मित्रानो साधारण 50 वर्ष अगोदर आपण ज्या वेळेस शाळेत जायला सुुरवात केली होती तेव्हा पाटी पेन्सिल वापरत होतो नाही का? जसजसे दिवस जात राहिले तसे बॉल पेन, इंक पेन नोटबुक वापरायला लागलो. त्याकाळी रेडिओ, ट्रान्झिटस्टर, सायकल, टेलिफोन सगळ्यांच्या घरी नव्हते. हे सर्व असणे स्टेटस सिम्बॉल मानला जायचा. दिवस उजेडायचा तो रोजचे वर्तमानपत्र वाचण्याने. रेडिओवरील बातम्या न चुकता ऐकल्या जायच्या. त्यावेळेचे तरुण बिनाका गीत मालिका/ अमीन सायानी यांचे हिंदी गाणे व बोल ऐकण्यासाठी आतुरलेले असायचे. करमणूकीचे साधन म्हणजे थिएटर मधे जाऊन सिनेमा बघणे, एखादे, नाटक भगणे असे. Typewriter चा उपयोग करून पत्रव्यवहार, सरकारी ऑफिस मधील व कोर्टाची कामे होत होती.
काळ पुढे सरकत राहिला. जुन्या गोष्टी मागे पडत गेल्या. घरोधरी टीव्ही आला. त्याला अंटेना, नाहीतर केबल वापरावी लागायची. आता TATA play DTH/ फायर स्टिक सारखे अनेक आधुनिक उपकरण आली. टेलिफोन चा जमाना सरकारी ऑफिसच पुरताच शिल्लक राहिला. मोबाईल आले. स्मार्ट मोबाईल आले. इंटरनेटचे जाळे वाढले. 2G,3G,3G आता 5G स्पीड आले.
या सगळ्यांचा परिणाम म्हणून गेल्या दशका पासून सार्वजनिक वाचनालय ओस पडत गेली. ई न्यूजपेपर लोक वाचायला लागले. ई - साहित्य पुढे आले, कुठकाही खर्च न करता लेखक, कवी त्यांचे साहित्य पब्लीस करू लागले व लोकांना फ्री म्हणजे कुठलाही खर्च न करता आपल्या आवडीचे साहित्य आपल्या कॉम्प्युटर किंवा मोबाईल वर वाचायला उपलब्ध झाले. प्रिंटेड पुस्तक , कादंबरी कथा/ काव्य संग्रह याकडे लोकांनी पाठ फिरवल्याचे प्रथमदर्शनी दिसू लागले. याची अज्ञात व अनेक कारणे असली तरी त्याचे परिणाम समाजात उमटू लागले.
टीव्ही बघण्याचे प्रमाणाने अतिशयोक्ती गाठली. जागतिक बाजारपेठेत competation वाढत गेली. समाजात कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त पैसे कमविण्यासाठी धडपड सुरू झाली. परिणाम स्वरूप लोकांना जास्तीत जास्त अधिक श्रम करणे क्रमप्राप्त झाले.
त्यात एकत्र कुटुंब पद्धती कमी कमी होत जाऊन विभक्त कुटुंब पद्धती पुढे आली. त्यामुळे पती पत्नी दोघंही कमविण्यासाठी जास्तीत जास्त वेळ घराबाहेर राहणे आवश्यक झाले. त्यामुळे मुलांच्या योग्य संगोपनाकडे दुर्लक्ष झाले. मुले टीव्ही किती वेळ आणि काय बघता आणि अभ्यास किती करता यावर पालकांचे कंट्रोल राहिले नाही. कॉम्प्युटर नॉलेज असणे हे आज अत्यावशक झाले आहे.
कोविड काळात अमुलाग्र बदल नाईलाजाने करावे लागले. मुलांचे शिक्षणिक वर्ष वाया जाण्याची वेळ आली. सरकारी आदेशा प्रमाणे शाळांनी निर्णय घेऊन मुलांचे शिक्षण मोबाईल वरून सुरू ठेवले होते. आधी मुलांवर शाळेत मोबाईल आणण्यावर बंदी होती. पण पुढे त्यावरच मुलांचे शिक्षण अवलंबून होते.
नॉलेज acquization च्या sources मधे अमुलाग्र बदल होत गेले. त्यातील एक महत्वाचे device म्हणजे कानाला हेडफोन लावून ऐकणे. यामधे जो माहिती किंवा कथा सांगतो तो Story Teller किंवा पॉडकास्टर. रेडिओ वर त्यांनी प्रसारीत किंवा broadcast केलेले करकरमच आपण ऐकू शकतो आपल्या हातात दुसरे option नसते. पण आता Spotify सारख्या अनेक माध्यमातून आपल्या चॉइस ला प्रेफरन्स असतो. आपल्याला जे आवडते तो विषय, कथा, कादंबरी, कविता, गझल, कुठल्याही भाषेच्या अडचणी शिवाय, वेळेच्या अडचणी शिवाय ऐकता येते.
टीव्ही वरील daily एपिसोड चा पुढचा भाग बघण्यासाठी टीव्ही समोर ठराविक वेळ झाली की बसावे लागते. त्यावेळी दुसरे काहीही काम करणे शक्य असते. पण podcast मधे मंजे दोन्ही कानांना हेडफोन लावून तुम्ही तुमच्या हातातील काम बंद न करता चालू ठेवू शकता व music व स्टोरी टेलिंग ऐकण्याचा आनंद घेऊ शकता. याच वैशीष्ट्या मुळे जगभरात तरुण युवकांमध्ये पॉडकास्ट/ music ऐकण्याची आवड दिवसेंदिवस वाढत आहे. मानवाने आतापर्यंत नवीन नवीन टेक्नॉलॉजी चा उपयोग आपल्या प्रगतीसाठी च करून घेतला आहे. म्हणून दिवसेंदिवस पॉडकास्ट चा प्रसार सर्व क्षेत्रात वाढत जाणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा