" माणसानेही मनाचे सगळे दरवाजे बंद करून ' स्टॉक टेकिंग ' करायला हवं."
000o000
" आपल्या मनाचा कोपरन कोपरा आपण कधी पिंजून काढत नाही. प्रत्येक दुकानदार आपलं दुकान वर्षातून एकदा. ' स्टॉक टेकिंग ' साठी बंद ठेवतो. माणसानेही मनाचे सगळे दरवाजे बंद करून ' स्टॉक टेकिंग ' करायला हवं. राखेचे आवरण पांघरलेले किती तरी निखारे सापडतील. एखाद्या प्रसंगाने, व्यक्तीमुळे ती राख उडते आणि त्या निखाऱ्याचा चटका समोरच्या माणसाला बसतो. आपल्याच तोंडून ते शब्द निसतात, तेव्हा त्याची धग आपल्यालाही जाणवल्याशिवाय राहत नाही. "
वपुर्झा /196/Surendra / 03072025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा