडत'.*

*'ह्या वयात आपल्यावर कोणी तरी अवलंबून आहे हा विचार त्यांचा अहंकार सुखावतो आणि मग ते स्वतःची काळजी घेतात मला ते हवं आहे'.*

*'संसारात दोघांनाही दोघांची गरज असते, एक चाक अडकलं तर दुसऱ्या चाकाने आणखी थोडा जोर लाऊन गाडी ओढायची असते" आजी गोड हसली.*

*कॅबिन मधून आजोबा बाहेर आले नी आजी त्यांच्या पाठीमागे चालू लागली.*

*दाराशी येत इथेच थांब मी रिक्षा घेऊन येतो म्हणून आजोबा निघाले नी आजी ने त्यांना मागून हाक मारून छत्री हातात दिली. सगळा प्रसंग गोड होता, 'किती प्रेम आहे ना आजींचे आजोबांवर' बाजूला बसलेल्या सरिताला प्रिया म्हणाली'.*

*अग दोघाचं बोल, आजीला उन्हाचा त्रास होतो म्हणून पाटील आजोबा तिला इथेच थांबवून चालत जाऊन रिक्षा आणतात, नेहमी बॅगमध्ये कोकम सरबताची बाटली घेऊन फिरतात, खूप काळजी घेतात ते एकमेकांची"*
*प्रियाला सकाळी घडलेला प्रसंग आठवला.*

*समरने काल लवकर आला तेव्हा दोघांसाठी चहा करून ठेवला होता आणि हे तो जेव्हा-जेव्हा लवकर यायचा तेव्हा-तेव्हा करत होता. आज समरशी शांतपणे बोलायचं प्रियाने ठरवलं.*

*तिने समरला फोन लावला "काही खाल्लस का ?' 'नाही गं आज एक महत्वाची मिटिंग आहे, तू काही खाल्लस का ? 'नाही, चल कामं होत राहतील काहीतरी खाऊन घे, उपाशी काम करत बसू नकोस, मीही ब्रेक घेते' संध्याकाळी जेवायला बाहेर जायचं ठरवून प्रियाने फोन ठेवला.*

*हळूहळू का होईना दोघांमध्ये वादाच्या जागी संवाद होऊ लागला, खटके उडत होते पण पूर्वीसारखं वातावरण नव्हतं.*

*ह्यात तीन-चार महिने गेले आणि आज पुन्हा सकाळी बेडवर ओला टॉवेल बघून प्रियाचा पारा चढला.*

*समरने सॉरी म्हणून टॉवेल उचलला पण तोपर्यंत प्रिया खूप चिडली होती "नोकर नाही मी इथे, नाही जमणार मला सारखं ऍडजस्ट करायला, इतका आळशी स्वभाव बरा नाही." रागारागात प्रियाने तयारी केली नी ती ऑफिसला निघून गेली.*

*काउंटर वर ती बसली होती आणि तिला दारातून पाटील आजोबा आत येतांना दिसले.*

*आज ते एकटेच होते आणि पेंन्शनचा दिवसही नव्हता. काहीतरी वेगळं काम असेल म्हणून प्रिया पुन्हा आपल्या कामात गुंतली.*

*शिपायाने, साहेबांनी आत बोलावलं आहे हा तिला निरोप दिला.*

*आत पाटील आजोबा बसले होते, "प्रिया पाटील आपल्या बँकचे सगळ्यांत जुने कस्टमर आहेत, त्यांना आज पर्सनली मदत कर, मी दुसऱ्या ब्रँच मध्ये चाललो आहे त्यामुळे Y0U CAN SIT HERE & HELP HIM WITH ALL THE F0RMALITIES' नायर साहेब निघून गेले.*

*'बोला आजोबा काय करायचं आहे". 'मला सावित्रीच अकाऊंट क्लोज करायच आहे, गेल्या आठवड्यात ती हार्टअटॅक नी घरी बसल्या जागी गेली'. कोणीतरी जोरात ओरडल्यावर जसं कान सुन्न होतात प्रियाच तसं झालं 'I AM S0RRY' च्या व्यतिरिक्त  ती काहीच बोलू शकली नाही. आजोबा बोलत होते "खूप काळजी घ्यायची माझी ती, सगळं वेळच्या वेळी, मी सुरुवाती पासून वेंधळा, पण ती प्रत्येक वेळी माझ्या चुका लपवायची माझ्या पाठीशी कायम उभी राहिली, तिला बहुतेक ती जाणार हे कळलं होतं, आज पर्यंत तिला कित्येक वेळा मी जेवण करण्यासाठी बाई ठेवू सुचवलं होत पण तिने कधीच ऐकलं नाही, पण एक १५ दिवसापूर्वी तिने जेवणासाठी बाई ठेवली तिला मला लागतं तसं जेवण शिकवलं, मी तिला चिडवलं देखील कि पाटलीनबाई आता बसल्याजागी ऑर्डर देणार"*

*आजोबानी डोळ्याला रुमाल लावला, प्रियालाही रडू आवरलं नाही, F0RMALITIES पूर्ण करून आजोबा निघून गेले. प्रियाच लक्ष फोनकडे गेल, समरचा मेसेज स्क्रीनवर डिस्प्ले होत होता .. 'सॉरी प्रिया मी आज पुन्हा टॉवेल विसरलो, I WILL TRY N0T T0 D0 IT AGAIN, पण यार तू त्यामुळे काही न खाता ऑफिसला जाऊ नकोस, I FEEL GUILTY, PLEASE D0N'T D0 THAT AGAIN. I HAVE BEEN PAMPERED, SP0ILED BRAT TILL DATE & I AM TRYING T0 CHANGE THAT, PLEASE GIVE ME TIME T0 CHANGE MYSELF, I PR0MISE I WILL CHANGE, I NEVER HAVE SAID THIS BEF0RE BUT I ALWAYS WANT Y0U IN MY LIFE, N0 0NE CAN UNDERSTAND MY M00D THE WAY Y0U D0, PLEASE'.*

*काहीवेळ प्रिया फोन कडे बघत राहिली आणि तिला पाटील आजीच वाक्य आठवलं 'आपल्यावर कोणी तरी अवलंबून आहे हा विचार त्यांचा अहंकार सुखावतो.' 'संसारात दोघांनाही दोघांची गरज असते, एक चाक अडकलं तर दुसऱ्या चाकाने आणखी थोडा जोर लाऊन गाडी ओढायची असते'*

*प्रियाने रिप्लाय सेंड केला..*

*'SORRY, I T00 L00SE MY C0NTR0L EVERY N0W & THEN, I WILL ALS0 TRY T0 W0RK 0N IT, Y0U T00 PLEASE GIVE ME TIME F0R THAT, I T00 ALWAYS WANT Y0U T0 BE THEIR IN MY LIFE, Y0U ARE MY ENTIRE SUPP0RT SYSTEM & WE B0TH WILL W0RK T0WARDS UNDER STANDING EACH 0THER'..*

*॥ तात्पर्य...॥*

   *तात्त्विक भांडण सर्वांशी होते, पण 'राग' कायम कुणाशीचं ठेवू नये.. खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, जरूर असावे, पण मनात कायम 'भेद' ठेवू नये.. एखाद्याशी वाद घालावा, पण वादावादी न करता क्षणात 'सुसंवाद' साधावा. 'अहंकार' हाच  या सर्वाचं मुळ आहे, तो विनाकारण  'बाळगुन जगू' नये..*

      *शेवटी 'मृत्यू' हे 'सुंदर शाश्वत वास्तव' आहे, त्याचे 'स्मरण' असावे भय नसावे.*

*आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर 'उरलेल्या" दिवसांचा 'आनंद' उपभोग घेण्यासाठी याचे 'स्मरण' ठेवू या.*

       *आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती 'जण आनंदात' आहेत याला खूप महत्व आहे.*

    *'एक हृदय' घेऊन आलोय जाताना 'लाखो हृदयात' जागा करुन जाता आलं पाहिजे क्षमा करा, प्रेम द्या, प्रेम घ्या..
Cp

काळजातले दु:ख :संकलित आवडलेली कविता.

*🙏काळजातले दुःख!🙏*
👍 *नक्की वाचा* 👌
    *कुणीच कुणाच्या जवळ नाही* 
*हीच खरी समस्या आहे* 
*म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी*
*आणि अमावस्या जास्त आहे.*

*हल्ली माणसं पहिल्या सारखं* 
*दुःख कुणाला सांगत नाहीत* 
*मनाचा कोंडमारा होतोय* 
*म्हणून आनंदी दिसत नाहीत* .

*एवढंच काय* 
*एका छता खाली राहणारी तरी* 
*माणसं जवळ राहिलीत का ?*
*हसत खेळत गप्पा मारणारी* 
*कुटुंब तुम्ही पाहिलीत का ?*

*अपवाद म्हणून असतील काही* 
*पण प्रमाण खूप कमी झालंय* 
*पैश्याच्या मागे धावता धावता* 
*दुःख खूप वाट्याला आलंय*. 

*नातेवाईक व कुटुंबातले* 
*फक्त एकमेकाला बघतात* 
*एखाद दुसरा शब्द  बोलतात* 
*पण काळजातलं दुःख दाबतात*. 

*जाणे येणे न ठेवणे, न भेटणे, न बोलणे* 
*या गोष्टी कॅज्युअली घेऊ नका* 
*गाठी उकलायचा प्रयत्न करा* 
*जास्त गच्च होऊ देऊ नका*. 

*धावपळ करून काय मिळवतो* 
*याचा जरा विचार करा* 
*बँकेचे अकाउंट भरण्या पेक्षा* 
*आपल्या माणसांची मनं भरा.*

*एकमेका जवळ बसावं बोलावं*
*आणि नेहमी नेहमी*
*तिरपं चालण्याच्या एैवजी* 
*थोडं सरळ रेषेत चालावं*

*समुद्रात चोहीकडे पाणी* 
*आणि पिण्याला थेंबही नाही*
*अशी अवस्था झालीय माणसाची* 
*यातून लवकरच बाहेर पडा*.


*माणसं अन माणुसकी नसलेली घरे* 
*अन देव नसलेले देव्हारे* 
*कितीही पॉश असले* 
*तरी त्याचा काय उपयोग*

महिलांसाठी LIC ची स्पेशल पोलिसी आधार शिला.

*आधार कार्डधारक महिलांसाठी LIC ची खास पॉलिसी; मिळणार ‘हे’ फायदे*
आजच्या धकाधकीच्या आणि अनिश्चितेतच्या काळात सर्वांनाच विमा पॉलिसीची (Life Insurance) गरज आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी  देखील (LIC) आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन विमा योजना आणत असते. सध्या एलआयसीने खास महिलांसाठी नवीन पॉलिसी आणली असून, आधारशीला प्लॅन (Aadhaar Shila Plan) असं या पॉलिसीचं नाव आहे. ज्यांच्याकडे यूआयडीएआयद्वारे (UIDAI) दिलेलं आधारकार्ड आहे त्यांच्यासाठी खास ही योजना आणण्यात आली आहे. ही खात्रीशीर परतावा देणारी योजना असून ती मार्केटशी जोडलेली नाही.
या योजनेत बोनससह काही खास फायदे देण्यात आले आहेत. विशिष्ट कालावधीमध्ये तुम्ही या विमा  पॉलिसीचे वेळेवर हप्ते भरल्यास तुम्हाला बोनसचा लाभदेखील मिळणार आहे.
*या योजनेविषयी अधिक माहिती -*
1) विमा रक्कम : किमान- 75 हजार रुपये, कमाल- 3 लाख रुपये 2) पॉलिसीचा कालावधी : 10-20 वर्ष 3) हप्ते भरण्याचा कालावधी : तुम्ही निवडलेल्या वेळेपर्यंत  4) हप्ते भरण्याची सुविधा : मासिक, त्रैमासिक आणि  सहामाही 
*फायदे -*
*डेथ बेनिफिट -*
यामध्ये पॉलिसीधारकाचा पॉलिसी घेतल्यानंतर पाच वर्षाच्या आत मृत्यू झाल्यास वारसांना विम्याची निर्धारित रक्कम मिळते; पण पॉलिसीच्या 5 वर्षानंतर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास वारसाला मृत्यूनंतर मिळणारी निर्धारित रक्कम आणि लॉयल्टी अॅडीशन्सदेखील (काही असल्यास) मिळतात. मिळणाऱ्या रकमेत खालीलपैकी जे सार्वाधिक असेल ती रक्कम दिली जाते. वार्षिक हप्त्याच्या दहापट किंवा मूळ विमा रकमेच्या 110 टक्के अधिक रक्कम किंवा निर्धारित विम्याची रक्कम मृत्यूपर्यंत भरलेल्या हप्त्यांच्या 105 टक्क्यांपेक्षा कमी नसेल ती रक्कम वारसाला दिली जाते.
*मॅच्युरिटी लाभ -*
यामध्ये पॉलिसीधारकानं पॉलिसीचे सर्व हप्ते वेळेवर भरले, तर त्याला मॅच्युरिटीनंतर मिळणाऱ्या विमा रकमेसह लॉयल्टीचा लाभदेखील मिळतो.
*लॉयल्टी अ‍ॅडीशन -*
यामध्ये पॉलिसीधारकाचा पॉलिसी घेतल्यानंतर 5 वर्षांच्या आत मृत्यू झाल्यास त्यासाठी मिळणारा लाभ मिळतो. पण पॉलिसीच्या 5 वर्षानंतर त्याचा मृत्यू झाल्यास वारसाला मृत्यूनंतर मिळणारी रक्कम आणि लॉयल्टी अ‍ॅडीशनदेखील मिळते. याच्या दराची घोषणा एलआयसी करत असते. तुमची पॉलिसी पेड-अप पॉलिसीमध्ये बदलली गेली, तर तुम्ही जितका कालावधी ही पॉलिसी सुरू ठेवली आहे, तितक्या कालावधीची लॉयल्टी अ‍ॅडीशन मिळते.
*कोण घेऊ शकतं ही पॉलिसी -*
1) या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कमीतकमी आठ वर्ष वय असावं.
2) जास्तीतजास्त 55 वर्षांपर्यंतची महिला यामध्ये गुंतवणूक करू शकते.
3) पॉलिसी मॅच्युअर होताना वय 70 वर्षाच्या वर नसावं.
4) यामध्ये बचती बरोबरच लाईफ कव्हरदेखील मिळतं.
5) या पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर एकरकमी परतावा मिळतो.
6) पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ही रक्कम मिळते.
या योजनेतील अन्य अटी -
*रिव्हायव्हल -*
बंद झालेली किंवा पेड-अप झालेली पॉलिसी या द्वारे पुन्हा सुरू करता येते. शेवटचा हप्ता भरल्यानंतर दोन वर्षातच पॉलिसी पुन्हा सुरू करता येते. यासाठी तुम्हाला या दोन वर्षांचा हप्ता आणि त्यावरील व्याज भरणं आवश्यक आहे.
*ग्रेस पीरियड -*
काही कारणास्तव वेळेवर हप्ता भरू शकला नाही, तर एलआयसी तुम्हाला यासाठी अतिरिक्त वेळ देते. त्याला ग्रेस पिरीयड म्हणतात. साधारणपणे 30 दिवस ते 15 दिवसांचा हा कालावधी असतो. वार्षिक, सहामाही आणि तिमाही हप्ते भरणाऱ्यांसाठी 30 दिवसांचा तर मासिक हप्ता भरणाऱ्यांसाठी 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी दिला जातो.
*पेड अप व्हॅल्यू -*
ग्रेस पिरीयड मध्येही हप्ते न भरल्यास पॉलिसी बंद होते, मात्र किमान पॉलिसी घेतल्यानंतर सलग तीन वर्षे हप्ता भरलेला असल्यास ती पॉलिसी पेड-अप पॉलिसीमध्ये बदलते. या पेड-अप पॉलिसीमध्ये प्राप्त झालेल्या रकमेची देय रक्कम ही भरलेल्या प्रीमियमच्या प्रमाणात आणि वास्तविक देय रकमेच्या प्रमाणात कमी केली जाते. यात जमा बोनसदेखील जोडला जातो. ही रक्कम पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर किंवा व्यक्तीच्या मृत्यूनंतर दिली जाते.
*सरेंडर व्हॅल्यू -*
पॉलिसीधारकाला आपली पॉलिसी रद्द करण्याचा किंवा सरेंडर करण्याचा अधिकार असतो. मात्र यासाठी साधारणपणे सलग तीन वर्ष हप्ते भरलेले असणं आवश्यक आहे. त्यानंतरच पॉलिसी सरेंडर करता येते. पॉलिसी सरेंडर केल्यानंतर निर्धारित सरेंडर व्हॅल्यू आणि स्पेशल सरेंडर व्हॅल्यू यामध्ये जी रक्कम जास्त असते ती पॉलिसीधारकाला देण्यात येते.
*Call for more details.: 8554836989