मंगळवार, ८ जुलै, २०२५

" आयुष्यात यश अनेकदा जाता - जाता मिळून जातं "

" आयुष्यात यश अनेकदा जाता - जाता मिळून जातं "

                                  000

                "  Hamlet is a tragedy of overthinking whereas Macbeth is a tragedy of over ambition. ह्या ठिकाणी ' ओव्हर ' हा शब्द जास्त महत्वाचा. अतिविचार केला म्हणजेच योग्य कृती घडते असं नाही. विचारसाखळीतला कृती करायला लावणारा शेवटचा दुवा चुकीचा ठरू शकतो. त्याचप्रमाणे एका झटक्यात एखादी कृती केली आणि अपयश आलं, तर ' हा अविचाराचा परिणाम ' असा शिक्काही तयार ठेवायचं कारण नाही. आयुष्यात यश अनेकदा जाता - जाता मिळून जातं आणि एकदा यश मिळालं की, माणूस जास्त खोलात जातं नाही. यशस्वी माणूस विचारवंतच मानला जातो आणि तो आपल्या येशाचं श्रेय नियतीला देत नाही. आपली दूरदृष्टी, अचूक योजना, निर्णय घेण्याची क्षमता अशी अनेक पिसं आपल्या टोपीत खोचायला तो अधीर झालेला असतो."

वपुर्झा /199/Surendra / 08072025

रविवार, ६ जुलै, २०२५

" पालखीमधल्या आराध्यदैवतेचं नाव असावं ' समर्पण '. त्या पालखीत तुम्ही अहंकाराला जागा दिलीत की संसाराच झंझट झालंच."

" पालखीमधल्या आराध्यदैवतेचं नाव असावं  ' समर्पण '. त्या पालखीत तुम्ही अहंकाराला जागा दिलीत की संसाराच झंझट झालंच."

.                                  000

                "  तुम्ही-आम्ही सगळेच भिकाऱ्यासारखे आहोत. संसार हे आपल्याला ओझं वाटतं. आपण ते कायम डोक्यावर घेतो. म्हणून स्वतःचीं पत्नी, मुलं, नातेवाईक हे सगळं आपल्याला झंझट वाटतं. जीवन ही न मागता लाभलेली पर्वणी आहे. संसाराचा भार घ्यावा, तो पालखीसारखा. पालखीमधल्या आराध्यदैवतेचं नाव असावं  ' समर्पण '. त्या पालखीत तुम्ही अहंकाराला जागा दिलीत की संसाराच झंझट झालंच. नियतीने तुम्हाला जीवनरथ जन्मापासून बहाल केलाय. आनंदाच्या दिशेने तुम्हाला तो वळवता आला पाहिजे. मैलाचा दगड म्हणजे मुक्कामाचं ठिकाण नव्हे. बाणाने दाखवलेली दिशा म्हणजे प्रवासाची समाप्ती नव्हे. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात आणि किती अंतर कापायचं आहे ह्याचा इशारा देतात. म्हणूनच संसाराच गाठोडं पायाशी ठेऊन, त्या गाठोड्यावर उभे राहा. त्यामुळे तुमची उंची वाढेल आणि उंची वाढल्याशिवाय अमर्याद आकाशाचं दर्शन होत नाही. एकदाच डोक्यावरचं गाठोडं खाली ठेवा. त्याच्यावर उभे राहा. मोकळा श्वास घ्या, म्हणजे स्वतःचं अस्तित्व वगळल्यास सगळ्या दुनियेकडे झंझट म्हणून पाहण्याची कला अवगत होते. कोणत्याही माणसात बदल होईल ही अपेक्षा नको, उपदेश नको, म्हणजे प्रवास ' झंझट ' न वाटता ती आनंदयात्रा ठरेल. "

वपुर्झा /198/Surendra / 06072025(2)

" निरीक्षण आणि क्रोध एकाच वेळी संभवत नाही. "

" निरीक्षण आणि क्रोध एकाच वेळी संभवत नाही. "

                               000o0"00

                "   युद्धाच्या प्रसंगी मन जास्तीत जास्त शांत ठेवावं लागतं. संघर्ष आणि क्रोध ह्याही वेळेला मन शांत हवं. हे विधान विनोदी वाटेल, पण त्यात एक गरभितार्थ  आहे. विलक्षण संताप आला की, त्याचा निरीक्षणशक्तीवर परिणाम होतो. हवी असलेली वस्तू समोर असून दिसत नाही. लहान मुलांना मारताना आपण त्याच्या शरीरावर कुठं हात उगारीत आहोत, ह्याचं भान राहत नाही. डोळे, कान अशी नाजूक इंद्रियं, जवळ असलेला मुलांचा गालच जवळचा वाटतो, कारण तेव्हा स्वतःला वाकायचेही श्रम घ्यावे लागतं नाहीत. काही मुलं एका कानाने बहिरी झालेली माझ्या ऐकिंवात आहे. आपला हात किती लागतो, हे मारणाऱ्या बापाला कळत नाही. पण निरीक्षण आणि क्रोध एकाच वेळी संभवत नाही. पत्नीवर हात उगारणारे नवरे कमी आहेत का?

वपुर्झा /198/Surendra / 06072025

                            

गुरुवार, ३ जुलै, २०२५

" हेच आंधळेपण. विचारहीनता."

 " हेच आंधळेपण. विचारहीनता."

                               000o0"00

                "  जड वस्तुंना पण भावना असतात. सगळं विश्व त्रिगुणत्मक आहे. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. ह्याबाहेर कुणी जाऊ शकणार नाही. ऍटम मध्ये सुद्धा प्रोटॉन,          इलेंकट्रॉन, न्यूट्रॉन हे तीनच घटक सापडले. वर्षानुवर्षं एखादा दगड एकाच जागी पडून असतो. का? तिथे तमोगुणाचा अतिरेक आहे. कुणीतरी तो उचलून लांबवर भिरकावतो. म्हणजे काय करतो? तर स्वतःचीं रजोगुणाची शक्ती त्याला अर्पण करतो. रजोगुणाचा शेवटचा अंश ज्या स्थानावर संपेल तिथे तो दगड पुन्हा स्थिर होतो. तमोगुण आहे म्हणून घरातलं फर्निचर आहे तसच राहतं. ती चैतनन्याचीच रूपे आहेत. आपल्याला कोणत्याही दिव्य शक्तीची गरज नाही. निसर्गाने दिलेल्या दृष्टीचा तरी आपण उपयोग करतो का? गीता दूरच राहिली. सिगारेट, दारू ह्यासारखी व्यसनं आपण ध्रुतराष्ट्रसारखी गुरु करतो आणि धोक्याच्या जाहिराती नजरेसमोर आल्या, म्हणजे गंधारीसारखी पट्टी बांधतो. ह्या व्यसनांपायी कॅन्सर वगैरे होणारी माणसं दुसरी आहेत, आपण नव्हे--असं समजतो. हेच आंधळेपण. विचारहीनता.'

वपुर्झा /197/Surendra / 03072025(2)

" माणसानेही मनाचे सगळे दरवाजे बंद करून ' स्टॉक टेकिंग ' करायला हवं."

"  माणसानेही मनाचे सगळे दरवाजे बंद करून ' स्टॉक टेकिंग ' करायला हवं."

                               000o000

                "  आपल्या मनाचा कोपरन कोपरा आपण कधी पिंजून काढत नाही. प्रत्येक दुकानदार आपलं दुकान वर्षातून एकदा. ' स्टॉक टेकिंग ' साठी बंद ठेवतो. माणसानेही मनाचे सगळे दरवाजे बंद करून ' स्टॉक टेकिंग ' करायला हवं. राखेचे आवरण पांघरलेले किती तरी निखारे सापडतील. एखाद्या प्रसंगाने, व्यक्तीमुळे ती राख उडते आणि त्या निखाऱ्याचा चटका समोरच्या माणसाला बसतो. आपल्याच तोंडून ते शब्द निसतात, तेव्हा त्याची धग आपल्यालाही जाणवल्याशिवाय राहत नाही. "

वपुर्झा /196/Surendra / 03072025