१० वी ११वी पर्यंत रूटीन प्रगती होत असते. खरा कस लागतो तो १२वी परीक्षेचा. तोपर्यंत शाळा सुटलेली असते कॉलेज लाईफ अंगवळणी प डा य ला सुरू झालेले असते. आजचा दिवस कसा चांगला जाईल इकडे च लक्ष असते. उद्याचा विचार करायला वेळ कोणाला असतो? कशीतरी पदवी मिळवायची नोकरी करून अर्थार्जन सुरू करायचे कारण ती कोटुंबिक गरज बनलेली असते. चॉईस कमीच असतो. आर्थिक परिस्थिती पुढे नाइलाज असतो. त्यातून अगदी व न percent मुलांची पुढे शिकायची तयारी असते. पण पुढे काय शिकावे याचा निर्णय घेणे मात्र अवघड असते. आजकाल इंजिनियर बनण्याचे आकर्षण पालकांपासून सगळ्यांनाच आहे, कारण विचारलं तर नाही सांगता येणार.
इंजिनियर व्हायचं नक्की होत. पण वेगवेगळ्या बेसिक, मदर इंजिनिअरिंग विषयाची माहिती नसते, कघिकधी आयुष्याची महत्वाची ७ ते ८ वर्ष वाया
घा ल ऊ न कशीबशी इंजिनियर ची पदवी पदरात पडलेली असते. सरकारी नोकरी मिळण्याची वयोमर्यादा निघून गेलेली असते. प्रायव्हेट कंपनीत नोकरी करणे अथवा स्वतःचा व्यवसाय सुरू करणे, उपजिविकेसाठी एवढाच पर्याय उपलब्ध असतो. यात स्पर्धा खूप तीव्र असते, त्यात निभावून जाणे अपरिहार्य असते.
वेळे नुसार, परिस्थिती नुसार कुठल्या विषयाची पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनची मागणी जास्त असेल ती सतत बदलत असते. डिमांड आणि सप्लाय रुल इथेही लागू पडतो. पूर्वी कधी B.A., B.Com., MA, M.Com.,
B. Ed. LLB, LLM, IAS, IFS. परिणाम स्वरूप कधी
सरकारी बाबुची नोकरी मिळत होती मग म्हणून बी. ए. बी. कॉम कडे विद्याथ्र्यांचा ओढा होता, भरपूर शिक्षक झाल्यावर बी. एड. डी.एड. कमी झाले. जरुरीपेक्षा जास्त वकील झाल्यावर आपोआप एल. एल.बी. चे विद्यार्थी कमी झाले.
त्याच प्रमाणे एमबीबीएस, बी. ई. आयएएस, आय. फ. एस
बाबतीत अनुभव आला. एकाच क्षेत्रात जास्त शिक्षित असेल तर त्याचे devaluation होते. बेरोजगारी वाढते.
नोकऱ्या कमी उपलब्ध होतात, जांना नोकऱ्या मिळतात त्यांना कमी पगारावर काम करावे लागते. उदाहरणार्थ इंजिनियर इतके उपलब्ध असतात की कारखान्यात आठ ते दहा हजारांत नोकरी करावी लागते. शिक्षणासाठी लागणारा लाखोंचा खरच वाया गेलेला असतो. त्यातून शैक्षणिक बँक कर्ज काढले असेल तर अडचणीत वाढ होते. याला अपवाद नक्कीच असतात, तो म्हणजे पदवी नुसती पास होऊन चालत नाही तर त्यात distingshan मधे पास व्हावे लागते. अर्थात त्यासाठी भरपूर परिश्रमाची तयारी लागते.
लाखो रुपये खर्च करून डॉक्टर झाल्यावर परत लाखो रुपये खर्च करून शहरात गजबलेल्या लोकेशन वर क्लिनक काढले तरच केलेला खर्च वसूल होतो, म्हणून खेडेगावात डॉक्टरांनी पदवी मिळाल्या नंतर क्लिनिक काढावे म्हणून सरकारला नियम काढावे लागतात. इंग्रजांनी बांधलेले ब्रीज अजुन मजबूत दिसतात, परंतु गेल्या दोन ते तीन दशका तील पुल धरणे वाहून गेलेली दिसतात, कारण सगळ्यांनाच माहिती आहे.
शिक्षण, करिअर क्षेत्रातील व्यवस्था वेळोवेळी आवशक्ते नुसार बदलणे अपरिहार्य असते. जसे नवीन नवीन शोध लागत राहिल्यामुळे शिक्षणात पण आधुनिकीकरण अपेक्षित आहे. रोज बदलणाऱ्या नवीन technology नुसार व्यवसायातील मागणी नुसार योग्य शिक्षण देऊन विद्यार्थी घडवला गेला पाहिजे. कोण घेणार ही जबाबदारी ? अनिमेशन मधे नवीन शैक्षणिक दालन ओपन झाले आहे त्याठिकाणी आर्टिस्ट ची मागणी असते, पण समाजात माहिती अभावी या क्षेत्राकडे अजून दुर्लक्ष झालेले दिसते.
आर्थिक कुवतीनुसार सध्यातरी शिक्षण क्षेत्र निवडावे लागते हे सत्य आहे. समाजाला corruption चा अजगरा प्रमाणे बसलेला विळखा जाणवतो आहे. त्यासाठी कस्टा शिवाय पर्याय नाही. येनकेन प्रकारेण एकदाची पदवी मिळाली, नंतर लगेच आपल्याला व्हाईट कॉलर जॉब च लागतो, कारण स्वतंत्र A/C केबिन, revolving चेअर, कार, बंगला, नोकर अपेक्षित असते. या गरजा पुरवण्या एव्हढा पगार मिळतोच असे नाही. मग नाइलाज म्हणून out of way जाऊन काही कामे केली जातात तोपर्यंत कुटुंबाला तसी राहणीमानाची सवय लागलेली असते. कधीकधी भयानक परिणाम भोगण्याची तयारी पण ठेवावी लागते.
तसे नॉर्मल जगण्याचा आणि पदवीचा काहीही संबंध नाही. सगळ्याच व्यवसायांना भरपूर भांडवल लागते ही कल्पना पण चुकीच्या आहेत. प्रत्यक्ष बघितलेली उदरणार्थ अशिक्षित माणूस, भांडवल म्हणून बरोबर एक नॅपकिन, मसाज तेलाची बाटली, अन रात्री ८ ते १२ पर्यंत कष्ट करण्याची तयारी. रोज average ५००/- कमाई म्हणजे महिन्याला ₹ १५०००/- ची कमाई नक्की. एक सामान्य क्लर्क, सकाळ १० ते सायंकाळी ५ पर्यंत ऑफिस काम. सायंकाळी पत्नी ची मदतीने मक्याचा चिवडा, वजन करून, पॅकिंग करून ५ KM मधील किराणा, फरसाण दुकानदार व हॉटेल यांना गरजे प्रमाणे वाटप करणार व दोन दिवसांनी बिलाचे कलेक्शन करणार.
नियमित काबाड कष्ट करण्याची तयारी असेल तर कमाई ला स्काय हेच लिमिट असते.
पण कुठलाच शॉर्टकट जीवनात नसतो. जसे अपत्य पाहिजे असल्यास कमीतकमी ९ महिने थांबावे च लागते. तसे अपेक्षित उत्पन्न, सामाजिक प्रतिष्ठा पाहिजे असल्यास कितीही परिश्रम करण्याची तयारी पाहिजे. बिना कुदळी च, रताळ मिळवण्याची धडपड करणे महाग पडू शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा