" आयुष्यात यश अनेकदा जाता - जाता मिळून जातं "
000
" Hamlet is a tragedy of overthinking whereas Macbeth is a tragedy of over ambition. ह्या ठिकाणी ' ओव्हर ' हा शब्द जास्त महत्वाचा. अतिविचार केला म्हणजेच योग्य कृती घडते असं नाही. विचारसाखळीतला कृती करायला लावणारा शेवटचा दुवा चुकीचा ठरू शकतो. त्याचप्रमाणे एका झटक्यात एखादी कृती केली आणि अपयश आलं, तर ' हा अविचाराचा परिणाम ' असा शिक्काही तयार ठेवायचं कारण नाही. आयुष्यात यश अनेकदा जाता - जाता मिळून जातं आणि एकदा यश मिळालं की, माणूस जास्त खोलात जातं नाही. यशस्वी माणूस विचारवंतच मानला जातो आणि तो आपल्या येशाचं श्रेय नियतीला देत नाही. आपली दूरदृष्टी, अचूक योजना, निर्णय घेण्याची क्षमता अशी अनेक पिसं आपल्या टोपीत खोचायला तो अधीर झालेला असतो."
वपुर्झा /199/Surendra / 08072025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा