ब्लॉग नंबर: ०३. Dated : १०/१२/२०२०
*1. जीने चढू नका, गरजच असेल तर आधाराच्या पाईपला घट्ट धरून चालावे.*
*2. आपले डोके गतीने फिरवू नका, आधी आपले पूर्ण शरीर वॉर्मअप करा.*
*3. आपले शरीर वाकवून पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका आधी पूर्ण शरीर वॉर्मअप करा.*
*4. आपला पायजमा उभ्याने न घालता बसून घाला.*
*5. झोपेतून उठताना तोंड समोर ठेऊन उठू नका तर डाव्या अगर उजव्या कुशीवर वळून उठा.*
*6. उलटे चालू नका त्याने गंभीर इजा होऊ शकते.*
*8. खाली वाकून जड वस्तू उचलू नका तर आधी गुडघ्यात वाकून मग उचला.*
*9. झोपेतून उठताना जलद न उठता प्रथम काही मिनिटे शांत बसून मग उठा.*
*10. शौचाला जोर लावू नका नैसर्गिक होऊ द्या. अजून महत्त्वाचे नेहमी कृतिशील रहा व सकारात्मक विचार ठेवा कारण आयुष्यभर काबाडकष्ट केल्यानंतर आता खरे जीवन आनंदी जगण्याची वेळ आहे.*
*● वरचेवर मित्रांच्या, मैत्रीच्या संपर्कात जरूर रहा मनसोक्त पैसे वेळ खर्च करा*
*● आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेंव्हा शेवट होईल, तेंव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्या सोबत नेता येणार नाही.*
*● मग जीवनात खुप काटकसर कशासाठी करायची ? आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टींतुन आपणास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत.*
*● आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळीच चिंता करु नका. कारण आपला देह जेंव्हा मातीत मिसळून जाईल तेंव्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय ?*
*● जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल ...!*
*● तुमच्या मुलांची खुप काळजी करु नका. त्यांना स्वत:चा मार्ग निवडू द्या. स्वतःचे भविष्य घडवू द्या. त्यांच्या ईच्छा आकांक्षाचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका .*
*● मुलांवर प्रेम करा त्यांची काळजी घ्या, त्यांना भेटवस्तुही द्या. मात्र काही खर्च स्वतःवर स्वतःच्या आवडी निवडीवर करा*
*● जन्मापासून मृत्युपर्यंत नूसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही हे देखील लक्षात ठेवा*
*● आपल्या आरोग्याची हेळसांड करुन पैसे कमवण्याचे दिवस आता संपले आहेत. पुढील काळात पैसे मोजून सुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही .*
*● या वयात प्रत्येकापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न असतात. पैसा कमवणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल* .
*● तुमच्याकडे कितीही एकर सुपीक शेतजमीन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते ?* *तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते !*
*● एक दिवस आनंदा शिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात हे लक्षात असू द्या.*
*● आणखी एक गोष्ट तुमचा स्वभाव खेळकर उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल आणि तुम्ही कायम प्रफुल्लीत असाल तर तुम्ही आजारी पडणारच नाहीत.*
*● सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे, उदात्त आहे त्याकडे पहा. त्याची जपणूक करा*
*● आणी हो, तुमच्या मित्रांना / मैत्रीणींना कधीही विसरु नका त्यांना जपा, हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरुण रहाल आणी इतरांनाही हवेहवेसे वाटाल.*
*● मित्र-मैत्रीण नसतील तर*
*तुम्ही नक्कीच एकटे आणी एकाकी पडाल.*
*● त्यासाठी रोज व्हाट्सएपच्या माध्यमातून संपर्कात रहा हसा, हसवत रहा मुक्त दाद द्या*
*म्हणूनच म्हणतो आयुष्य खुप कमी आहे ते आनंदाने जगा ...*
*● प्रेम मधुर आहे त्याची चव चाखा..!*
*● क्रोध घातक आहे त्याला गाडुन टाका..!*
*● संकटे ही क्षणभंगुर आहेत*
*त्यांचा सामना करा..!*
*● डोंगरा आड गेलेला सूर्य परत दिसू शकतो पण ....*
*● काळाच्या पडद्या आड गेलेले "जीवलग" परत कधीच दिसत नाहीत ....*
!! मित्र जपा मैत्री जपा!!
*सध्याच्या या कठीण परिस्थितीतून आपण सर्वजण कोरोनाला हरवून नक्कीच सुखरूप बाहेर पडू....*
*स्वतःची काळजी घ्या, घरी रहा सुरक्षित रहा.*
*_जरी आपण ज्येष्ठ नागरिक नसाल तरी हा मेसेज सर्व जेष्ठ नागरिकांना अवश्य पाठवा.* 🙏 🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा